राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंढरपूर तालुक्यातर्फे अनंत चतुर्दशी निमित्त गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी पाणी वाटप

योगेश कुलकर्णी | तालुका कार्यवाह | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

 0
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंढरपूर तालुक्यातर्फे अनंत चतुर्दशी निमित्त गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी पाणी वाटप
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंढरपूर तालुक्यातर्फे अनंत चतुर्दशी निमित्त गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी पाणी वाटप
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंढरपूर तालुक्यातर्फे अनंत चतुर्दशी निमित्त गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी पाणी वाटप
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंढरपूर तालुक्यातर्फे अनंत चतुर्दशी निमित्त गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी पाणी वाटप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंढरपूर तालुक्यातर्फे अनंत चतुर्दशी निमित्त गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी पाणी वाटप केंद्र चौफाळा, पंढरपूर येथे उभे केले होते. चौफाळामध्ये शिवाजी चौकापासून आपली कला सादरीकरण करत आलेले कार्यकर्ते दमलेल्या स्थितीमध्ये पाण्यासाठी तहानलेले असतात अशावेळी त्यांना आणि उपलब्ध होत नाही हे पाहून गेले दोन वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या ठिकाणी पाणी वाटप केंद्र सुरू केले. याचा अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच मिरवणूक पाहायला आलेल्या अनेक गणेश भक्तांनी याचा लाभ घेतला व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंढरपूर तालुका माननीय संघचालक सुधाकर काका जोशी, तालुका कार्यवाह योगेश कुलकर्णी, सहकार्यवाह सुजित दिवाण, जिल्हा सेवा प्रमुख सारंग जी बडोदकर, तालुका सेवा प्रमुख वैभव नवाळे उपस्थित होते. यावेळी समीर कुलकर्णी, अमोल डिंगरे व बाल स्वयंसेवक मोहित उंबरकर व अन्य अनेक स्वयंसेवकांनी येथे पाणी वाटपाच्या सेवेमध्ये सहभाग नोंदवला. यासाठी मकरंद, मिलिंद व बाळासाहेब बडवे यांनी जागा तर रेणुका जलचे  विजय देशपांडे यांनी पाणी जार उपलब्ध करून दिले. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow