भीमा नदीच्या पात्रात पाच तुकडे करून टाकला तरुणाचा मृतदेह !

भीमा नदीच्या पात्रात शीर नसलेला आणि पाच तुकडे केलेला एक मृतदेह आढळून आला असून भीमा नदीचे पात्र अलीकडे अशा घटनांसाठीच अधिक चर्चिले जाऊ लागले आहे......................................

 0
भीमा नदीच्या पात्रात पाच तुकडे करून टाकला तरुणाचा मृतदेह !

भीमा नदीच्या पात्रात शीर नसलेला आणि पाच तुकडे केलेला एक मृतदेह आढळून आला असून भीमा नदीचे पात्र अलीकडे अशा घटनांसाठीच अधिक चर्चिले जाऊ लागले आहे.


काही दिवसांपूर्वीच भीमा नदीच्या पात्रात एका पाठोपाठ एक असे सात मृतदेह आढळले होते. एकाच  कुटुंबातील सात जणांची हत्या करून त्यांचे मृतदेह भीमा पात्रात टाकले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आणि या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरून गेला होता. या मृतदेहात लहान मुलांचाही समावेश होता आणि हे सगळे खून नात्यातील व्यक्तीनेच केले असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी येथील भीमा नदीच्या पात्रात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला असून या मृतदेहाचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले आहे. धारदार शस्त्राने या तरुणाचे डोके कापून बेपत्ता करण्यात आले आहे तर शरीराचे पाच तुकडे करण्यात आलेले आहेत. डोके धडापासून वेगळे करण्यात आले असल्याने आणि ते बेपत्ता असल्याने या मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. (The young man's body was cut into five pieces and dumped in the Bhima River) साधारण ३० वर्षाचे वय असलेल्या या तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून करून त्याचा मृतदेह नदीच्या पात्रात फेकून दिल्याचे दिसून येत आहे. 


या घटनेची माहिती मिळताच पोलीस पुन्हा एकदा सक्रीय झाले असून हा मृतदेह पात्राबाहेर काढण्यात आला आहे.  तरुणाच्या शरीराचे पाच तुकडे करून ते एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून पाण्यात फेकण्यात आल्याचे दिसून आले. या घटनेने भीमा नदी पात्राच्या काठावरील गावात एकच  खळबळ  उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी लगेच या घटनेचा तपास सुरु केला असून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अत्यंत अमानुषपणे आणि क्रूर पद्धतीने केलेला हा खून असून शरीराचे पाच तुकडे करून पिशवीत भरले गेले आहेत. मृतदेहाचे डोके बेपत्ता असल्यामुळे पोलिसांपुढे शोधाचे आव्हान असले तरी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्न करू लागले आहेत. ओळख पटली की खुनी आरोपीचा छडा लागण्यास मदत होणार आहे. ज्या पद्धतीने खून केला गेला आहे ही पद्धत मात्र अगदीच क्रूर असून कुणाच्या अंगावर शहारे आणणारी ही घटना आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow