गर्भधारणेदरम्यान योनिमार्गातून रक्तस्त्राव किंवा हलके डाग

 0
गर्भधारणेदरम्यान योनिमार्गातून रक्तस्त्राव किंवा हलके डाग

योनीमार्गातून होणाऱ्या रक्तस्रावाचे किंवा हलक्या रक्तस्रावाचे कारण माहिती नसते तेव्हा चिंता वाटते. जर तुम्ही गर्भवती असताना हलके डाग दिसले तर ते गंभीर समस्येचे कारण असू शकते. तथापि, ह्यास सामोरे जाण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे ह्या रक्तस्रावाची कारणे, परिणाम आणि गर्भावस्थेदरम्यान होणाऱ्या रक्तस्रावावर उपचारांची माहिती करून घेणे हा होय.

योनीमार्गातून रक्तस्त्राव होणे किंवा हलके डाग पडणे सामान्य आहे काय?

गर्भधारणेदरम्यान हलके डाग किंवा थोडा रक्तस्त्राव होणे हे सामान्य आहे. गर्भधारणेच्या पहिल्या टप्प्यावर ते दिसून येते. (पहिली तिमाही). साधारणपणे २०% महिलांना हलके डाग किंवा रक्तस्रावाचा अनुभव येतो. जरी हलके डाग किंवा योनीमार्गातून होणारा रक्तस्त्राव नॉर्मल असले तरी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधणे जरुरी आहे.

काही चाचण्या आणि अल्ट्रासाऊंड करून घेणे जरुरी आहे. त्यामुळे बाळ सुरक्षित असल्याची खात्री होईल तसेच काही गुंतागुंत नाही हे सुद्धा स्पष्ट होईल.

हलके डाग आणि योनीमार्गातील रक्तस्त्राव ह्यामधील फरक

गर्भधारणेदरम्यान रक्तस्त्राव आणि हलके डाग यातील फरक हा रक्तस्रावाचा रंग आणि प्रमाण ह्यावर अवलंबून असतो. जर स्त्रावाचा मासिक पाळी थांबताना जसा तपकिरी असतो तसा असेल तर त्यास हलके डाग म्हणतात आणि जर हा रंग तांबडा असेल तर त्यास रक्तस्त्राव म्हणतात. रक्ताचे प्रमाण सुद्धा दोन्हींमधील फरक दर्शवते. जर प्रमाण जास्त असेल तर सॅनिटरी पॅड संपूर्ण भिजून जाते आणि हलक्या डागांनी तसे होत नाही.

हलक्या डागांची कारणे काय आहेत?

हलके डाग पडण्यामागे काही कारणे आहेत

१. १ ल्या तिमाहीमध्ये

रोपण रक्तस्त्राव – गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात असा रक्तस्त्राव होतो. गर्भाशयाच्या भित्तिकांमध्ये जेव्हा भ्रूणाचे रोपण होते तेव्हा हलके डाग पडतात. साधारणपणे हे पाळीच्या आधी ( किंवा त्याच्या आसपास) होते किंवा गर्भधारणा झाल्यानंतर साधारणपणे ६-१२ दिवसांनी हलके डाग आढळतात. हलक्या डागांचा रंग मासिक पाळीच्या स्त्रावापेक्षा फिकट असतो (फिकट गुलाबी ते तपकिरी रंग) आणि तो काही दिवसांसाठी तसाच राहतो.

२. ३ ऱ्या तिमाहीमध्ये

तुमचा ‘म्युकस प्लग’ जर समजा निघाला तर तिसऱ्या तिमाहीमध्ये हलके डाग आढळतात.

 • संभोग किंवा गर्भाशयाची तपासणी – गर्भधारणेमुळे गभाशयाचे मुख नाजूक होतो आणि रक्तवाहिन्यांना सूज येते आणि त्यास थोडा जरी धक्का ( संभोग किंवा तपासणी दरम्यान) लागला तर त्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो. असा रक्तस्त्राव गर्भधारणेदरम्यान केव्हाही होऊ शकतो आणि ते कुठल्याही समस्येचे कारण नसते.
 • योनीमार्गाचा संसर्ग (बॅक्टेरियल व्हजायनोसिस) किंवा गर्भाशयाचे मुख – जर तुम्हाला योनीमार्गाचा संसर्ग झाला तर ह्या कालावधीत तुमच्या योनिमार्गाच्या मुखाला सूज येते आणि तुम्हाला हलके डाग पडू शकतात.

बॅक्टेरियल व्हजायनोसिस

 • रक्तस्त्राव – नाळेजवळील आवरणाच्या घड्यांमध्ये किंवा गर्भाशय आणि नाळ ह्यांच्या मध्ये रक्त साठून राहिले तर त्यामुळे हलकासा रक्तस्त्राव होऊ शकतो आणि तो आपोआप थांबतो.

योनीमार्गातील रक्तस्रावाची कारणे

गर्भधारणेदरम्यान खूप रक्तस्त्राव झाल्यास त्यामागे सौम्य कारण नसते कारण त्यासोबत इतर काही समस्या सुद्धा निर्माण होतात. गर्भधारणेदरम्यान रक्तस्रावाची काही कारणे इथे दिली आहेत.

१. पहिल्या तिमाहीमध्ये

जर भ्रूणाचे रोपण गर्भाशयाच्या बाहेर झाले तर त्यास इंग्रजीमध्ये एकटोपिक प्रेग्नन्सी असे म्हणतात. त्यामुळे पोटदुखीसोबतच खूप रक्तस्त्राव होतो. काही वेळा गुदद्वारावर दाब येतो, चक्कर येऊन बेशुद्ध सुद्धा पडण्याची शक्यता असते.

मोलर गर्भधारणा (Molar Pregnancy): ही खूप दुर्मिळ अवस्था आहे. ह्यामध्ये नाळेमध्ये सिस्ट तयार होतात आणि त्यामुळे विकृत भ्रूणाची निर्मिती होते. ह्यामुळे रक्तस्त्राव होतो (लाल ते तपकिरी) आणि तुम्हाला मळमळ, उलट्या आणि पेटके ह्यांचा त्रास होतो.

गर्भपात (२० आठवड्यांच्या आधी) हा भ्रूणाच्या गुणसूत्रांमधील दोषांमुळे होतो. संप्रेरकांमधील घटकांमुळे सुद्धा हे होऊ शकते. ह्यामध्ये योनीमार्गातून रक्तस्त्राव होतो आणि पाळीसारख्या गाठी सुद्धा ह्यामध्ये असतात. ह्या स्थितीमध्ये ओटीपोटामध्ये तीव्र पेटके येतात.

इतर कारणे

 • गर्भाशयाचे मुख नाजूक असणे
 • तुम्हाला फायब्रॉईड असण्याची शक्यता असणे
 • तुम्हाला ‘Von Willebrand Disease’ नावाचा आनुवंशिक आजार असणे. ह्या आजारात रक्त गोठण्याच्या प्रक्रिया कठीण होते

जरी तुमचा गर्भपात झाला तरी नंतर तुम्हाला निरोगी बाळ होणार नाही असे नाही. संशोधनामुळे तुमच्या ४०% गर्भधारणांचा अंत गर्भपातात होतो.

२. गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यावर

गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यावर रक्तस्रावाचे सर्वसामान्य कारण म्हणजे नाळेमध्ये दोष असणे. काही वेळा गर्भाशयाच्या मुखामध्ये काही समस्या असतील तरी असे होते.

प्लॅसेंटा प्रेव्हिया

 • प्लॅसेंटा प्रेव्हिया – नाळ बाळ आणि गर्भाशयाला जोडते. नाळ गर्भाशयाचे मुख अर्धवट किंवा संपूर्ण झाकून टाकते. ह्यामूळे जो रक्तस्त्राव होतो त्यास placenta previa असे म्हणतात. गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यावर गर्भाशयाच्या मुखाच्या भित्तिका प्रसूतीच्या तयारीसाठी उघडू लागतात. नाळेच्या काही रक्तवाहिन्या तुटतात. २०% वेळा हे योनीमार्गातून रक्तस्त्राव होण्याचे हे कारण असते. Placenta previa चा धोका खूप जास्त असतो जेव्हा
  • एकापेक्षा जास्त गर्भधारणा झालेली असेल
  • आधी सी-सेक्शन प्रसूती झाली असेल तर
  • आधी प्लॅसेंटा प्रेव्हिया चा त्रास झालेलं असेल तर
 • गर्भाशयापासून नाळ विलग होणे (Placental abruption) – ह्या वैद्यकीय स्थितीमध्ये नाळ गर्भाशयाच्या भित्तिकांपासून विलग होते आणि नाळ व गर्भाशयामध्ये रक्त येते. २०० गर्भधारणांमध्ये १ का गर्भधारणेत ही स्थिती बघायला मिळते. ह्यामागचे कारण माहिती नाही. खालील परिस्थिती मध्ये ही स्थिती उद्भवते
  • रक्तदाब जास्त असणे (१४०/९० किंवा जास्त)
  • आघात
  • कोकेन किंवा तंबाखूचे सेवन
  • आधीच्या गर्भधारणेदरम्यान नाळ विलग झालेली असल्यास
 • गर्भाशय फाटणे: ही खूप दुर्मिळ आणि भयानक स्थिती आहे. ह्यामध्ये गर्भाशय फाटून उघडते आणि बाळ पोटाकडे सरकते. ज्या स्त्रियांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया आधी झालेली आहे अशा स्त्रियांमध्ये असे होण्याची शक्यता असते. प्रसूतीच्या आधी किंवा प्रसूती होताना असे होऊ शकते. ह्या स्थितीस खालील घटक कारणीभूत आहेत
  • ४ पेक्षा जास्त गर्भधारणा
  • आघात
  • ओक्सिटोसीनचा जास्त वापर (पिटोसीन)
  • बाळाचे डोके खाली असण्याऐवजी बाळाची इतर कुठली स्थिती असणे
  • जेव्हा बाळाचे खांदे प्रसूतीच्या वेळेला pubic bones मध्ये अडकतात
 • रक्तवाहिन्या तुटणे: नाळेच्या रक्तवाहिन्या प्लॅसेंटाजवळील आवरणाला जोडल्या जातात. बाळाच्या रक्तवाहिन्या बर्थ कॅनाल मधून जातात. ह्या स्थितीला इंग्रजीत वासा प्रेव्हिया असे म्हणतात.

गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या रक्तस्रावास कारणीभूत काही दुर्मिळ कारणे म्हणजे गर्भाशयाच्या मुखाला जखम होणे, कॅन्सर आणि व्हेरिकोज व्हेन्स होय.

योनीमार्गातून रक्तस्त्राव आणि हलके डाग पडत असतील तर तुम्ही काय केले पाहिजे?

गर्भधारणेदरम्यान रक्तस्त्राव होत असल्यास ५०% स्त्रियांची गर्भधारणा आरोग्यपूर्ण असते आणि त्यांना निरोगी बाळ होते. जर तुम्हाला हलके डाग किंवा योनीमार्गातून रक्तस्त्राव होत असेल तर लक्षणांची चर्चा करण्यासाठी तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे आणि काही गुंतागुंत तर नाही ना ह्या विषयी खात्री करून घेतली पाहिजे. गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यावर खूप रक्तस्त्राव होत असेल तर त्यामुळे बाळाला हानी पोहचू शकते

निदान

गर्भधारणेदरम्यान जर स्त्रीला योनीमार्गातून रक्तस्त्राव होत असेल तर स्त्रीची नीट आणि लगेच तपासणी केली पाहिजे. गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणा झाल्यास जी स्थिती निर्माण होते त्यास इंग्रजी मध्ये ‘haemorrhagic shock’ असे म्हणतात आणि त्यामध्ये तुमच्या शरीरातील एकूण रक्ताच्या २०% रक्तस्त्राव होतो. त्यामुळे हृदयाला सर्व अवयवांना नीट रक्तपुरवठा करता येत नाही आणि त्यामुळे अवयव निकामी होण्याची शक्यता असते. तुमचे डॉक्टर खालील तपासण्या करू शकतात –

 • ताप आणि हायपोवोलेमिया ह्यांच्या लक्षणांची नीट तपासणी
 • ओटीपोट आणि पोटाच्या भागाची तपासणी. बाळाच्या हृदयाचे ठोके तपासण्यासाठी ड्रॉपलर अल्ट्रासाऊंड तपासणी करणे. ओटीपोटाच्या भागाच्या तपासणीमध्ये जननेंद्रियांची बाहेरून तपासणी, दुर्बिणीने तपासणी इत्यादींचा समावेश होतो. योनीमार्गातील स्त्रावासाठी गर्भाशयाच्या मुखाची सुद्धा तपासणी केली जाते.

ड्रॉपलर अल्ट्रासाऊंड तपासणी करणे

उपचार

गर्भधारणेच्या कालावधीवर योनीमार्गातील रक्तस्त्राव आणि हलके डाग ह्यावरील उपचार पद्धती अवलंबून असते

पहिल्या तिमाहीतील उपचारपद्धती

 • जर अल्ट्रासाऊंड मध्ये एकटोपीक गर्भधारणेचे निदान झाले तर तुम्हाला औषधे(Methotrexate) दिली जाऊ शकतात किंवा शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. ज्यांना औषोधोपचार लागू होत नाही किंवा औषधांचा परिणाम होण्यासाठी खूप वेळ लागतो त्यांच्या बाबतीत शस्त्रक्रिया केली जाते.
 • जर गर्भधारणेची शक्यता असल्याचे निदान झाले तर तुमचे डॉक्टर काय काळजी घेतली पाहिजे ह्याबाबत सूचना देतील आणि तपासणीसाठी बोलावतील
 • जर अर्धवट गर्भपात झालेला असेल तर तुम्हाला राहिलेला गर्भाचा अंश काढून टाकण्यासाठी इस्पितळात दाखल करून घेतील. आणि तो भाग काढून टाकतील त्यामुळे रक्तस्त्राव किंवा संसर्गाचा धोका रहात नाही.
 • काही वेळा घरी किंवा दवाखान्यात तुमच्यावर लक्ष ठेवले जाते आणि शस्त्रक्रियेशिवाय गर्भाचा राहिलेला भाग शरीराबाहेर टाकला जातो का ह्यावर लक्ष ठेवले जाते. तुमचे वय आणि भ्रूणाचा आकार ह्यावर ते अवलंबून असते.
 • जर पूर्णपणे गर्भपात झालेला असेल तर तुम्हाला घरी पाठवले जाते.
 • मोलर गर्भधारणेच्या बाबतीत तातडीने क्यूरेटिन केले जाते आणि कॅन्सरची शक्यता तपासण्यासाठी बी-एचसीजी ह्या संप्रेरकाच्या पातळीवर लक्ष ठेवले जाते.

दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीतील उपचार पद्धती

गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यावर जर रक्तस्त्राव झाला तो किती होत आहे ह्यावर लक्ष ठेवले पाहिजे. तुमच्या बाळावर सुद्धा लक्ष ठेवा. उपचारपद्धती किती प्रमाणात रक्तस्त्राव होतो आहे, गर्भवती स्त्रीची स्थिती आणि बाळाचे वय ह्यावर अवलंबून असते.

A) गर्भाशयाचे मुख नाळेमुळे झाकले जाणे ( Placenta Previa)

 • जर तुम्हाला आणि तुमच्या बाळाला खूप धोका असेल तर सिझेरियन प्रसूतीला प्राधान्य दिले जाते.
 • जर तुम्हाला प्रसूती कळा येत असतील तर तुम्हाला आय. व्ही. तुन कळा कमी करण्यासाठी किंवा त्या थांबवण्यासाठी औषधे दिली जातील.
 • जर तुमची गर्भधारणा ३६ आठवड्यांपेक्षा कमी असेल किंवा रक्तस्त्राव खूप गंभीर प्रमाणात नसेल तर तुम्हाला इस्पितळात देखरेखीखाली ठेवले जाईल. जर तुमची गर्भधारणा ३६ आठवड्यांपेक्षा जास्त असेल तर तुमचे डॉक्टर बाळाची फुप्फुसांचा विकास झाला आहे की नाही हे पाहतील. जर तो झाला असेल तर तुमची सिझेरिअन प्रसूती होऊ शकते.
 • अशा वेळी सगळ्या प्रसूती ह्या सिझेरिअन असतात

ब) नाळ तुटणे

 • अशा वेळी नॉर्मल प्रसूतीला प्राधान्य दिले जाते
 • जर काही गंभीर समस्या उद्भवली तरच सिझेरिअन केले जाते
 • जर तुमचे बाळ ३६ आठवड्यांपेक्षा जास्त वयाचे असेल तर तुमची नॉर्मल प्रसूती केली जाते. आय. व्ही. मधून कळांची औषधे दिली जातात.
 • जर तुमचे गर्भधारणा ३६ आठवड्यांपेक्षा कमी असेल आणि रक्तस्त्राव खूप गंभीर नसेल तर तुम्हाला इस्पितळात देखरेखीखाली ठेवले जाते. बाळाचा हृदयाच्या ठोक्यांचा वेग मोजला जातो आणि ऍनिमियाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जाते.

दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीतील उपचार पद्धती

क) गर्भपिशवी फाटणे

 • जर गर्भपिशवी फाटण्याची शक्यता असेल तर तुमचे सिझेरिअन करावे लागण्याची शक्यता असते
 • गर्भाशय काढून टाकण्याची पण शक्यता असते
 • जर तुमची स्थिती स्थिर असेल तर डॉक्टर्स गर्भाशय दुरुस्त करतील
 • जर गर्भाशय फाटल्याची शक्यता खूप जास्त असेल तर तुमचे तातडीने सिझेरिअन करावे लागेल
 • खूप रक्त भरावे लागेल
 • तातडीने सिझेरिअन करणे ही उपचारपद्धती अवलंबिली जाते

प्रतिबंध

खाली काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही गर्भधारणेदरम्यानचा रक्तस्त्राव आणि हलके डाग ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी करू शकता

 • रक्तस्त्राव थांबेपर्यंत आराम करा
 • रक्तस्त्राव होत असताना पॅड किंवा टॅम्पून्स वापरा
 • रक्तस्त्राव होत असताना संभोग टाळा
 • जर दुखत असेल तर पॅरासिटॅमॉल सारखी सौम्य औषधे घ्या
 • तुमच्या स्थितीत काही बदल झाले तर ताबडतोब डॉक्टरांना कळवा
 • जर रक्तस्त्राव आणि पेटके खूप जास्त होत असतील तर तुम्ही फक्त द्रवपदार्थ घेणे घेतले पाहिजेत
 • चालण्यासारखा हलका व्यायाम व्यायाम किंवा घरात छोटी कामे करा
 • जेव्हा शक्य होईल तेव्हा पाय उंचावर ठेवा
 • १० पौंडापेक्षा जास्त वजनाच्या वस्तू उचलू नका

प्रतिबंध

माझ्या बाळाला धोका पोहोचेल का?

हलके डाग किंवा थोडा रक्तस्त्राव झाल्यास त्याचा बाळाला काहीही धोका नसतो. त्यामुळे तुमचे बाळ सुरक्षित असण्याची शक्यता जास्त असते. रक्तस्रावाची समस्या आली तरी बऱ्याच गर्भधारणा पूर्ण होतात.

जर हलके डाग किंवा रक्तस्रावाचा काही धोका नसतो तरी सुद्धा जेव्हा त्यासोबत पोटात दुखून रक्तस्त्राव वाढतो तेव्हा ते गर्भपाताचे लक्षण असते. हलके डाग किंवा रक्तस्त्राव आपोआप थांबतो. तथापि, जर रक्तस्त्राव झाला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow