गरोदरपणात तुम्ही टाळले पाहिजेत असे १० भारतीय अन्नपदार्थ

 0
गरोदरपणात तुम्ही टाळले पाहिजेत असे १० भारतीय अन्नपदार्थ

गरोदरपण हा स्त्रियांसाठी एक नाजूक काळ असतोगर्भवती स्त्रियांनी आपल्या मुलांच्या निरोगी वाढीसाठी पोषक अन्नपदार्थ खाणे जरुरीचे असते तसेच गर्भवती स्त्रियांना जंक फूड पूर्णपणे सोडण्यास सांगितले जातेजर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्हालाही जंक फूड सोडण्यास सांगितले गेले असेल आणि आपल्याला आवडत असलेले चविष्ठ पदार्थ कसे सोडायचे ह्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेलअचानकपणे एकदम कॉफीपिझ्झापास्ता सोडणे अवघड आहेहो नापण तुम्ही ते करू शकताविश्वास ठेवाबरेचसे पदार्थ तुम्ही इतर वेळेला खाणे सुरक्षित असते परंतु गरोदरपणात ते खाणे सुरक्षित नसते.

भारतीय खाद्यपदार्थ जे गरोदरपणात हानिकारक असू शकतात

तुम्ही गरोदरपणात जे पदार्थ तोंडात टाकता ते बाळापर्यंत पोहोचणार .आहेतत्यामुळे तुम्ही पोषक अन्नपदार्थांची निवड करणे आवश्यक आहेतुमच्यासाठी जे चांगले पदार्थ असतील ते तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी चांगले असतीलच असे नाहीत्यामुळे योग्य निवड कराहे पदार्थ गरोदरपणात खाणे टाळा आणि तुमच्या बाळाला सुरक्षित ठेवा.

कच्ची पपई

कच्ची पपई

 

आपल्याला आधीच माहित आहे की गरोदरपणात पपई खाणे टाळले पाहिजेपरंतु असे का आहे हे आपल्याला माहिती आहे काकच्ची किंवा अर्धवट पिकलेली पपई गरोदरपणात खाणे योग्य नाहीहिरव्या पपईमध्ये उच्च प्रमाणात लॅटेक्स असतेजे विशेषतः हानिकारक असू शकते कारण यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकतेआणि गर्भपात होऊ शकतोयात पपाइन आणि पेपसीन देखील आहेजे गर्भाच्या विकासावर परिणाम करते त्यामुळे अनेक जन्म दोष उद्भवतात.

तुळशीची पाने

तुळशीची पाने

 

सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होत असताना आपण बर्‍याचदा तुळशीची पाने खातोजर आपल्याला सर्दी किंवा खोकला असेल तर आपण तुळशीची पाने खाऊ शकतापरंतु ते मध्यम प्रमाणात खाऊ शकतागरोदरपणात तुळशीची पाने खाण्यास पूर्णपणे सुरक्षित नाहीपरंतु तुम्ही दिवसातून १२ पाने खाऊ शकता.

कोरफड रस

कोरफड रस

 

कोरफड त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी प्रसिध्द आहेपरंतु गरोदरपणात ती हानिकारक असू शकतेकोरफड केवळ गर्भाशय आणि त्याच्या आकुंचनांवर परिणाम करत नाहीतर कोरफड रस गर्भासाठीसुद्धा फायदेशीर नाहीत्याच वेळीकोरफड उलट्या आणि अतिसार सारख्या प्रतिक्रियांना देखील कारणीभूत ठरू शकतेज्यामुळे शरीराच्या इलेक्ट्रोलाइटच्या पातळीत असंतुलन उद्भवू शकते.

मेथीचा लाडू

मेथीचा लाडू

 

मेथीहिंदीमध्ये मेथी दाना म्हणून ओळखले जाते आणि स्त्रीच्या बाळंतपणात दूध चांगले यावे म्हणून मेथीचे दाणे तिच्या आहाराचा एक मुख्य भाग बनतातप्रसूतीनंतर महिलांना सहसा मेथीचे लाडू दिले जातातपरंतु गरोदरपणात ते खाणे टाळले पाहिजे कारण त्याचे आई आणि बाळाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात.

अननस

अननस

 

प्रसूतीची तारीख जसजशी जवळ येते तसे स्त्रियांचा अननस खाण्याकडे कल वाढतोडॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचा आहारात समावेश केलेला असल्यास ठीक आहे परंतु गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये अननस खाणे टाळले पाहिजेअननसामध्ये ब्रोमेलिन एंझाइम असते त्यामुळे गर्भाशयाचे मुख मऊ होते आणि त्यामुळे प्रसूती कळा सुरु होण्यास मदत होतेत्यामुळे अकाली कळा सुरु होतात आणि गर्भपात होण्याची शक्यता वाढते.

कच्ची अंडी

कच्ची अंडी

 

अंडे तुम्ही वेगवेळ्या स्वरूपात खाऊ शकता तसेच ते चवदार देखील आहेपरंतु तुम्ही गरोदरपणात अंडे खाऊ शकता काहो परंतु सगळ्या स्वरूपात नाहीतुम्ही उकडलेल्या अंड्यांचा समावेश तुमच्या गरोदरपणाच्या आहारात करू शकतापरंतु कच्ची अंडी तुम्ही कधीच खाऊ नकाकच्ची अंडी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरली जातातकच्च्या अंड्यांमध्ये साल्मोनेला विषाणू असल्याची शक्यता असते आणि गरोदरपणात गुंतागुंत निर्माण होऊ शकतेत्यामुळे तुम्ही गरोदरपणात कच्ची अंडी खाणे टाळले पाहिजे.

खारट पदार्थ

खारट आणि मसालेदार पदार्थ चवदार असतातगरोदरपणात ते खावेसे वाटतातहे पदार्थ खाल्याने तुमच्या तोंडाला चव येईल आणि भूक मारली जाईलपरंतु जास्त मीठ असलेले पदार्थ टाळण्याची शिफारस केली जातेह्यामध्ये तुमच्या आवडीचे पदार्थ म्हणजेच सामोसाभजी आणि वेफर्सचा सुद्धा समावेश होतोखूप जास्त प्रमाणात मीठ असले की शरीरात पाणी जास्त धरून ठेवले जाते आणि ते खूपशा समस्यांचे मूळ आहे त्यामुळे ते टाळणे योग्य आहे.

स्ट्रीट फूड

स्ट्रीट फूड

होयआम्हाला माहित आहे की हे तुम्हाला आवडणार नाहीपरंतु आपण आपल्या बाळाला आनंदी आणि सुरक्षित ठेवू इच्छित असल्यासरस्त्यावरील पदार्थ खाणे टाळाथोड्या काळासाठीचाट आणि चायनीज खाणे विसराहोयगरोदरपणात तुम्हाला हे पदार्थ खावेसे वाटतील परंतु ते टाळले पाहिजेत कारण हे पदार्थ तयार करताना स्वच्छता आणि इतर आरोग्यविषयक प्रक्रियेचे पालन होत नाहीअशा प्रकारे स्ट्रीट फूड खाण्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला संसर्ग आणि रोगाचा धोका होऊ शकतोतुमचे पोट अस्वस्थ होऊ शकते तसेच तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतोस्ट्रीट फूड मसालेदार असते त्यामुळे तुम्ही ते टाळले पाहिजेमसालेदार आहार घेतल्यामुळे तुमच्या पोटात जळजळ होऊ शकते म्हणून ते शक्य तितके खाणे टाळा.

समुद्री अन्न

समुद्री अन्न

मांसामध्ये परजीवी व इतर सूक्ष्मजंतू असू शकतातशिजवलेली फिश करी किंवा तळलेले मासे खाणे देखील टाळावेहोयमाश्यामध्ये गरोदरपणात स्त्रियांना आवश्यक असणारी अनेक महत्वाची पोषक तत्वे असतात परंतु ते खाण्यापासून स्वतला रोखले पाहिजेसमस्या माशाची नसून पाण्याची आहेपाण्यामध्ये बरेचसे दूषित पदार्थ आणि पारा असतोआणि हे पदार्थ माशाच्या शरीरात जातातते अपरिहार्यपणे तुमच्या शरीरात जातात आणि त्यामुळे खूप समस्या उद्भवू शकतातकोळंबीसाल्मोन आणि कॅटफिश सारखे विशिष्ट प्रकारचे मासे सामान्यतगर्भवती स्त्रियांसाठी सुरक्षित मानले जातात परंतु आपण त्यांना आपल्या आहाराचा एक भाग बनवण्यापूर्वी प्रथम आपल्या डॉक्टरांशी बोलून खात्री करुन घ्यावी.

१०बडीशेप

बडीशेप मध्ये इस्ट्रोजेन सारखे कार्य करणारे आणि गर्भाशयाचे आकुंचन उत्तेजित करण्यासाठी ओळखले जाणारे फायटोएस्ट्रोजेनचे ट्रेस असल्याचे ज्ञात आहेमेथीच्या दाण्यांप्रमाणेच प्रसूतीनंतर स्त्रियांना बडीशेप दिली जाते कारण त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढते तसेच गर्भाशय स्वच्छ होण्यास मदत होतेगरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कमी प्रमाणात बडीशेप खाल्ली जाऊ शकते.

जे खावेसे वाटते ते खाणे अशक्य झाल्याने तुम्ही नक्कीच दुःखी व्हालपरंतु लक्षात ठेवा कि हे तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी करत आहातहे काही भारतीय खाद्यपदार्थ आहेत जे तुम्ही तुमच्या गरोदरपणात खाऊ नयेतपरंतु असे बरेचसे खाद्यपदार्थ आहेत जे खाण्याची गरोदरपणात शिफारस केली जाते आणि ते चविष्ठ देखील असताततर त्याचा आनंद घ्यानिरोगी राहण्यावर आणि बाळाला सुरक्षित ठेवण्यावर लक्ष केंद्रित करा म्हणजे तुमचे बाळ सुद्धा निरोगी असेल!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow