हळदीचं दूध

जेव्हा सर्दी खोकला होतो , सर्दी मुले डोकेदुखी , घसा दुखी असे इतर त्रास सुरु होतात तेव्हा आपण लगेच डॉक्टर कडे धाव घेत नाही अश्यावेळी अगदी सहज सोपा उपचार म्हणून आपण हळदीच्या दुधाचं सेवन करतो फक्त सर्दी पडसे साठी नाही तर अगदी रोज थोडं अर्धा कप का असेना हळदीच्या दुधाचं सेवन करणे हे आरोग्यासाठी लाभदायक आहे

 0
 हळदीचं दूध
 हळदीचं दूध

 हळदीचं दूध

सर्दी - खोकला झाला असेल तर हे दूध खूप उपयुक्त असतं .

 साहित्य :

दीड कप दूध ,

१ चमचा हळदीची पूड ,

१ चमचा मध ,

पाव चमचा कुटलेली काळीमिरी ,

चिमूटभर सुंठपावडर .

कृती :

पातेल्यात दूध घ्या . तुम्ही गाईचं दूध वापरू शकता किंवा नारळाचं दूध वापरू शकता . आल्मंड मिल्क किंवा सोयामिल्कही वापरू शकता . त्यामध्ये हळदीची पूड , मध , खलबत्त्यामध्ये कुटलेली काळीमिरी , सुंठपावडर घाला . ४ ते ५ मिनिटे उकळून घ्या . गाळून किंवा असंच गरमागरम प्या . घशाला आराम पडतो .

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow