गर्भधारणा होण्यासाठी किती कालावधी लागतो?

 0
गर्भधारणा होण्यासाठी किती कालावधी लागतो?

दोघांच्या नात्यावर वंध्यत्वाचा खूप ताण येतो. तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर तुमची गर्भधारणा झाली आहे की नाही किंवा होणार आहे कि नाही ह्या विचाराने मोठे मानसिक आणि भावनिक प्रश्न निर्माण होतात. गर्भधारणेविषयी जाणून घेतल्याने, तसेच गर्भधारणेसाठी किती वेळ लागू शकतो आणि वंध्यत्वाची कोणती लक्षणे आहेत हे माहित असल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी त्यावर वेळीच उपचार घेऊ शकता. तसेच कायम लक्षात ठेवा की गर्भधारणा झाली नाही म्हणून ताण घेण्याचे कारण नाही त्याऐवजी इतर अनेक पर्याय आहेत जसे की मूल दत्तक घेणे, सरोगसी किंवा IVF इत्यादी सारख्या उपचारांनी सुद्धा गर्भधारणा होऊ शकते.

गर्भधारणेचा प्रश्न किती प्रमाणात आढळतो?

जगातील बऱ्याच जोडप्यांमध्ये वंध्यत्व हा प्रश्न खूप सामान्यपणे आढळतो. त्याला कारणीभूत बरेच घटक आहेत जसे की जन्मतःच काही व्यंग असणे, फायब्रॉइड्स, पॉलीप्स इत्यादी. CDC च्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेत ६% -१२% महिलांना वंध्यत्वाचा त्रास आहे. काही अभ्यासाद्वारे असे दिसून आले आहे की १५% जोडपी वंध्यत्वाचा सामना करत आहेत.

गर्भधारणेसाठी खरंच किती वेळ लागतो?

लोक नेहमी विचारतात की गर्भधारणेला सरासरी किती वेळ लागतो? एखाद्या जोडप्याला बाळाची चाहूल लागण्यासाठीचा  काळ बऱ्याच घटकांवर अवलंबून असतो जसे की वजन, भावनिक आरोग्य, आहार, शारीरिक संबंधांची वारंवारिता आणि असे अनेक घटक. त्यामुळे काही जोडप्यांना पहिल्या प्रयत्नात यश मिळते तर काहींना २ वर्षे सुद्धा लागू शकतात.

१. शारीरिक संबंधांनंतर गर्भधारणेस किती वेळ लागू शकतो?

बऱयाच जोडप्यांना प्रयत्नांनंतर एका वर्षभरात यश येते परंतु गर्भधारणेसाठी प्रयत्न सुरु केल्यावर दोन वर्षे सुद्धा लागणे हे अगदी सर्रास पाहायला मिळते. त्यासाठी खूप घटक कारणीभूत असतात आणि त्यामध्ये तुमचे वय आणि शुक्राणूंचे आरोग्य ह्यांचाही समावेश होतो. काही जोडप्यांची प्रजननक्षमता जास्त असते आणि त्यामुळे त्यांच्यात लवकर गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते.

२. ‘डेपो’ नंतर गर्भधारणेसाठी किती वेळ लागतो?

डेपो म्हणजे महिलांमध्ये वापरले जाणारे एक प्रकारचे इनजेक्टेबल गर्भनिरोधक असून ते वापरल्याने ९९% यश मिळते. प्रत्येक ३ महिन्यांनी त्याची आवश्यकता असते आणि त्याचा परिणाम तेवढ्याच कालावधी साठी राहतो. तथापि, महिला १ वर्ष गर्भधारणेस अक्षम असल्याचे दिसून आले आहे त्यामागील कारण अज्ञात आहे.

सर्वेक्षणानुसार काय दिसून आले आहे?

प्रजननक्षमता आणि गर्भधारणेविषयी खूप सर्वेक्षणे इंटरनेट वर आढळतात. त्यापैकी महत्वाची काही खालीलप्रमाणे

  • आठ पैकी एका जोडप्यास गर्भधारणा होणे आणि नीट पुढे चालू ठेवणे हा त्रास होतो.
  • ९% महिला त्यांच्या संपूर्ण आयुष्यात वंध्यत्वावर कुठलेही उपचार घेत नाहीत.
  • १/३ वंध्यत्वाच्या प्रकरणांमध्ये स्त्रीमध्ये दोष असतो, १/३ प्रकरणांमध्ये पुरुषामध्ये दोष असतो आणि उरलेल्या १/३ प्रकरणांमध्ये दोघांमध्ये दोष असू शकतो किंवा त्याचे स्पष्टीकरण नसते.
  • २०% जोडप्याना पहिल्या महिन्यात यश येते, ७२% जोडप्यांना ६ महिने लागू शकतात तर ८४% जोडप्याना गर्भधारणा होण्यास एक वर्ष लागू शकते तर ९२% जोडप्याना २ वर्षे सुद्धा लागू शकतात.
  • ९% पुरुष वंध्यत्वाच्या चाचण्या, सल्ला आणि उपचार करून घेतात.

गर्भधारणेस इतका वेळ का लागतो?

जोडप्यांमध्ये गर्भधारणेस उशीर होण्याची बरीच कारणे आहेत. त्याचे कारण स्त्री किंवा पुरुष असू शकतो.

स्त्रीविषयक कारणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

    • पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS ): त्यामध्ये अंडाशयाचा आणि सिस्टचा आकार वाढतो https://oesterreichischeapotheke.com. ह्या आजारामध्ये स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात अँड्रोजेनची निर्मिती होते आणि त्यामुळे शरीराच्या निरोगी स्त्रीबीज निर्मिती प्रक्रियेत अडथळा येतो.

  • डिमिनिश्ड ओवॅरिअयन रीसर्व (DOR): काही स्त्रियांमध्ये स्त्रीबीजांची संख्या इतर स्त्रियांपेक्षा झपाट्याने कमी होते आणि त्यामुळे गर्भधारणेस अडथळा येतो. पिट्युटरी ग्रंथी आणि हायपोथॅलॅमस ह्यांचे कार्य बिघडते. ह्या ग्रंथी गर्भधारणेला अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यास जबाबदार असतात.
  • हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्रंथींचे कार्य नीट न होणे. गर्भधारणेसाठी आवश्यक स्थिती निर्माण करण्याचे कार्य ह्या ग्रंथी करतात.
  • प्रीमॅचुअर ओवॅरियन इनसफिशिअन्सी (POI): काही स्त्रियांची अंडाशय चाळीशीच्या आधी खराब होतात. ह्या स्थितीला लवकर रजोनिवृत्ती होणे असे म्हणतात.

गर्भधारणेला उशीर होण्यासाठी पुरुषांमध्ये खालील दोष आढळतात.

  • व्हॅरिकोसेलेस: ह्या परिस्थितीत  पुरुषांमधील अंडकोष मोठ्या आकारामुळे जास्त गरम होतात आणि त्यामुळे शुक्राणूंची संख्या आणि आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.

  • पुरुषांच्या अंडाशयाला आघात झाल्यास शुक्राणूंची संख्येवर त्याचा परिणाम होतो.
  • काही औषधे किंवा पूरक औषधांमुळे पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येत घट होते उदा: हृदयविकाराची औषधे, स्टिरॉइड्स आणि अँटिडिप्रेसंट्स.
  • कर्करोगावरील काही उपचार सुरु असतील तर निरोगी शुक्रजंतू निर्मितीच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होतो.
  • हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्रंथी संप्रेरकांच्या निर्मितीस जबाबदार असतात, ह्या संप्रेरकांमुळे निरोगी शुक्रजंतूंची निर्मिती होत आहे किंवा नाही ह्याची खात्री होते.
  • पुरुषांच्या प्रजननसंस्थेत कॅन्सरची किंवा साधी गाठ असणे.
  • आधी असलेल्या जनुकीय स्थितीमुळे पुरुषांमध्ये वंध्यत्व येते.

गर्भधारणेवर वयाचा कसा परिणाम होतो?

खूपशा स्त्रिया हल्ली उशिरा मुले होण्याला प्राधान्य देतात कारण त्यांना यशस्वी करियर करायचे असते तसेच काही वेळा आर्थिक कारण असू शकते. तसेच जोडप्याना एकमेकांना जाणून घेण्यासही वेळ हवा असतो. परंतु वयाच्या ३५ नंतर मुले होण्याची शक्यता कमी होते त्याची कारणे खालीलप्रमाणे:

  • स्त्रीबीजे सोडण्याची अंडाशयाची क्षमता कमी होते.
  • स्त्रीबीजे कमी असतात.
  • स्त्रीबीजांचे आरोग्य म्हणावे इतके चांगले नसते.
  • ह्या वयात इतर आजार असण्याची शक्यता जास्त असते.

वंध्यत्वावर उपचार

वेगवेगळ्या मार्गानी तुमचे डॉक्टर्स दोघांवर वंध्यत्वसाठी उपचार करतील. संप्रेरके नियंत्रित राहण्यासाठी औषधे, तसेच काही आधीचे आजार असतील तर त्यावर उपचार आणि गर्भधारणेसाठी जीवनशैलीतील बदल इत्यादी गोष्टींवर तुमचे डॉक्टर भर देतील.

तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी ह्याविषयी चर्चा केली पाहिजे आणि वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेतला पाहिजे. तुमच्या दोघांसाठी जो उपाय उत्तम असेल तो निवडा. जीवनशैलीतील बदल अमलात आणणे हे तुमच्यासाठी तुम्ही विचार केला त्यापेक्षा कठीण जाऊ शकते

गर्भधारणेची शक्यता वाढण्यासाठी काही टिप्स

जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर तेव्हा वंध्यत्व उपचारतज्ञांची मान्यता असलेल्या काही टिप्स खालील प्रमाणे:

  • नियमित शारीरिक संबंध ठेवा, कमीत कमी आठवड्यातून २-३ वेळा.
  • तुमच्या मासिक पाळी चक्रावर लक्ष ठेवा, त्यामुळे ओव्यूलेशन च्या वेळेला शारीरिक संबंध ठेवता येतील.
  • तुम्ही दोघेही ताणविरहित राहणे हा गर्भधारणेसाठी सोपा उपाय आहे कारण ताणामुळे स्त्रीमधील ओव्यूलेशनवर परिणाम होतो आणि पुरुषांमधील टेस्टेरॉन पातळी कमी होते.

गर्भधारणा होण्यासाठी खूप गोष्टी कारणीभूत आहेत. परंतु थोडा धीर धरणे आणि ताणविरहित राहणे हा सर्वात सोपा उपाय आहे. ह्या प्रश्नावर मार्गदर्शनासाठी चांगल्या तज्ञांचा सल्ला घेत आहात ना ह्याची खात्री करा. तसेच आता उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घ्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow