डॉ लक्ष्मणराव देगलूरकर यांच्या सुविद्य पत्नी सौ , शशिकलाताई देगलूरकर यांच्या निधन

अमर कुसाळकर (संपादक - ओडर संदेश) | 9356823585

 0
डॉ लक्ष्मणराव देगलूरकर यांच्या सुविद्य पत्नी सौ , शशिकलाताई देगलूरकर यांच्या निधन

डॉ लक्ष्मणराव देगलूरकर यांच्या सुविद्य पत्नी सौ , शशिकलाताई देगलूरकर यांच्या निधनाचे  वृत्त ऐकून,  आपल्या ओडर संदेश whats app ग्रुपवर वाचून धक्काच बसला . . .अस्वस्थ वाटू लागले , अनामिक हुरहूर वाटू लागली , काहीतरी चुकल्यासारखे वाटू लागले . डोंबिवली मुंबई येथील आपले जेष्ठ सहकारी व देगलूरकर कुटुंबीयांचे स्नेही असलेले श्री वसंत शिंदे साहेब यांनी फोन वरून बातमी सांगितली . . .
 
    मागील काही महिन्यापासून डॉक्टर साहेबांचे व आपले फोनवरून नियमित बोलणे असायचे . दीड एक महिन्यापूर्वी सरांचे व आपले बोलणे झाले होते व स्वर थोडा कापरा वाटला म्हणून त्यांना विचारले होते कि सर तब्येत तर ठीक आहे नां ! , तेंव्हा देगलूरकर सरांनी सांगितले होते कि ताईनां admit केले आहे म्हणून . . . मी दोघांनीही काळजी घ्या असे बोललो नंतर बोलूयात असे सांगितले . वसंत शिंदे साहेबांचे व माझे दररोज चे बोलणे असल्यामुळे मी त्यांना ते सांगितले , आम्हाला वाटले थोडेफार काहीतरी आजार असेल म्हणून . . . 

    आपल्या ओडर संदेश वेबसाईटचे काम चालू होते व मी देगलूरकर सरांचे नेहमीच मार्गदर्शन घेत असतो . 1994 ला हि ते काळाच्या पुढचे होते व आजच्या काळातही कुणाही पेक्षा मला त्यांचा अभ्यास जास्त वाटतो म्हणून त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे . ओडर संदेश वेबसाईट च्या content साठी मला देगलूरकर सरांचे मार्गदर्शन व सहभाग हवा होता म्हणून मी त्यांना पुन्हा एक महिन्याने 3 सप्टेंबर ला फोन केला , सरांनी तो उचलला नाही , मला तिथे प्रथम शंका आली , मी ती शंका शिंदे साहेबांना बोलून दाखवली , शिंदे साहेबांचा फोन देगलूरकर सर टाळणे शक्य नसते कारण त्यांचे घरगुती संबंध कित्येक वर्षापासून आहेत , त्यांचाही फोन उचलला गेला नाही , मी पुन्हा फोन लावला , यावेळी सरांनी फोन उचलला व बोला म्हणाले . . . मी म्हटले थोडे बोलायचे होते पण त्यांचा स्वर थोडा वेगळा वाटत होता,  सर म्हणाले मी हॉस्पिटल मध्ये आहे व डॉक्टरांशी बोलत आहे . . . आपण नंतर बोलूयात असे म्हणून मी जास्त बोलणे उचित समजले नाही . शिंदे साहेबांचे आमचे बोलणे झाले व गोष्ट सिरिअस असावी असा आम्ही तर्क काढला व आम्हाला साहेबांची काळजी वाटू लागली . . . 

    खरे तर आम्ही , शिंदे साहेब व मी फेब्रुवारी २०२३ मध्ये खास देगलूरकर साहेबांना भेटायला त्यांच्या औंध येथील निवासस्थानी गेलो , देगलूरकर सर व मी फेसबुक व whats app च्या माध्यमातून , फोनच्या द्वारे संपर्कात होतो पण आमची प्रत्यक्षात भेट नव्हती व त्यांची भेट घेण्याची माझी खुप इच्छा होती , समाजाचे कार्य मी काही काळ थांबवले होते  तरीही काही आदरणीय व्यक्तींशी माझा संपर्क होताच . . . 

आम्ही बहुतेक 3 फेब्रुवारी ला भेटलो असेल , तेंव्हा ताईने आमचे शिंदे साहेब सोबत असल्यामुळे चांगले स्वागत केले . तेंव्हा त्या खूप प्रसन्न , तब्येतीने ठणठणीत व स्वास्थ्याची कुठलीही तक्रार नाही अशा होत्या , उलट डॉक्टर साहेबांच्या तब्येतीची काळजी त्या जास्त काळजी घेताना दिसतं होत्या . माझ्या पिढीने डॉक्टर देगलूरकर यांचे नाव ऐकले होते , तेंव्हा ते हिरोच होते समाजाचे , त्यामुळे ताई बद्दल माहित असण्याचे काही कारण नव्हते पण ताई जेंव्हा आमच्याशी बोलायला लागल्या तेंव्हा आपली वैचारिक उंची कमी असल्याचे जाणवले . डॉक्टर साहेबासोबत 1990 पासून साथ सोबत करणे सोपे काम नक्कीच नव्हते , साहेबांना ताईंनी सावली सारखी साथ देल्याचे त्यांच्या शब्दाशब्दातून टपकत होते . साहेबांना 1994 दरम्यान हॉस्पिटलमध्ये admit करण्याची वेळ आली तेंव्हाचा किस्सा त्यांनी अत्यंत पोटतिडकीने सांगितला . . . शरद पवारांनी स्वतः साहेबांना अथवा ताईनां कुठून खासदारकी पाहिजे , बोला . .  हे विचारले होते , तेंव्हाही त्यांनी समाजालाच प्राथमिकता दिल्याचे सांगितले . राजकारणाच्या तसेच समाजकारणातील , सरकारी वरिष्ठ पातळीवरील त्यांचे सलोख्याचे संबंध यांचा वापर ते समाजासाठी करू इच्छित होते . . . 

ताईचा समाजाबद्दल काहीसा तक्रारीचा सूर हि होता पण तो झालेल्या त्रासाबद्दल ममत्वाच्या भावनेतूनच होता . आमची ती मिटिंग खूप छान झाली होती व मी एक वडार समाजातील अत्यंत पुरोगामी विचारसरणीच्या महिलेशी बोलत आहे हे जाणवले . डॉक्टर साहेबांच्या तब्येतीच्याच तेंव्हा गोष्टी झाल्या परंतु तेंव्हा असे थोडे हि वाटले नाही कि ताई एक दोन महिन्यात आजारी पडतील . . . खरेच ताई जाने हे खूपच अविश्वनीय व अकल्पित आहे . 

अखिल महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटना चे सेक्रेटरी श्री शामराव पवार यांनी मला 1994 च्या मेळाव्याची स्मरणिका व “वडलू नायक “ या देगलूरकर पती पत्नी यांनी सुरु केलेल्या मासिकाची एकेक प्रत दिली होती . . . “वडलू नायक “या मासिकाच्या शशिकलाताई देगलूरकर या संपादिका होत्या . वडार समाजात हा खूप दुर्मिळ योग आहे . . .

 1984/85 मध्ये कल्याणराव जाधव व शांताबाई कल्याणराव जाधव यांनी ओडर संदेश हे मासिक समाज जोडण्यासाठी व सामाजिक सुधारणा करण्यासाठी सुरु केले होते व ओडर संदेश च्या संपादिका या शांताबाई जाधव या होत्या व जवळजवळ 20 वर्षांनी पुन्हा एकदा एक महिला मासिकाच्या संपादक झाल्या होत्या . . . 

डॉक्टर देगलूरकर यांचे वडार समाजातील कार्य हे ऐतेहासिक होते व आमच्यासारख्यांना ते कार्य दीपस्तंभासारखे आहे व आपल्याला त्यांचे कार्य नेहमीच प्रेरणा देत राहील . या हि वयात तब्येतीची तक्रारी असताना ते मिटींगा घेण्यासाठी प्रोत्साहित करत असतात . साहेब म्हणजे वैचारिक वादळ आहेत व कार्यात तुफान होते म्हणूनच ते महाराष्ट्रभर दौरे करू शकले , समाज एकवटू शकले आणि त्या तुफानाची सावली होणे सोपे नव्हते , त्या बैठकीत आम्हाला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे दोघे हि एकमेकांची खूप काळजी घेत होते , दोघांचीही वैचारिक बैठक खूप पक्की होती व दोघेही एकमेकांचा खूप आदर करत होते . निवृतीच्या काळात दोघेही एकेमेकांना सांभाळत होते . 

आता देगलूरकर साहेबांची काळजी वाटत आहे , देगलूरकर कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची ताकत मिळो , त्यांनी खूप मोठा गोतावळा महाराष्ट्रभर निर्माण केलेला आहे . . . ताईच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व ओडर संदेश whats app ग्रुप व मासिक ओडर संदेश टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो . . . .

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow