आचार्य अत्रे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

१३ जून आचार्य अत्रे यांच्या ५४ व्या पुण्यतिथी निमित्त आचार्य अत्रे स्मारक समिती मुंबईच्या वतीने
वरळीनाका येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आम्ही अभिवादन करण्यात आले, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी मराठाकार आचार्य अत्रे यांच्या आठवणी याप्रसंगी जागविण्यात आल्या. याप्रसंगी समितीच्या अध्यक्षा ऍड आरती सदावर्ते- पुरंदरे, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, कुटुंब रंगलय काव्यातचे विसुभाऊ बापट, समितीचे कार्यवाह रवींद्र आवटी, ज्येष्ठ सिनेपत्रकार नंदू पाटील, संघाचे माजी प्रमुख कार्यवाह श्रीकांत मयेकर, निवृत्त ACP शरद बर्डे, सौ मधूमंजिरी गटणे उपस्थित होते. यावेळी अत्रेसाहेबांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष वेगवेगळ्या उपक्रम-कार्यक्रमांनी साजरे करण्याचे ठरविण्यात आले.
What's Your Reaction?






