कित्तेक वर्ष्याच्या पाठपुराव्यानंतर शिवपार्वती नगर मधील बंधिस्त भुयारी ड्रेनेज काम पूर्ण
टाकळी:- शिवपार्वती नगर मधील सांड पाण्याची व्यवस्था करण्यासाठी भुयारी बंधिस्त गटारीची मागणी फार वर्षांपासून प्रलंबित होती. शिवपार्वती नगर मधील नागरिकांनी सतत पाठ पुरावा करूनही मागील ५ ते ६ वर्ष पासून ते काम पूर्ण होत नव्हते, टाकळी ग्रामपंचायत मधील नूतन सरपंच मा. विजयमाला स. वाळके व उपसरपंच मा. श्री संजय साठे, मेंबर श्री. सचिन वाळके, मेंबर मा. महादेव पवार (वॉर्ड नो. ३) व मेंबर सागर कारंडे यांच्या प्रयत्नाने ते काम अवघ्या ६ महिन्या च्या आधी पूर्ण केले, त्या बद्दल शिवपार्वती नगरच्या नागरिकांनी त्यांचा छोटेसा नागरी सत्कार केला.
त्या वेळी उपस्तित असलेले जेष्ठ श्री. सलीम बोहरी, श्री. प्रभू कुंभार , श्री. सुरेश मोहिते, श्री. कांतीलाल नकाते सर,श्री. साहेबराव बेंदगुडे, श्री. श्यामसुंदर तापडिया, आर्च. बाळ कुंभार, श्री. पोतदार सर, श्री. साजिद शेख, श्री. सुशांत मोहिते, श्री. आदमने, श्री. खंकाळ सर व इतर रहिवासी उपस्तिथ होते.
What's Your Reaction?






