उडिदाची आमटी

उडिदाची डाळेंची आमटी हा आपल्या महाराष्ट्रात अगदी सहज आढळून येणार पारंपरिक पदार्थ आहे उडीद हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे उडीद पचायला खूप हलके असते उडदाची डाळ मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर आहे. तसेच, सांधेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते. उडीद ची आमटी हि सर्दी साठी गरम गरम प्यायला खूप फायदेशीर असते

 0
उडिदाची आमटी
उडिदाची आमटी

उडिदाची आमटी

 साहित्य :

२५० ग्रॅम आख्खे उडीद

२ कांदे

१ चमचा वाटलेले .

आले - लसूण

अर्धा चमचा जिरे

१ चमचे धनेपूड

२ हिरव्या मिरच्या

अर्धा चमचा तिखट

२ मोठे चमचे चांगले तूप किंवा लोणी

२ चमचे मीठ

४ चमचे चिरलेली कोथिंबीर

अर्था चमचा गरम मसाला

कृती :

 डाळ धुवून तीन तास भिजत ठेवावी . कांदे बारीक चिरावे . मिरच्यांना उभी चीर द्यावी . डाळीत कांदा , मिरच्या , आले - लसूण , जिरे , धनेपूड , तिकट घालून प्रेशरकुकरमध्ये डाळ शिजवावी .( प्रेशरटाईम -१५ मिनिटे ) कुकर निवाल्यानंतर उघडून डाळ चांगली घोटावी व पुन्हा चुलीवर मंद उकळत ठेवावी . मीठ घालावे व पुन्हा २-२ उकळ्या आल्या की वरून लोण्याचा गोळा , गरम मसाला व कोथिंबीर घालून वाढावी . पार्टीसाठी करायची असल्यास गरम डाळीवर अमूल लोण्याची एक वी किंवा चमचाभर गोळा घालून टेबलावर ठेवावी . हे वरण अतिशय पौष्टिक आहे व थंडीच्या दिवसात अवश्य करावे .

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow