गरोदर असताना नारळपाणी पिणे

 0
गरोदर असताना नारळपाणी पिणे

उष्णकटिबंधीय देशांमध्ये नारळाची झाडे मुबलक प्रमाणात वाढतात आणि नारळाच्या पाण्यात औषधी गुणधर्म असल्याचे ज्ञात असल्यामुळे शतकानुशतके नारळ पाण्याचे सेवन केले जातेआजारी आणि सक्षम अशा दोघांना बर्‍याचदा नारळाच्या पाण्याची शिफारस केली जातेनारळ पेयाचा एक नैसर्गिकसुखदायक प्रभाव आहेते गर्भवती स्त्रियांसाठी देखील फायदेशीर आहे – नारळ पाणी पचन मार्ग नियमित करण्यास मदत करतेमॉर्निंग सिकनेसबद्धकोष्ठता आणि ह्यासारख्या बऱ्याच व्याधी नारळ पाणी कमी करतेआरोग्याविषयी जागरूक व्यक्ती देखील नारळाच्या पाण्याला प्राधान्य देतात कारण त्यात कोलेस्ट्रॉल नसते.

गरोदरपणात पोषक आहार घ्यायला सांगितला जातोम्हणजेच जास्त साखर असलेली कृत्रिम पेये सोडून दिली पाहिजेतनारळपाणी एक उत्कृष्ट पर्यायी पेय असू शकते जे पौष्टिक आणि चवदार आहे.

गरोदरपणात नारळाचे पाणी घेणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात थकवा येणे ही एक सामान्य समस्या आहे आणि यामुळे वेळोवेळी स्त्रीची उर्जा कमी होतेथकवा आणि दमून जाणे ह्या भावनांवर मात करण्यासाठीगरोदर स्त्रियांसाठी फायदेशीर ठरू शकणारे नारळ पाणी घेण्याचा सल्ला दिला जातोआवश्यक खनिज पदार्थ भरपूर प्रमाणात असल्याने दररोज एक ग्लास नारळ पाण्याची शिफारस केली जाते.

गरोदरपणात नारळाचे पाणी पिण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळीचकारण त्यात असलेली पोषकद्रव्ये आणि इलेक्ट्रोलाइट्स रिकाम्या पोटी सहज शोषले जाऊ जातातनारळ पाणी हे पोटॅशियमसोडियमआहारातील फायबरमध्यम साखरजीवनसत्त्वे आणि प्रथिने इत्यादींनी समृद्ध आहेगर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात मॉर्निंग सिकनेसमुळे डिहायड्रेशनचा सामना करण्यास नारळपाण्याची मदत होत असल्याचे आढळले आहेजास्त फायबर असल्यामुळेसकाळी एक ग्लास नारळ पाणी घेतल्यास बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होऊ शकतेगरोदरपणाच्या उत्तरार्धातनारळपाण्यात पोटेशियम समृद्ध प्रमाणात असल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होऊ शकतेतथापिनारळ पाण्यात कॅलरी जास्त असल्याने ज्या स्त्रियांमध्ये वजन वाढण्याची प्रवृत्ती असते त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजेनारळपाणी लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून देखील ओळखला जातोम्हणून गर्भवती महिलांना वारंवार बाथरूमला जाण्याची आवश्यकता भासू शकतेज्या स्त्रिया रक्तदाबसाठी औषधोपचार घेत आहेत त्यांनी नारळाच्या पाण्याचे सेवन करताना काळजी घ्यावी कारण नारळ पाण्यातील पोटॅशियमची पातळी रक्तदाब कमी करू शकते.

नारळपाण्याचे पौष्टिक मूल्य

अनादी काळापासूननारळपाणी आणि आरोग्यामध्ये सकारात्मक परस्पर संबंध आहेनारळपाणी केवळ संतुलित पौष्टिक पेयच नाही तर ते अतिशय स्फूर्तीदायक देखील आहेज्या स्त्रिया गरोदरपणात त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात त्यांनी दररोज एक ग्लास ताजे नारळ पाणी प्यायल्यास नुकसान भरपाई होऊ शकतेकारण नारळाचे पौष्टिक मूल्य थकवा आणि आळशीपणा दूर करते.

कॅलरी .४५
साखर .३ ग्रॅम
पोटॅशियम ७१ मिलिग्रॅम
सोडियम ३० मिलिग्रॅम
चरबी ६० मिलिग्रॅम
प्रथिने .२ ग्रॅम

नारळपाणी एक उत्तम नैसर्गिक पेय आहे जे जीवनसत्त्वेइलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे इत्यादींनी समृद्ध आहेनारळाच्या सुखदायक पाण्याने तहान प्रभावीपणे कमी केली जाऊ शकतेसंशोधकांनी असे सिद्ध केले आहे की नारळपाणी एक प्रभावी रीहायड्रेशन द्रव्य म्हणून मदत होऊ शकतेपरंतुह्याचा अर्थ इतर निरोगी पदार्थ प्रतिबंधित असावेत असा होत नाहीपोषण आणि पोषणमूल्ये ह्यांचे संतुलन नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे.

गर्भवती महिलांसाठी नारळाच्या पाण्याचे आरोग्यविषयक फायदे

नारळपाणी एक कोलेस्ट्रॉल विरहित पेय आहे आणि ते कधीही प्यायले तरी चालतेगर्भवती महिलांसाठी नारळाच्या पाण्याचे आरोग्यासाठी अफाट फायदे आहेत.

  1. नारळपाणी गर्भवती स्त्रीची प्रतिकारशक्ती वाढवते आणि तिचे व बाळाचे संरक्षण करते कारण ते जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडेंट्सनी समृद्ध असते.
  2. तंतुमय पदार्थ अधिक प्रमाणात असल्यामुळे बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते.
  3. नारळपाणी एक नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ असल्यानेते शरीरातील यूरिक ऍसिडची पातळीस संतुलित करतेविषारी द्रव्ये बाहेर टाकते आणि मूत्रमार्ग साफ करते.
  4. मॅग्नेशियमपोटॅशियम आणि इतर खनिजांमुळे गर्भावस्थेदरम्यान आवश्यक असलेल्या लघवीच्या वाढीव उत्पादनास मदत होतेत्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो.
  5. अतिसार आणि उलट्या झाल्यामुळे होणारे डिहायड्रेशन रोखण्यासाठी आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स देखील नारळ पाण्यातून मिळ्तातअतिसार आणि उलट्या ही मॉर्निंग सिकनेसची दोन प्रमुख लक्षणे आहेत.
  6. पोटॅशियम आणि फॉस्फरस मुळे ऊर्जा पातळी वाढते.
  7. नारळ पाण्यामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी आहे त्यामुळे नारळ पाण्यामुळे शरीरात चरबी जमा होण्यापासून रोखली जाते तसेच शरीरातून खराब कोलेस्ट्रॉल निर्मूलन करण्यास देखील मदत होतेम्हणूनचते साखरयुक्त पेयांऐवजी नारळपाणी घेतल्यास तो एक आदर्श बदल आहे.
  8. गरोदरपणात हार्मोनल बदलांमुळे छातीत जळजळ होऊ शकतेनारळपाणी घेतल्यास ती कमी होते
  9. नारळाच्या पाण्यातील लॉरिक ऍसिडमुळे हानिकारक जीवाणू नष्ट करणार्‍या अँटीव्हायरसच्या निर्मितीस मदत होते.
  10. नारळाच्या पाण्यात साखरेचे प्रमाण कमी असल्याने गरोदरपणात मधुमेहाचा धोका कमी होतो.
  11. नारळाच्या पाण्यामुळे शरीराचे हायड्रेट्स वाढतेज्यामुळे त्वचेची लवचिकता वाढते आणि त्यामुळे गरोदरपणात शरीरात स्ट्रेच मार्क्सचे प्रमाण कमी होते.

ह्या पेयाच्या फायद्याचा आनंद घेण्यासाठीकापल्यानंतर लगेचच सेवन केले पाहिजेआहारात नारळपाणी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गरोदर असताना नारळपाणी प्यायल्यास त्याचे काही दुष्परिणाम आहेत का?

सामान्यपणे नारळपाण्यामुळे गर्भवती स्त्रियांना कुठलाच त्रास होत नाहीतथापिते योग्य प्रमाणात घेतले पाहिजे कारण त्यामुळे रक्तदाब कमी होतोतुम्हाला जर रक्तदाबाची समस्या असेल तर नारळ पाणी पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

नारळपाणी पिताना घ्यायची खबरदारी

तिसऱ्या तिमाहीत स्त्रियांना नारळ पाणी पिण्यास प्रोत्साहित केले जाते कारण ह्या काळात शरीरास पोषणमूल्ये आवश्यक असतातनारळ कापल्यानंतर लगेचच खातात कारण तेव्हा ते अधिक पोषक असताततथापिहे लक्षात घेतले पाहिजे की परिपकव नारळ हानिकारक असू शकते कारण यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते आणि एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरील चरबी देखील वाढू शकते.

सोडियम किंवा पोटॅशियमचा प्रमाणाबाहेर शरीरात जाऊ नये म्हणून नारळ पाण्याचे सेवन दिवसाला एका ग्लास इतकेच मर्यादित ठेवणे चांगलेनारळाच्या पाण्याचा शरीराच्या मूत्रमार्गावर परिणाम होतोत्यामुळे गर्भवती स्त्रियांना अस्वस्थता वाटू शकते कारण त्यांना सतत लघवीला जाण्याची तीव्र इच्छा वाढेलकाही डॉक्टर शस्त्रक्रियेच्या दोन आठवडे आधी नारळपाणी पिणे थांबवण्याची शिफारस करतातकारण शल्यक्रिया होण्याआधी आणि नंतर रक्तदाब नियंत्रणास त्यामुळे अडथळा येऊ शकते.

गरोदर असताना नारळपाणी पिण्यामागच्या दंतकथा

आरोग्यासाठी जागरूक लोकांनी नारळाच्या पाण्याच्या फायद्यांचे समर्थन केले असूनहीगरोदरपणात नारळ पाण्याचे सेवन करण्याबद्दल काही मिथके आहेत जी आपल्याला माहित असावीत.

नारळाच्या पाण्यात पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात जी गर्भवती महिलेची आहारातील आवश्यकता पूर्ण करतातही दंतकथा चांगली नाही कारण गर्भवती महिलेस निरोगी प्रसूतीसाठी फळेभाज्या आणि इतर खाद्यपदार्थांचे चांगले पोषण आवश्यक आहे.

जर एखाद्या गर्भवती स्त्रीने दररोज नारळाचे पाणी घेतले तर बाळाचे केस दाट वाढतीलया विधानाला शास्त्रीय पाठिंबा नाही.

नारळाच्या पाण्यामुळे गर्भवती महिलांमध्ये ऍसिडिटी वाढतेहे सिद्ध झाले आहे की गर्भवती स्त्रीचा वाढणारा पोटाचा आकार हे आम्लतेचे मुख्य कारण असतेजे शक्यतो अन्नाचे पचन करण्यास देखील हस्तक्षेप करतेपचनास मदत करण्यासाठी व्यायाम करणे हा त्यासाठी उत्तम उपाय आहेहे लक्षात घेतले पाहिजे की गरोदरपणात प्रत्येक गोष्ट प्रमाणात असली पाहिजे आणि नारळाचे पाणी पिणे ही एक सुद्धा अशीच गोष्ट आहे.

नारळाच्या पाण्यामुळे बाळाची त्वचा उजळ होतेहा समज निराधार आहे कारण बाळाचा रंग फक्त अनुवांशिकतेवर आधारित असतो आणि कोणत्याही बाह्य पदार्थाच्या सेवनाने कोणत्याही प्रकारे बदल होत नाही.

गर्भवती महिलांसाठी नारळपाणी हा हायड्रेशनचा सर्वोत्तम स्त्रोत आहेजरी नारळ पाण्यामुळे डिहायड्रेशनचा सामना करता आला तरी तुम्ही नेहमीच किमान दररोज आठ ग्लास पाणी प्यायले पाहिजे.

गर्भवती असताना किती प्रमाणात नारळाचे पाणी प्यावे?

गरोदरपणात नारळ पाण्याचे प्रमाण चर्चेत असतेआदर्श प्रमाण हे दररोज एका ग्लासपुरते मर्यादित असावेहे प्रमाण गर्भवती स्त्रीसाठी आदर्श आहे आणि दररोज आवश्यक पौष्टिक पोषक आहार प्रदान करू शकतेउलट्या किंवा कोणतीही अस्वस्थता टाळण्यासाठी आपल्याला चव आवडत नसेल तर नारळाचे पाणी टाळणे चांगले.

नारळाच्या पाण्याचा स्वाद वेगवेगळा का असतो?

नारळाच्या पाण्याची चव बहुतेकदा प्रत्येक फळात भिन्न असतेसेंद्रिय पद्धतीने वाढवलेल्या झाडांच्या तुलनेत खत वापरलेल्या नारळाच्या झाडांच्या नारळपाण्याची चव वेगवेगळी असू शकते.

नारळाचे विविध प्रकार आहेत जे मोठ्या प्रमाणात परिचित आहेत – उंच वाणबटू प्रकार आणि संकरित वाणउंच जातीमध्ये नारळाच्या पाण्याची चव इतर जातींपेक्षा गोड असतेसंकरीत वाणांना तशीच गोड चव असेल असे नाहीबटू वाणची चव देखील गोड असतेपरंतु त्यात उंच जातीचे गुणधर्म नसतातजर नारळपाणी त्वरित सेवन केले गेले नाही तर चवदेखील वेगळी असू शकते कारण सूर्याच्या संपर्कात आल्यामुळे ते आंबवल्यासारखे होते.

मी योग्य नारळ कसा निवडायचा?

नारळाच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठीहिरव्या वाणांची निवड करणे चांगले आहे – त्यात गोड आणि भरलेले पाणी आहे जे गर्भवती महिलेच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेआपल्या पैशाचे मूल्य मिळविण्यासाठीत्यात किती पाणी आहे हे समजण्यासाठी नारळ खरेदी करण्यापूर्वी हलवून पहानारळ निवडतानातो हिरवा आहे ह्याची खात्री करातपकिरी रंगाचे डाग नाहीत ना हे तपासून पहातसेच तो खराब नाही ना हे पहा.

जर नारळ कापून ठेवला असेल आणि नंतर दिला असेल तर त्यात जास्त पल्प आणि कमी पाणी असेलपोटॅशियम आणि सोडियमची उच्च सामग्री असल्यामुळे हा पल्प गर्भवती महिलांसाठी योग्य नसतोअसे आढळून आले आहे की ज्या झाडाचे वय ५ ते ७ महिन्यांच्या दरम्यान आहे त्या झाडाच्या नारळाचे पाणी चवदार आणि पौष्टिक मूल्यांनी भरलेले असेल.

नारळांची गुणवत्ता देखील समुद्रकिनारी असलेल्या झाडांच्या अंतरावर आणि मातीच्या खारटपणावर अवलंबून असतेहवामानाची परिस्थिती देखील नारळाच्या पाण्याचे प्रमाण निश्चित करतेसंपूर्ण नारळ तोडल्यानंतर लगेच त्याचे सेवन करणे चांगलेनाहीतर नारळ खराब होऊन नारळ पाण्याला आंबट चव येईल आणि त्यास उग्र वास येईल.

नारळपाण्याची चवसुखदायक परिणाम आणि पोषक तत्वांच्या विपुलतेमुळेगरोदर स्त्रीसाठी नारळपाणी पिणे हा एक चांगला पर्याय आहेइतर कोणताही खाद्यपदार्थ किंवा पेयाप्रमाणेच नारळ पाणी सुद्धा प्रमाणात घेतले पाहिजे म्हणजे तुम्हाला त्याचे फायदे मिळतील आणि तुमच्या बाळावर किंवा तुमच्यावर त्याचे काहीही दुष्परिणाम होण्याची भीती राहणार नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow