स्त्रियांची प्रजननक्षमता वाढवण्यासाठी १६ उत्तम योगासने

 0
स्त्रियांची प्रजननक्षमता वाढवण्यासाठी १६ उत्तम योगासने

हल्ली ताण इतका वाढलाय की त्यामुळे बऱ्याच स्त्रियांना ताणामुळे गर्भधारणा होणे कठीण झाले आहे कारण ताणामुळे मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो.

डब्लू एच ओ ने प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणानुसार १५% जोडपी बाळ होण्यासाठी उपचार घेतात त्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी लोकप्रिय पर्याय म्हणजे, ‘प्रजनन योग’

प्रजनन योग म्हणजे काय?

योग ही ५००० वर्षे जुनी परंपरा आहे आणि त्यामुळे तुमचे मन, शरीर आणि आत्म्यामध्ये क्रांतिकारक बदल होतात.

प्रजनन योग म्हणजे काही वेगळे नाही परंतु त्यामुळे तुमच्या गर्भधारणेची शक्यता वाढते तसेच योगाच्या वेगवेगळ्या स्थिती आणि आसनांमुळे ताण कमी होण्यास मदत होते आणि शरीरातून विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात.

ही वेगवेगळी आसने म्हणजे गर्भधारणेसाठी उत्तम उपाय आहेत कारण त्यामुळे शरीर ताणले जाते आणि गर्भधारणेची शक्यता वाढते.

हार्वर्ड विद्यापीठाने असे सिद्ध केले आहे की ज्या स्त्रियांनी प्रजनन योगाचे कोर्सेस केले त्यांची कोर्सेस न केलेल्यांच्या तुलनेत गर्भधारणेची शक्यता वाढली.

वंध्यत्वाची महत्वाची कारणे कुठली?

१. वय

वयानुसार स्त्रीची प्रजनन क्षमता कमी होते विशेषतः वयाच्या पस्तिशीनंतर प्रजननक्षमता कमी होण्याचे प्रमाण जास्त आहे. ह्याचे प्राथमिक कारण म्हणजे स्त्रीच्या शरीरात जन्माला येताना आयुष्यभराची स्त्रीबीजे असतात आणि त्यांची संख्या आणि गुणवत्ता वयानुसार कमी होते.

२. तंबाखू

धुम्रपानामुळे प्रजननक्षमतेवर परिणाम होतो आणि त्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. सिगारेटमध्ये विषारीद्रव्ये असतात आणि त्याचा प्रजनन संस्थेवर दुष्परिणाम होतो.

३. मद्य

प्रजननक्षमतेवर मद्यपानाचा  नक्की काय परिणाम होतो ह्याची पुराव्यानिशी माहिती नसली तरी जगभरातल्या वेगवेगळ्या सर्वेक्षणानुसार नियमित मद्यपान केल्याने वंध्यत्वाचा धोका वाढतो.

४. खाण्याच्या अयोग्य सवयी

खाण्याच्या अयोग्य सवयी आणि बैठ्या जीवनशैलीमुळे वंध्यत्वाची शक्यता वाढते. खाण्याच्या विकृतीमुळे मासिक पाळी अनियमित होते, ह्यास इंग्रजीमध्ये ‘Amenorrhea’ असे म्हणतात आणि त्यामुळे प्रजनक्षमता कमी होते.

५. बीजवाहिनी आणि गर्भाशयाला इजा

बीजवाहिन्या तसेच प्रजनन संस्थेचे अवयव ह्यांना आधी झालेल्या संसर्गामुळे तसेच काही वैद्यकीय आजारांमुळे इजा पोहोचते. त्यामुळे शुक्रजंतूंचे स्त्रीबीजाकडे वहन होत नाही किंवा फलित स्त्रीबीजाची  गर्भाशयाकडे नीट हालचाल होत नाही त्यामुळे वंध्यत्व येते.

६. ताण

ऑफिस, कुटुंब किंवा अन्य काही कारणांमुळे आलेल्या ताणाचा शरीरावर परिणाम होतो. गर्भधारणेची शक्यता कमी होते. गर्भधारणा झाली नाही तर पुन्हा ताण वाढतो आणि हे चक्र सुरु राहते, जे थांबणे जरुरीचे आहे.

प्रजनन योगामुळे वरील सर्व कारणांवर मात करणे शक्य होते. योगा करून तुम्ही वंध्यत्वाचा प्रश्न सोडवू शकता त्यामुळे तुमची गर्भधारणेची शक्यता वाढेल तसेच तुमचा फिटनेस सुद्धा वाढेल.

आसनांमुळे प्रजननक्षमता कशी वाढते?

निरोगी शरीर आणि शांत मन हे दोन घटक गर्भधारणेसाठी आवश्यक आहेत. प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी योग करणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे ज्यामुळे तुमचे शरीर मजबूत होते आणि शरीराचे कंडिशनिंग होते. योगामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारते. काही आसनांमुळे  शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही फायदे होतात.

नियमितपणे ही आसने केल्यास वंध्यत्वासाठी ती उपचारपद्धती होऊ शकते.

गर्भधारणा आणि प्रजननासाठी योगासनांचे फायदे

तुम्हाला कुटुंबाची सुरुवात करायची असल्यास योग करणे हा उत्तम मार्ग आहे. स्त्रीची प्रजननक्षमता वाढवण्यासाठी योग करण्याचे फायदे खालीलप्रमाणे:

  • योगामुळे ताण कमी होतो

योग करताना होणाऱ्या श्वसनाच्या व्यायामुळे तुमच्या शरीरातील कॉर्टिसॉल नावाचे संप्रेरक कमी होते आणि त्यामुळे तुमची गर्भधारणेची आणि निरोगी बाळ होण्याची शक्यता वाढते. ताण कमी झाल्यामुळे तुम्हाला रात्रीची चांगली झोप लागते आणि विषारी द्रव्ये सुद्धा बाहेर पडतात.

  • योगामुळे रक्ताभिसरण वाढते

योगामुळे जुनाट आजारांवर मात करता येते आणि त्यामुळे आरोग्यपूर्ण प्रजननातील अडथळे नाहीसे होतात. योगा केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात.

रक्ताची गुणवत्ता वाढते आणि गर्भधारणा तसेच गर्भाच्या विकासाची खात्री होते.

  • योगामुळे संप्रेरकांचे संतुलन राखण्यास मदत होते

संप्रेरकांच्या असंतुलनामुळे बाळ न होणे ह्यामुळे खरंच ताण वाढतो आणि त्यामुळे फक्त शारीरिक नव्हे तर भावनिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो. योगामुळे मन शांत राहते तसेच संप्रेरके नियंत्रित राहतात नाहीतर त्यांचे असंतुलन होते.

गर्भधारणेसाठी योग केल्याने तुमच्या शरीरातील अनावश्यक संप्रेरकांमधील बदल टळतात ज्याचा गर्भधारणेत अडथळा येतो.

  • योग केल्याने अंडाशय निरोगी राहतात

अंडाशयाचे कार्य नीट न होणे हे स्त्रियांमधील वंध्यत्वाचे प्रमुख कारण आहे. वैद्यकीय उपचारांव्यतिरिक्त योग करणे हा अंडाशयाशी निगडित आजार बरे करण्याचा उत्तम मार्ग आहे.

गर्भधारणेसाठी योग केल्याने तुमच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा येईल.

निरोगी शरीर गर्भधारणा प्रेरित करणाऱ्या औषधांना सुद्धा चांगला प्रतिसाद देते.

लवकर गर्भधारणा होण्यासाठी १६ सर्वोत्तम आसने

गर्भधारणेसाठी खालील आसने करा आणि तुमच्या वंध्यत्वाशी लढ्यास सुरुवात करा. ही आसने नियमित केली पाहिजेत म्हणजे तुमच्या शरीरास त्याची सवय होईल.

१. भ्रमरी प्राणायाम

भ्रमरी प्राणायामामुळे  ताण आणि चिंता कमी होण्यास मदत होते. ताण हे वंध्यत्वाचे प्रमुख कारण असल्याने भ्रमरी प्राणायाम केलेच पाहिजे.

हे आसन कसे करावे

१. डोळे बंद करून शांतपणे बसा

२. तुमची तर्जनी (index finger) कानावर ठेवा म्हणजे आजूबाजूचा आवाज येणार नाही

३. दीर्घ श्वास घ्या आणि गुणगुणत (Humming) श्वास सोडा

४. ५-६ वेळा असे करा. प्रत्येक आवर्तन दीर्घ काळ राहील ह्याचा प्रयत्न करा.

२. पश्चिमोत्तासन

पश्चिमोत्तानास इंग्रजीत ‘Seated Forward Fold’ असे म्हणतात. ह्या आसनामुळे कंबरेचे, कुल्ल्यांचे स्नायू ताणले जातात. स्त्रियांमधील प्रजननक्षमता वाढवण्यासाठी हे आसन उपयोगी पडते कारण ह्या आसनामुळे  वेगवेगळ्या अवयवांना म्हणजेच अंडाशय, पोट इत्यादींना ऊर्जा मिळते तसेच मानसिक ताण सुद्धा ह्यामुळे कमी होतो.

हे आसन कसे करावे?

१. पाय ताणून पायाचे अंगठे तुमच्याकडे होतील असे बसा

२. श्वास घ्या आणि तुमच्या डोक्याजवळ हात वरती घ्या

३. हळू हळू, पाठीचा कणा ताठ ठेवून डोके पायावर टेकवा

४. दोन मिनिटे ह्याच स्थितीत बसा

५. श्वास घ्या आणि पुन्हा डोके वर  घेऊन पूर्वस्थितीत बसा आणि श्वास सोडा

६.तुम्हाला आरामदायक वाटेपर्यंत असे ५-६ वेळेला करा

३. हस्तपादासन

इंग्रजीत ‘standing forward bend’ ह्या नावाने हे आसन प्रसिद्ध आहे, हस्तपादासनामध्ये तुमच्या पाठीचे आणि पोटाचे स्नायू ताणले जातात तसेच शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. ह्या आसनामुळे तुमचे शरीर लवचिक होते आणि पोटाकडील भागाचा ताण कमी होतो.

हे आसन कसे करावे

१. ताठ उभे राहा आणि हात वर करा

२. हळूहळू पुढे वाका आणि पायांचे अंगठे हाताने धरण्याचा प्रयत्न करा. असे करताना गुडघ्यात वाकू नका. जर तुम्ही पायांना स्पर्श करू शकला नाहीत तरी जितका खाली वाकता येईल तितके वाका.

३ त्याच स्थितीत एक मिनिट राहा आणि हळू हळू पुन्हा उभे राहा

४. १०-१२ वेळा पुन्हा असे करा, तुम्हाला सरावाने पायाला स्पर्श करता येईल.

४. जनु शीर्षासन

हे आसन फक्त गर्भधारणेसाठीच महत्वाचे नाही तर गरोदरपणात सुद्धा उपयोगी आहे.

हे आसन  वंध्यत्वाच्या उपचारपद्धतीत प्रसिद्ध आहे तसेच ह्याला ‘one legged forward bend ‘ असे सुद्धा म्हणतात. ह्या आसनामुळे गुडघ्याच्या मागचे स्नायू ताणले जातात तसेच पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो.

हे आसन कसे करावे?

१. पाय पसरून आरामात बसा

२. डावा पाय मुडपून आत घ्या आणि उजवा पाय सरळ ताणून ठेवा. जितके शक्य होईल तितके पुढे वाका जेणे करून तुमच्या उजव्या पायाचे पाऊल तुमच्या हातात येईल.

३. ह्या स्थितीत ३० सेकंद रहा आणि पुन्हा पूर्वस्थितीत या. आता तुमचा उजवा पाय मुडपा आणि डावा पाय सरळ ताणून ठेवा आणि वरची प्रक्रिया पुन्हा करा.

४. तुमच्या डाव्या पायाच्या पावलाला तुम्हाला स्पर्श करता येईल इतके खाली वाका ह्या स्थितीत काही वेळ रहा आणि पुन्हा पूर्वस्थितीत या आता तुमचे आसन पूर्ण झाले आहे.

५. ही प्रक्रिया  ४-५ वेळा करा.

५. बद्ध कोनासन

ह्या आसनास ‘Butterfly Pose’ असे सुद्धा म्हणतात. ह्या आसनामुळे तुमच्या शरीराची लवचिकता वाढते तसेच मांड्यांच्या आतल्या भागाचे, जननेंद्रियांच्या भागातील  तसेच कुल्ल्याचे आणि गुडघ्यांचे स्नायू ताणले जातात. हे उपयोगी पडणाऱ्या आसनांपैकी एक आहे आणि वेदनारहित आणि सुलभ प्रसूतीसाठीसुद्धा ह्या आसनाची मदत होते.

हे आसन कसे करावे

१. आरामात ताठ बसा

२. तुमचे पाय आत वळवा  जेणेकरून तुमच्या पायांच्या टाचा एकमेकांना टेकतील

३. दोन्ही पावले हातात घेऊन तुमच्या श्रोणीकडे जितके ओढून घेता येईल तितके घ्या

४. पावले हातात घेऊन गुडघे आणि मांड्या फुलपाखराप्रमाणे वर खाली करा

५. ह्या आसनाचा जास्तीत जास्त सराव करा म्हणजेच दिवसातून ५-१० वेळा करणे हे उत्तम.

६. सुप्त बद्धकोनासन

ह्या स्थितीमुळे मांड्यांचे आतील भागाचे स्नायू बळकट होतात. मासिक पाळीच्या काळातील पोटदुखी आणि ताणसुद्धा ह्या आसनामुळे कमी होतो.

हे आसन कसे करावे?

१. जमिनीवर पाठीवर झोपा. गरज भासल्यास उशी घ्या आणि उशीवर मान ठेवा

२. दोन्ही हात वर घेऊन नमस्काराच्या स्थितीत ठेवा

३ .पाय गुडघ्यात वाकवून टाचा जमिनीला टेकतील अशा स्थितीत ठेवा

४. गुडघे दोन्ही बाजून ताणा  जेणेकरून पावले एकमेकांना टेकतील

५. ह्या आसनाच्या स्थितीत ७-८ मिनिटे रहा

७. बालासन

ह्या आसनामुळे ताण कमी होतो आणि रक्तप्रवाह वाढतो त्यामुळे प्रजननक्षमता वाढते. ह्या आसनामुळे पाठ, गुडघे, कुल्ले आणि मांडीचे स्नायू ताणले जातात. हे आसन करण्याआधी पोट रिकामे हवे त्यामुळे जेवणाआधी कमीत कमी ६ तास हे आधी करायला हवे.

हे आसन कसे करावे?

१. जमिनीवर पालथी मांडी घालून बसा

२. गुडघ्यातून पाय थोडे बाजूला घ्या  आणि हळू हळू पुढे वाका

३. हात ताणून पुढे किंवा मागे ठेवा

४. ह्या स्थितीत तुम्हाला जितके शक्य होईल तितका वेळ राहा. नॉर्मल श्वास घेत राहा.

८. कपालभाती प्राणायाम

कपालभाती हे प्रसिद्ध आसन आहे आणि बऱ्याच विकारांसाठी ह्याचा फायदा होतो. ह्या आसनामुळे मन ताजेतवाने होते आणि ताण लगेच हलका होतो आणि तुम्ही अधिक सकारात्मक होता.

हे आसन कसे करावे?

१. आरामदायक व्हा आणि डोळे बंद करून ताठ बसा

२. नाकपुड्यानी खोल श्वास घ्या आणि पोट आत खेचले जाईल अशा पद्धतीने जोरात सोडा

३. हे आसन ५ मिनिटांसाठी करा आणि तुमच्या शरीर आणि मनातील बदलाचा अनुभव घ्या.

९. सर्वांगासन

सर्वांगासनाला इंग्रजीमध्ये ‘shoulder stand’ असे म्हणतात. त्यामुळे थायरॉईडचा आजार कमी होतो तसेच ताण सुद्धा कमी होतो. हे आसन म्हणजे वंध्यत्वासाठी खूप परिणामकरक आसन  आहे कारण ते थायरॉईडवर ते काम करते.

स्त्रियांमध्ये थायरॉईड हे वंध्यत्वाचे मुख्य कारण आहे, कारण थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (TSH) मुळे आरोग्याची गुंतागुंत वाढते आणि तुमच्या गर्भधारणेत अडथळा येऊ शकतो.

१. दोन्ही हात बाजूला घेऊन जमिनीवर झोपा

२. हळू हळू पाय गुडघ्यात वाकवा आणि जमिनीला टेकतील असे ठेवा

३. तुमच्या ओटीपोटाचा भाग वर उचला आणि शरीराचे संतुलन हातांवर करा आणि पाय जमिनीवर घट्ट ठेवा.

४. ह्या स्थितीमध्ये १०-१५ सेकंद रहा.

हे आसन कसे करावे?

१. पाय सरळ ठेवून तुमच्या पाठीवर झोपा

२. ९० अंशाच्या कोनात तुमचे पाय वर घ्या आणि तुमच्या तळव्याच्या साहाय्याने कंबर वर उचला

३. ह्या स्थितीत ५० ते १०० सेकंद रहा

४. तुम्हाला शक्य होईल  तसे  ५-१० वेळा हे आसन पुन्हा करा

१०. सेतू बंधासन

‘Bridge Pose’ ह्या नावाने हे आसन  प्रसिद्ध आहे. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह वाढतो त्यामुळे मज्जासंस्था आणि मेंदूला शांतपणा मिळतो.

हे आसन कसे करावे?

१. दोन्ही हात बाजूला घेऊन जमिनीवर झोपा

२. हळू हळू पाय गुडघ्यात वाकवा आणि जमिनीला टेकतील असे ठेवा

३. तुमच्या ओटीपोटाचा भाग वर उचला आणि शरीराचे संतुलन हातांवर करा आणि पाय जमिनीवर घट्ट ठेवा.

४. ह्या स्थितीमध्ये १०-१५ सेकंद रहा.

११. भुजंगासन

कोब्रा नागाप्रमाणे भुजंगासनाची स्थिती असते. ह्यामुळे लवचिकता वाढते आणि पोटाचा पोत सुधारतो पाठ आणि खांदे बळकट होतात आणि रक्ताभिसरण सुधारते.

हे आसन कसे करावे?

१. जमिनीवर पोटावर झोपा

२. पाय जुळवून घ्या आणि हात बाजूला ठेवा

३. खूप दीर्घ श्वास घ्या आणि तुमच्या शरीराचा वरचा भाग जमिनीपासून वर उचला आणि ताण देऊन शरीराचा वरचा भाग मागे घ्या

४.श्वास सोडून हळू हळू आधीच्या स्थिती मध्ये या

१२. विपरीत करणी

ह्या आसनामुळे चिरतरुण राहतो तसेच ओटीपोटाजवळील भागात रक्ताभिसरण सुधारते. शारीरिक संबंधांनंतर ह्या आसनामुळे तुमची गर्भधारणेची शक्यता वाढते.

हे आसन कसे करावे

१. पाठीवर झोपा आणि पाय ताणा

२. हळू हळू ९० अंशाच्या कोनामध्ये पाय वर घ्या. ह्या स्थितीत तुम्हाला जितका वेळ शक्य आहे तितके रहा.

३.५-८ वेळा हे आसन पुन्हा करा.

१३. नाडी शोधन प्राणायाम

ह्या योगस्थितीत अनुलोम विलोम किंवा एका वेळी एकाच नाकपुडीने श्वास घ्यावा लागतो म्हणून हे आसन प्रसिद्ध आहे, ह्या आसनामुळे  तुमच्यातील नकारात्मक भावना, ताण आणि औदासिन्य नाहीसे होते.

हे आसन कसे करावे?

१. आरामदायक स्थिती मध्ये ताठ बसा

२. तुमच्या उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवा आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्या

३. आता डावी नाकपुडी दाबून उजव्या नाकपुडीने श्वास घ्या

४. ही क्रिया ५ मिनिटे करा

१४. उपविस्थ कोनासन

उपविस्थ कोनासन म्हणजे स्नायू ताणले जाण्याची योगस्थिती. ह्या योगासनामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात, मांड्याचे स्नायू ताणले जातात पाठीच्या मणक्याला बळकटी मिळते आणि शरीर आणि मन शांत होते .

हे आसन कसे करावे?

१. सुरुवात करताना, दोन्ही पाय १८० डिग्रीच्या कोनात पसरवून ठेवा

२. दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू जितकं खाली वाकता येईल तेवढे वाका

३. एका मिनिटासाठी त्याच स्थितीत रहा

४. श्वास सोडा आणि पुन्हा पूर्वस्थितीत या

५. ही प्रक्रिया पुन्हा ५ वेळा करा.

१५.सालंब शीर्षासन

सालम्ब शिर्सासन म्हणजे डोक्यावर उभे राहून संपूर्ण शरीर पेलण्याची योग स्थिती होय, त्यामुळे ही योग स्थिती खूप आव्हानात्मक आणि प्रजननक्षमता वाढवण्यासाठी परिणामकारक आहे.

हे आसन कसे करावे?

१. डोक्याखाली आधारासाठी मऊ गादी किंवा उशी घ्या

२. दोन्ही हातांच्या मध्ये डोके जमिनीवर ठेवा

३. तुमच्या संपूर्ण शरीराचे वजन डोक्यावर आणि हातावर घ्या आणि आता पाय वर घ्या आणि संपूर्ण शरीर  डोक्यावर संतुलित करा.

४.जितका वेळ ह्या स्थितीत राहता येईल तितका वेळ रहा.

१६. शवासन

हे आसन त्याच्या सोपेपणामुळे आणि साधेपणामुळे प्रसिद्ध आहे. ह्या आसनाचे नाव मृत शरीराच्या सारख्या स्थितीमुळे ठेवण्यात आले आहे. ह्या आसनास इंग्रजीमध्ये ‘corpus posture’ असे म्हणतात. सर्व योगासने करून झाल्यावर हे आसन केले जाते त्यामुळे शरीरास आराम पडतो.

हे आसन कसे करावे?

१. जमिनीवर पाठीवर झोपा

२. नॉर्मल श्वासोच्छवास सुरु ठेवा आणि काही मिनिटांसाठी आरामात रहा

वंध्यत्वाच्या उपचारासाठी योग समग्र दृष्टिकोन निर्माण करण्यास मदत करते. तथापि, तुम्ही वंध्यत्वाच्या कारणाचे अचूक निदान करून डॉक्टरांकडून योग्य ते उपचार घेतले पाहिजेत. जेव्हा प्रश्नाचे अचूक निदान होते आणि योग्य उपचारपद्धतींची शिफारस केली जाते तेव्हा  तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात त्या कुटंबांच्या नव्या सदस्याचे स्वागत करण्यास तयार असाल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow