श्रीखंड

श्रीखंड हे दह्याने बनवले जाते ह्यात आढळणारे घटक हे शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात श्रीखंड खाल्याने प्रतिकार शक्ती वाढते सोबत ह्यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळून येत जे हाडांच्या बळकटीसाठी फायदेशीर आहे कॅल्शियम सोबत श्रीखंड मध्ये मिसळले जाणारे ड्रायफ्रुटस सुकामेवा हा देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपायकारक आहे

 0
श्रीखंड
श्रीखंड

श्रीखंड
घरच्या घरी श्रीखंड 
घरगुती श्रीखंड कसे बनवावे 

साहित्य

१ कप चक्का, 
१ कप पिठीसाखर,
 १० ते १२ केशरच्या काड्या, 
१ चमचा दूध, 
बारीक कापलेल्या पिस्ता, 
बारीक कापलेले बदामाचे काप, 
वेलची पूड.

कृती :

चक्का घ्या. घरी चक्का करायचा असेल तर एक किलो दही घ्या. दही रूमालामध्ये काढून घ्या. रूमालाखाली गाळणी ठेवा. रूमाल बांधा व त्यावर वजन ठेवा. थोड्या वेळाने तो रूमाल लटकवत ठेवा व पाणी सर्व निथळू  द्या. याऐवजी आयत डेरी मधील दही  वापरलं तरी चालतं. विकतचा चक्का असेल तर एक कपाला एक कप साखर वापरा. घरी बनवला असेल तर एका कपाला साधारणतः तीन पाव कप साखर वापरा. चक्क्यामध्ये पिठीसाखर घाला. हॅन्डब्लेंडरने किंवा मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घ्या. साधारणपणे चार ते पाच मिनिटे फिरवा. 

नंतर एक चमचा दुधात केशरच्या काड्या घाला. हे दूध मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घ्या. आता हे केशरचं दूध श्रीखंडात घाला. बारीक कापलेल्या पिस्ता व बारीक कापलेले बदामाचे काप घाला व व्यवस्थित मिक्स करून घ्या. सगळ्यात शेवटी वेलची पूड घाला.

टीप :

सव्हिंग करायच्या अगदोर हे श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून यामध्ये जी साखर घातली आहे ती चक्क्याबरोबर छान एकजीव होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow