गोळ्याची आमटी

गोळ्यांची आमटी हि पारंपरिक पदार्थ असून हा खूप तिखट आणि झणझणीत आमटीच्या स्वरूपात असतो हा पदार्थ विदर्भ बाजूला मोठ्या प्रमाणावर केला जातो चला बघूया गोळ्यांच्या आमटीची कृती आणि त्यासाठी लागणारे साहित्य

 0
गोळ्याची आमटी
गोळ्याची आमटी

गोळ्याची आमटी

साहित्य :

दीड कप बेसन ,

३ मोठे कांदे बारीक चिरून ,

१ चमचा आलं - लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट ,

अर्धा चमचा धनेपूड ,

अर्धा चमचा लाल तिखट ,

पाव चमचा हळद ,

२ चमचे खोबरं ,

२ ते ३ लवंगा ,

कोथिंबीर ,

१ चमचा कांदा लसूण मसाला ,

३ चमचे तेल ,

गरम पाणी ,

चवीनुसार मीठ ,

कृती :

गोळे बनवण्यासाठी बेसनामध्ये लाल तिखट घाला . धनेपूड , हळद घाला . त्यानंतर मिरचीचा ठेचा घाला . कोथिंबीर आणि मीठ घाला . अगोदर हे सगळं व्यवस्थित | मिसळून घ्या . थोडंसं तेल घाला . हाताने व्यवस्थित कालवून घ्या मग थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा करून घ्या , यावर झाकण ठेवा . दहा मिनिटे बाजूला ठेवा . ओलं खोबरं , लसूण व कोथिंबीर मिक्सरमध्ये फिरवून घ्या . कढईत तेल गरम करून घ्या . त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या . कांदा परतेपर्यंत वर तयार केलेल्या गोळ्यातून छोटे छोटे गोळे करून घ्या गोळे खूप मोठे करायचे नाहीत कारण आमटीत ते शिजतात व मोठे होतात . कढईत वाटण घाला . कांदा - लसूण मसाला घाला . लाल तिखट , धनेपूड आणि मीठ घाला . दोन मिनिटे व्यवस्थित परतून घ्या . गरम पाणी घाला . पाण्याचा वापर थोडासा जास्त करा . कारण गोळे शिजतात तशी आमटी घट्ट होते . आता यामध्ये गोळे सोडा . झाकण ठेवून १५ मिनिटे शिजवून घ्या . गोळे व्यवस्थित शिजले की ते तरंगतात . वेळ जातो तसतशी आमटी दाटसर होते . कच्चेपणा राहता कामा नये . गोळे मऊ झाले पाहिजेत . ही आमटी भाकरीबरोबर जबरदस्त लागते . चपाती , पराठा व भाताबरोबरही छान लागते .

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow