पंढरपूर मधील अरिहंत पब्लिक स्कूलमध्ये दिंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला

अवघे गरजे पंढरपुर ।
चालला नामाचा गजर।।
या उक्ती प्रमाणे पंढरपूर मधील नावाजलेल्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित अरिहंत पब्लिक स्कूल मध्ये आषाढी वारी निमित्त दिंडीचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी सीबीएसई व स्टेट बोर्ड अशा दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांसमवेत पालकांनीही हजेरी लावली. पालखी प्रस्थानाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली तर पालखी घेण्याचा मान इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना देण्यात आला होता.
दिंडी निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये भारुड ,प्रवचन, अभंग ,शिक्षकांचे टाळ नृत्य, व संतांच्या वेशातील बाल चिमुकले व शेवटी रिंगण सोहळा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामुळे अरिहंतचे प्रांगण फुलून आले होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सेक्रेटरी श्री उज्वल दोशी, संचालक श्री मिलिंद शहा, प्रशालेच्या प्राचार्या सौ.सुप्रिया बहिरट मुख्याध्यापिका सौ.पद्मा लोखंडे यांनी विठ्ठलाची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात केली. शेवटी प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे पालकांमधून कौतुक होत आहे.
What's Your Reaction?






