भाताचे आप्पे

 0
भाताचे आप्पे
भाताचे आप्पे

 भाताचे आप्पे

साहित्य :

१ वाटी शिळा भात ,

२ चमचे तांदळाचं पीठ ,

१ चमचा हिरवी मिरचीचे तुकडे अर्धा चमचा लाल तिखट ,

२ चमचे बारीक चिरलेली ढोबळी मिरची ,

२ चमचे बारीक चिरलेलं गाजर ,

२ ते ३ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर ,

 मीठ चवीपुरते ,

अर्धा चमचा जिरे .

कृती :

सर्वांत आधी भात व्यवस्थित मॅश करून घ्या . मग त्यात तांदळाचे पीठ घाला . मिश्रण खूप सुकं वाटलं तर पाण्याचा हात लावून गोळा मळून घ्या . त्यामध्ये बारीक चिरलेले उरलेले सर्व जिन्नस घाला . व्यवस्थित गोळा करून घ्या . या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या . आप्पेपात्र गरम करून त्यामध्ये तेल सोडून तयार केलेले आप्पे व्यवस्थित खमंग , खरपूस आणि सगळ्या बाजूने भाजून घ्या .

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow