२० महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहार तक्ता आणि पाककृती

 0
२० महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहार तक्ता आणि पाककृती

जेव्हा तुमचे बाळ २० महिन्यांचे होते तेव्हा थोडे लहरी होतेतुम्ही जे अन्न बाळाला भरवाल ते बाळ खाईलच असे नाहीआधी बाळाला आवडत असलेला नाश्ता आता बाळ खाणार नाहीआता मुले वयाच्या अशा टप्प्यावर आहेत की त्यांच्या खाण्याच्या सवयी बदलतातअशावेळी अगदी पटकन तयार करता येण्याजोग्या पाककृती हाताशी असल्यावरआणि बाळ पटकन स्वीकारेल अशी आहाराची योजना सोबत असेल तर तुमचे आयुष्य सुकर आणि सोपे होईल.

२० महिन्यांच्या बाळाच्या आहाराच्या गरजा

तुमच्या बाळासाठी जेवणाचे विविध पर्याय एकत्रित मांडतानाहे लक्षात घेतले पाहिजे की काही पोषणमूल्ये बाळासाठी अतिशय गरजेची असतात आणि तुम्ही ती वगळू शकत नाही२० महिन्यांच्या बाळासाठी काही पोषणाच्या गरजा दिल्या आहेततुमच्या बाळाला ही पोषणमूल्ये मिळत आहेत ह्याची खात्री करा.

कॅलरीज

कॅलरीजमुळे शरीराला ऊर्जा मिळतेज्या आहारातून पोषण मिळते तसेच शरीरासाठी ऊर्जा मिळते अशा आहारातील फरक माहित असणे जरुरीचे असतेत्यामुळे वरील पॆकी दोन्ही गोष्टी आहारातून मिळण्यासाठी संतुलन आवश्यक आहे.

प्रथिने

प्रथिने ही शरीरासाठी बिल्डिंग ब्लॉक्स ‘ असतातआणि मुलांच्या वाढीच्या आणि विकासाच्या दिवसात शरीरासाठी अत्यावश्यक असतातबाळाच्या आहारात पुरेश्या प्रथिनांचा समावेश आहे ह्याची खात्री करा.

कर्बोदके

कर्बोदकांमुळे मेंदूस्नायू आणि मज्जासंस्थेस इंधन मिळते.

तंतुमय पदार्थ

तंतुमय पदार्थांमुळे पचन चांगले होतेबाळाच्या आहारात तंतुमय पदार्थांची खात्री करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांऐवजी चौरस आहाराचा पर्याय निवडला पाहिजेबऱ्याच वेळा कर्बोदकांनी समृद्ध अन्नपदार्थांमध्ये पुरेसे तंतुमय पदार्थ असतात.

सोडियम

बरेच डॉक्टर्स किंवा आहारतज्ञ बाळाच्या आहारातील सोडिअमच्या गरजेवर भर देत नाहीतदररोज बाळाला फक्त १ ग्रॅम सोडिअमची गरज असतेते कमी पडल्यास बाळाच्या मज्जासंस्थेच्या कार्यावर परिणाम होतो.

लोह

रक्ताचे कार्य सुरळीत चालावे म्हणून शरीरास लोहाची गरज असतेज्या मुलांमध्ये लोहाची कमतरता भासते अशा मुलांमध्ये खाण्याच्या आवडीनिवडी खूप असतातलोहाच्या पूरक गोळ्यांची कमतरता खूप कमी वेळा भासतेबऱ्याच वेळा ते व्हिटॅमिन सी समृद्ध आहारातून मिळते किंवा लोखंडाची भांडी वापरल्याने सुद्धा ते मिळते.

व्हिटॅमिन डी

ह्या वयाच्या मुलांना कॅल्शिअम शरीरात शोषण्यासाठी आणि हाडांची वाढ होण्यासाठी व्हिटॅमिन डी ची गरज असतेव्हिटॅमिन डी दुधातून मिळू शकते किंवा सूर्यप्रकाशात बसल्याने ते मिळते.

पाणी

पाण्यामुळे शरीराचे विविध कार्ये जसे की पचनलाळेची निर्मिती आणि शरीराचे तापमान सुरळीत राखणे इत्यादी कार्ये नियंत्रित होताततुमच्या बाळाची सक्रियता आणि बाळाच्या शरीरातील पाणी ह्यांचे प्रमाण सारखेच असले पाहिजेजरी तुमचे बाळ सारखे खेळत नसेल तरी योग्य प्रमाणात पाणी पिणे हे गरजेचे आहे.

तुमच्या बाळाला २० व्या महिन्यात किती अन्नपदार्थांची गरज असते?

बाळ जेंव्हा २ वर्षाचे होऊ लागते तेव्हा बाळ जास्त खेळकर होतेम्हणूनजरी बाळाची भूक कमी जास्त प्रमाणात तेव्हढीच राहिली तरी सुद्धा बाळाची कॅलरीची गरज दिवसाला १४०० कॅलरीज इतकी वाढू शकते.

फळे

आहारात फळांचा समावेश करताना विविध प्रकारची फळे असल्याने ते सोपे जातेआंबेकिवीवेगवेगळ्या प्रकारच्या बेरीद्राक्षेकेळी तसेच सुकामेवा ह्यांचा बाळाच्या आहारात वेगवेगळ्या चवींचा आणि पोषणाचा समावेश करण्यात महत्वाचा सहभाग असतो.

अंडी

दररोज अंडे खाल्ल्यास ते तुमच्या बाळाच्या तब्बेतीसाठी चांगले असतेअंडे ब्रेड सोबत बाळाला आवश्यक पोषणमूल्ये मिळतील किंवा अंडी वेगवेगळ्या भाज्यांमध्ये घालून सुद्धा तुम्ही देऊ शकता.

अंडी

दुग्धजन्य पदार्थ

दुधाव्यतिरिक्त चीझयोगर्ट इत्यादींच्या समावेश तुमच्या बाळाच्या आहारात असलाच पाहिजेलॅक्टोज इंटॉलरन्स असलेल्या मुलांमध्ये इतर पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो.

चरबीयुक्त तेलं

नारळाचे तेल आणि ऍव्होकॅडो तेल ह्यांचे २० महिन्यांच्या बाळाच्या आहारात विशेष स्थान आहेयोग्य प्रमाणात घेतल्यास तुमच्या बाळाला चांगल्या चरबीचा पुरवठा होतो ज्यामुळे बाळाच्या शरीरात ऊर्जेचा साठा होतो.

भाज्या

हिरव्या पालेभाज्या तसेच मटारकॉलीफ्लॉवरब्रोकोली ह्यासारख्या आणि इतर अनेक भाज्या ह्या तुमच्या बाळासाठी चांगल्या असतातसाध्या टोमॅटो सॉस आणि साल्सा मध्ये सुद्धा पोषणमूल्ये असतात

मांस

जेंव्हा तुमचे बाळ जवळजवळ २ वर्षांचे होते तुमची बाळास टर्कीमटणबीफ ह्यांचेछोटे तुकडे भरवू शकतातुम्ही अगदी सावकाश भरवत आहात ह्याची खात्री करा तसेच बाळाला ते नीट चावण्यास सुद्धा शिकवा.

शेंगा आणि सुकामेवा

सब्जाजवस अशा बियांपासून मटारमसूरबीन्स आणि इतर शेंगा दिवसातून दोनदा बाळाला दिल्या पाहिजेत ज्यामुळे बाळाच्या पोषणमूल्यांमध्ये भर पडेल

हिरवी आणि लिबूवर्गीय फळे

हिरवी आणि लिबूवर्गीय फळे

भरपूर प्रमाणात पालेभाज्या आणि व्हिटॅमिन सी युक्त फळांमुळे मुलांच्या शरीराला लोह मिळते आणि ते परिणामकरीत्या शरीरात शोषले जातेलाल मांसामुळेसुद्धा हा परिणाम साध्य होतो.

ब्रेड आणि ओटमील

ओटमील आणि गव्हाच्या ब्रेडचे मुलांच्या आहारात समावेश करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याद्वारे त्यांच्या शरीरास असलेले अन्नपदार्थ जातातक्विनोवा सुद्धा १२ वर्षे वयाच्या मुलांना खाण्यास सांगितले जाते.

१०समुद्री अन्न

समुद्री खाद्याचा समावेश तुमच्या बाळाच्या आहारात करावा किंवा नाही हा निर्णय अवघड आहे कारण त्याचे काही चांगले फायदे आहेत परंतु आर्सेनिक किंवा पारा यांची विषबाधा होण्याचा धोका देखील आहेतुम्ही काही विशिष्ट माश्यांची निवड केल्यास आणि मासे विश्वसनीय स्रोतांकडून मिळत असतील तर तुमच्या मुलांना त्यांचा भरपूर फायदा होऊ शकतो.

२० महिन्यांच्या बाळासाठी आहार तक्ता/आहाराची योजना

२० महिन्यांच्या बाळासाठी इथे आहार तक्ता दिला आहे ज्याच्या मदतीने तुम्हाला बाळाचे जेवण ठरवता येईल

२० महिन्यांच्या बाळासाठी आहाराची योजना – १ ला आठवडा

जेवण न्याहारी नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला १ अंडे किंवा पनीर पराठा आणि हिरवी चटणी सफरचंद मिल्कशेक ज्वारी– गहू रोटी मसूर पालक काही चेरी टोमॅटो

गूळ घालून केलेला शेंगदाण्याचा लाडू आणि दूध

बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत डाळ
दिवस २ रा १ कप पोहे १ छोटा ग्लास ताजा संत्र्याचा रस अननस रायता पोळीडाळ आवडीची भाजी काकडीचे काही काप हातसडीचा तांदळाचा भात अंड्याचे कस्टर्ड शाही पनीरपराठा आणि टोमॅटो मशरूम सूप
दिवस ३ रा संपूर्णधान्य मफिन १ ग्लास दूध अननसाचे कापचाट मसाला किंवा मधासोबत संपूर्णधान्य रोटी डाळ+आवडीची भाजी+उकडलेल्या बीटरुटचे काप हातसडीच्या तांदळाचा भात मुरमुऱ्याचा चिवडा आणि केशर वेलची घातलेले दूध पुदिना पराठा आणि दुधी भोपळ्याचा हलवा
दिवस ४ था इडली सांबर दूध पीच/सफरचंद पनीरमटार पुलाव आणि पालक सूप ३ घरी केलेली बिस्किटे आणि दूध डाळ ढोकळी आणि किसलेल्या गाजराचे मोदक
दिवस ५ वा उकडलेले अंडे केशर– बदाम मिल्कशेक टरबूज पोळी डाळ आवडीची भाजी काकडीचे काही काप हातसडीच्या तांदळाचा भात अंजीर आणि बदाम ,मिल्कशेक बिसिबेले भात आणि दही
दिवस ६ वा बदाम आणि अक्रोड घातलेली राजगिऱ्याची लापशी रताळे भाजून त्याचे केलेले तुकडे ज्वारीगहू रोटी छोले पालक काही चेरी टोमॅटो १ वाटी बदामाची पूड घातलेली गव्हाची लापशी नवरत्न कुर्माआणि बटर लावलेला पनीर पराठा
दिवस ७ वा व्हेजिटेबल उपमा आणि चिकू मिल्कशेक संपूर्णधान्य रोटी डाळ आवडीची भाजी उकडलेल्या बीटरुटचे काही तुकडे हातसडीचा तांदळाचा भात पालक सूप आणि ब्रेड स्टिक्स बटर मिक्स व्हेज सूप आणि डाळ खिचडी

२० महिन्यांच्या बाळासाठी आहाराची योजना – २ रा आठवडा

जेवण न्याहारी नाश्ता

दुपारचे जेवण

संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला स्ट्रॉवबेरीचे तुकडे असलेले दूध पोहे ३ बिस्किटे तुमच्या आवडीची ज्वारी– गहू रोटी मसूर पालक काही चेरी टोमॅटो स्ट्रॉबेरी आणि दूध पनीर कटलेट किंवा भाजलेले मासे आणि टोमॅटोकोथिंबीर सूप
दिवस २ रा ज्वारीच्या लाह्यांची खीर किवीचे काप पोळी डाळ आवडीची भाजी काकडीचे काही काप हातसडीच्या तांदळाचा भात खाकरा राजमा आणि टोस्ट
दिवस ३ रा उकडलेले अंडे किंवा पनीरचे तुकडे पेअरचे काप संपूर्णधान्य रोटी डाळ आवडीची भाजी उकडलेल्या बीटरुटचे काप हातसडीचा तांदळाचा भात कुठल्याही डाळींब आणि द्राक्षे सोडूनफळांसोबत दही अप्पे आणि नारळाची व दही चटणी
दिवस ४ था अप्पे आणि नारळाची व दही चटणी स्ट्रॉबेरी मिल्कशेक पनीरमटार पुलाव आणि पालक सूप पालक ढोकळा भरलेली ढोबळी मिरची आणि पनीर टोमॅटो सूप सोबत
दिवस ५ वा ओट्स– बदाम खीर बिया काढून कुस्करलेले सीताफळ पोळी डाळ आवडीची भाजी काकडीचे काही काप हातसडीचा तांदळाचा भात शेवयांचा उपमा केशर वेलची दूध डाळ भात आणि किसलेल्या गाजराचा रायता
दिवस ६ वा पोहे आणि ढोबळी मिरची व टोमॅटो चॉकलेट अक्रोड मिल्कशेक ताजी नारळाची बर्फी ज्वारीगहू रोटी छोले पालककाही चेरी टोमॅटो खाकऱ्याचे छोटे तुकडेदह्यात मिक्स करून डाळ वडीवांग्याची भाजी आणि बाजरीची रोटी
दिवस ७ वा केळ्याचे पॅनकेक भोपळ्याचे सूप आणि टोस्ट संपूर्णधान्य रोटी डाळ आवडीची भाजी उकडलेल्या बीटरुटचे काही काप+हातसडीच्या तांदळाचा भात पोहे आणि साधे दूध दही भात आणि काकडी,गाजर रायता

२० महिन्यांच्या बाळासाठी आहाराची योजना – ३ रा आठवडा

जेवण न्याहारी नाश्ता दुपारचे जेवण

संध्याकाळचा नाश्ता

रात्रीचे जेवण
दिवस १ ला नाचणीचा डोसा आणि सांबर चटणी अननस योगर्ट ज्वारी गहू रोटी मसूर पालक काही चेरी टोमॅटो मुरमुरे चिवडा आणि केशर वेलची दूध मिक्स व्हेजिटेबल सूप छोले पराठा
दिवस २ रा बेसनाचे धिरडे आणि हिरवी चटणी खाकऱ्याचे छोटे तुकडेदह्यात मिक्स करून पोळी डाळ आवडीची भाजी काकडीचे काही काप हातसडीचा तांदळाचा भात ३ घरी केलेली बिस्किटे आणि दूध पोंगल आणि व्हेजिटेबल सांबर
दिवस ३ रा केळी आणि ओट्स मिल्कशेक कुस्करलेला बटाटा आणि किसलेले पनीर संपूर्णधान्य रोटी डाळ +आवडीची भाजी उकडलेल्या बीटरुटचे काही काप हातसडीच्या तांदळाचा भात अंजीर आणि बदाम मिल्कशेक पनीर कटलेट किंवा भाजलेले मासे आणि टोमॅटोकोथिंबीर सूप
दिवस ४ था १ छोटी वाटी पपईचे काप ३ घरी केलेली बिस्किटे आणि दूध पनीर – मटार पुलाव आणि पालक सूप १ वाटी गव्हाची लापशी आणि अक्रोडची पावडर राजमा आणि टोस्ट
दिवस ५ वा जामून किंवा स्ट्रॉबेरी मसाला मखाना केळ्याचा मिल्कशेक पोळी डाळ आवडीची भाजी काकडीचे काही काप हातसडीचा तांदळाचा भात पालक सूप आणि ब्रेड स्टिक व बटर अप्पे आणि नारळाची व दह्याची चटणी
दिवस ६ वा चिकू राजगिरा चिक्की दुधात घालून ज्वारीगहू रोटी छोले पालक काही चेरी टोमॅटो मँगो लस्सी मुरमुरा चिकी डाळ भात
दिवस ७ वा सफरचंद अननस कापचाट मसाला किंवा मधासोबत संपूर्णधान्य रोटी डाळ आवडीची भाजी उकडलेल्या बीटरुटचे काही काप हातसडीच्या तांदळाचा भात ३ गव्हाची बिस्किटे किसलेले गाजर आणि नारळी भात

महिन्यांच्या बाळासाठी आहाराची योजना – ४ था आठवडा

जेवण न्याहारी नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला दलिया उपमाकिसलेले गाजर आणि दूध द्राक्षे आणि पेअर चाट ज्वारीगहू रोटीमसूर पालक काही चेरी टोमॅटो मोसंबी चिकन किंवा सोया खिमा पराठा
दिवस २ रा संपूर्णधान्य डोसा आणि पनीर पुदिना टोमॅटो चटणी लिंबाचे गोड सरबत आणि संत्र्याचा ज्यूस पोळी डाळ आवडीची भाजी काकडीचे काही काप हातसडीचा तांदळाचा भात काकडीचे काही काप आणि दही पालक खिचडीदही किंवा कढी
दिवस ३ रा गव्हाची लापशी संपूर्णधान्य रोटी डाळ आवडीची भाजी उकडलेल्या बीटरुटचे काही काप हातसडीच्या तांदळाचा भात अननस शिरा भाज्या घातलेले मसूर सूप पुलाव
दिवस ४ था पोंगल दूध चिकू पीच/सफरचंद पनीरमटार पुलाव आणि पालक सूप कुस्करलेला बटाटा चीझ घालून मिक्स व्हेजिटेबल रायता व्हेजिटेबल पुलाव मूग डाळ सूप
दिवस ५ वा ठेपलाचुंदा दूध केळं +सफरचंद चाट पोळी डाळ आवडीची भाजी काकडीचे काही काप हातसडीचा तांदळाचा भात नाचणीचे लाडू व्हेजिटेबल बिर्याणी
दिवस ६ वा दलिया पेरू पेअर आणि काळे मीठ ज्वारी– गहू रोटी छोले पालक काही चेरी टोमॅटो पालक पकोडा छोले पराठा आणि भोपळ्याचे सूप
दिवस ७ वा भाज्या घालून केलेली रवा इडली आणि नारळ चटणी संपूर्णधान्य रोटी डाळ आवडीची भाजी उकडलेल्या बीटरुटचे काही काप हातसडीच्या तांदळाचा भात मसाला दूध चिकन किंवा पनीर रस्सा आणि भात

२० महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांच्या पाककृती

तुमच्या २० महिन्यांच्या बाळाला काय भरवावे म्हणून तुम्ही संभ्रमात असाल तर खाली दिलेल्या पाककृती आपला मार्ग मोकळा करतील.

भोपळ्याचे पॅनकेक

भोपळ्याचे पॅनकेक

भोपळ्याचे पॅनकेक्स तुम्ही करून फ्रिज मध्ये ठेऊ शकताबाळासाठी चविष्ट आणि झटपट नाश्त्यासाठी ते उपयोगी होतील.

घटक

  • व्हॅनिला इसेन्स
  • भोपळ्याची प्युरी
  • अंडी
  • बटर
  • दूध
  • ब्राऊन शुगर
  • जायफळ
  • दालचिनी
  • बेकिंग पावडर
  • गव्हाचे पीठ

कृती

  • पीठबेकिंग पावडरदालचिनी पूडजायफळमीठ आणि ब्राऊन शुगर एका मोठ्या भांड्यात मिक्स करा.
  • दुसऱ्या एका भांड्यात दूधबटरप्युरी आणि वॅनिला इसेन्स घ्या आणि चांगले मिक्स करा.
  • आता हे मिश्रण पहिल्या भांड्यात घालून चांगले मऊ होईपर्यंत फेटून घ्या आणि थोडावेळ तसेच राहू द्या.
  • मध्यम आचेवर तव्यावर थोडे तूप घाला आणि तव्यावर बॅटर घालून पॅनकेक करादोन्ही बाजूने तांबूस होईपर्यंत भाजून घ्या आणि मध व मॅपल सिरप सोबत ते खायला द्या.

पनीर गहू बिस्किटे

नेहमीच तीच एकसारखी बिस्किटे खाऊन कंटाळा येऊ शकतोत्यामुळे ही वेगळ्या प्रकारची बिस्किटे तुम्ही करून बघू शकता.

घटक

  • मीठ
  • कढी पत्ता
  • ओवा
  • कांदा
  • बटर
  • बेकिंग पावडर
  • गव्हाचे पीठ
  • पनीरचुरा

कृती

  • १७० डिग्रीला ओव्हन गरम करून घ्या आणि ट्रे ला तूप लावून घ्या
  • कढीपत्ताओवा आणि कांदे एकत्र वाटून घ्या
  • एका भांड्यात बटर घ्या आणि त्यामध्ये पनीर घालात्यामध्ये पीठ आणि इतर घटक घालून घट्ट होईपर्यंत चांगले मिक्स करा
  • पीठ घेऊन पातळ पोळीसारखे लाटून घ्या आणि बिस्किटाच्या आकारात कापून घ्याओव्हन मध्ये २० मिनिटे ठेवाआणि तांबूस झाल्यावर काढून घ्यागार झाल्यावर हवाबंद ठेवा

व्हेज मँचुरियन

व्हेज मँचुरियन

घरी तयार केलेले चायनीज अन्नपदार्थ तुमच्या मुलांसाठी खूप चांगले आहेतते आरोग्यपूर्ण तसेच चवदार सुद्धा असतात.

घटक

  • कोर्नफ्लोर
  • रिफाईंड फ्लोर
  • काळे मिरे
  • मीठ
  • गाजर
  • कोबी
  • कॉलीफ्लॉवर
  • व्हेजिटेबल स्टॉक
  • केचप
  • सोया सॉस

कृती

  • सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्यापीठे घालून मिक्स कराजास्तीचे पाणी घालू नका.
  • पिठापासून छोटे गोळे तयार करा आणि पॅनमध्ये लालसर होईपर्यत तळून घ्याजास्तीचे तेल शोषून घेण्यासाठी पेपर नॅपकिनचा वापर करा.
  • एक भांडे घेऊन त्यामध्ये आले लसूण पेस्ट परतून घ्यानंतर त्यामध्ये कांदा घालून तो चांगला परतून घ्या नंतर मसाले आणि सॉस घाला.
  • व्हेजिटेबल स्टॉक घालून ते उकळू द्यात्यामध्ये कोर्नफ्लोर पेस्ट घालात्यामध्ये तळलेले हलकेच सोडा.

गव्हाचा केक

गव्हाचा केक
तुमच्या बाळाला हा गव्हाचा केक द्यातो फक्त चविष्ट नाही तर पोषक सुद्धा आहे.

घटक

  • बेकिंग पावडर
  • केळं
  • सुकामेवा
  • तूप
  • गुळ
  • दूध
  • गव्हाचे पीठ

कृती

  • पीठ तुपावर भाजून घ्या आणि ते थंड होऊ द्या
  • गूळ आणि केळ्यासोबत पीठ मिक्सरमधून काढून घ्या आणि त्यामध्ये तळलेला सुकामेवा घाला
  • कुकरच्या भांड्याला तूप लावून घ्या आणि त्यामध्ये वरील मिश्रण घालाकुकरमध्ये थोडे पाणी घाला आणि मध्यम आचेवर कुकरची शिट्टी काढून शिजू द्या.
  • केक खायला देण्याआधी थोडा थंड होऊ द्या

रव्याची खीर

रव्याची खीर

जेवणासाठी रव्याची खीर म्हणजे तुम्हाला थोडे वेगळे वाटेलपरंतु हा पदार्थ पोटभरीचा असून बाळाला आवडतो.

घटक

  • पाणी
  • वेलची पूड
  • तूप
  • रवाभाजलेला

कृती

  • भांड्यात पाणी घालून ते उकळू द्या
  • त्यामध्ये भाजलेला रवा घालून गाठी होऊ नयेत म्हणून ढवळत रहा
  • थोडा वेळ शिजू द्या आणि त्यामध्ये थोडे तूप घालून चांगले मिक्स करा
  • संपूर्णपणे शिजल्यावर गॅस बंद करा आणि त्यामध्ये वेलची पूड घाला

भरवण्यासाठी टिप्स

बाळासाठी जेवण तयार करताना आणि बाळाला भरवताना मनात खालील काही टिप्स ठेवा

  • दररोज बाळाच्या आहारात भाज्यांचा समावेश होतो आहे ना ह्याची खात्री करा
  • बाळाला आवडत नसेल तर पानात वाढलेलं सगळं संपवलंच पाहिजे असा आग्रह धरू नका
  • तसेच एखादा पदार्थ आवडला म्हणून खूप खाऊ देऊ नका
  • जर बाळाने दुपारचे जेवण घेतले नाही तर संध्याकाळचा नाश्ता न्याय्य असला पाहिजे
  • रात्रीच्या जेवणात आरामदायक रित्या खाता येईल अशा पदार्थांचा समावेश करा
  • जर बाळाला एखादा पदार्थ आवडत नसेल तर तुम्ही तो खाऊन पहा
  • तुमच्या बाळाला जेवणाच्या टेबलावर कुटुंबियांसोबत बसू द्या
  • बाळाला नवीन पदार्थांची ओळख करून देताना ऍलर्जीवर लक्ष ठेवा
  • बाळाला अन्नपदार्थ शक्यतोवर कुस्करून भरवा
  • गोड पदार्थ मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात देऊ नका

जर तुम्ही उपलब्ध असलेल्या पदार्थ वापरून वेगवेगळे अन्नपदार्थ तयार केलेत तर २० महिन्यांच्या बाळाला चांगला नाश्ता तसेच जेवण देणे हे वाटते तितके अवघड नाही.

अस्वीकरण

  1. प्रत्येक मूल हे वेगळे असते त्यामुळे तुमच्या विवेकबुद्धीनुसार ह्या आहाराच्या योजना वापरातुम्ही तुमच्या मुलाच्या आवडीनुसारगरजेनुसार ह्या आहार योजनांमध्ये बदल करू शकता
  2. बाळाला जबरदस्तीने कधीच भरवू नका
  3. फॉर्मुला तयार करताना बॉक्सवरील सूचना पाळा आणि त्याबरोबर दिलेला मापाचा चमचा वापरा
  4. बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना सुरुवातील पाणीदार सूप करूंन द्यावेजसजसे बाळाची वाढ होईल तसे बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने किंवा आईने बाळाला गिळता येईल अशा पद्धतीने सूपचा घट्टपणा वाढवावाखूप घट्ट अन्नपदार्थांमुळे बाळाचे पोट बिघडते किंवा जड होतेआणि खूप पातळ पदार्थांमुळे बाळ भुकेले राहू शकते
  5. काही मुले काही दिवस कमी खातात ज्या मुळे काळजी करण्याचे काही कारण नाहीतथापिजर बाळ सलग ३४ दिवस कमी खात असेल तर तुमच्या डॉक्टरांची मार्गदर्शनासाठी भेट घ्या
  6. दात येताना किंवा बाळाला बरे नसेल तर तो किंवा ती कमी खाऊ शकतेतुम्ही स्तनपान किंवा फॉर्मुला ह्या दिवसात वाढवू शकताबाळ बरे झाल्यावर पुन्हा तुम्ही हे अन्नपदार्थ बाळाला देऊ शकता
  7. बाळाला जुलाब होत असतील तर बाळाला भरवणे बंद करू नका
  8. जर तुमचे मूल सुरुवातीला अन्नपदार्थ खात नसेल तर दालचिनीजिरेपावडरलिंबाचा रसकढीपत्त्याची पाने वापरून तुम्ही अन्नपदार्थांची चव बदलू शकता
  9. तुमच्या मुलाला सुकामेवाग्लूटेन किंवा अंड्यांची ऍलर्जी असेल तर बाळाला कुठलेही अन्नपदार्थ भरवण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी कृपया संपर्क साधा

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow