अकलूज येथील पत्रकाराला घरात घुसून जीवे मारण्याची धमकी

अकलूज (प्रतिनिधी)-
अकलूज येथील नौशाद शमशुद्दीन मुलाणी,-संपादक टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनेल, वय वर्ष 39 समता नगर अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर. यांना तू अवैध धंद्याच्या बातम्या का छापतो? म्हणून काही आज्ञात व्यक्तींनी घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
याबाबत मुलानी यांनी एस.पी.,आय.जी. गृहमंत्री . मुख्यमंत्री.यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. याबाबत त्यांनी अधिक माहिती अशी दिली की,मी नौशाद मुलाणी अकलूज येथील रहिवासी असून मी गेली अनेक वर्षापासूनटाइम्स 9 मराठी न्युज पोर्टल, यु ट्युब चा संपादक म्हणून काम पाहतो .समाजातील घडणार्या घटना तसे उपक्रम याच्या बातम्या प्रसिद्ध करणे हे माझे पत्रकार म्हणून काम आहे.
दि.20/01/2023 रोजी अकलूज पोलीसांनी ऑनलाईन जुगार अड्ड्यावर कारवाई करुन दोन ईसमावर कारवाई केल्याची प्रेस नोट पोलीस निरीक्षक अकलूज पोलीस ठाणे यांनी काढली होती. सदर गुन्हा हा रजिस्टर क्र.38/2023 महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4 प्रमाणे नोंदवला होता. सदर बातमीपत्र मी माझ्या वेब पोर्टलवर करत असताना त्यातील त्रुटी दाखवून काही गुन्हेगारांना सुट देऊन छोट्याशा पंटरवर गुन्हा दर्शवून खरे गुन्हेगार मुक्त राहीले आहेत अशे निरिक्षण मांडलेले होते.ज्यामध्ये अकलूज व परिसरात आणखीन आँनलाईन जुगार अवैध धंदे करणारे आहेत .त्यांच्यावर देखील कारवाई करावी तसेच स्थानिक अवैध धंद्यावर जिल्हास्तरीय पथक कारवाईस आले असता हे पथक येणार आहे .याची बातमी पोलीस दलातील वसुलदार यांचेकडून सदर गुन्हेगारांना अगोदरच पोहचविली जाते .त्यामुळे पोलीस पथकाची दिशाभूल होवून सर्वकाही अलबेल असल्याचे चित्र रंगवले जाते.हि बाब उघड केल्याने गुन्हेगारांचे पित्त खवळले व त्यांना अंतर्गत चिथावनी किंवा अभय मिळाल्यानेच त्यांचे धाडस वाढले व त्याचा परिणाम म्हणून अवैध ऑनलाईन जुगार धंदे चालवणारे अनोळखी लोक, माझे राहते घरी माझ्या गैरहजेरीत ,माझी पत्नी, आई -वडील असताना घरात घुसुन नौशाद कुठे आहे? त्याला निट सांगा ?सगळ्यांचा नाद कर पन आमचा नाद करु नको ?तुम्ही बातमी का छापली? तुम्ही आमचे धंदे बंद करता का ?आमचे धंदे अनेक ठिकाणी चालु आहेत .आमचे धंदे जर बंद झाले तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ.आम्ही तुम्हाला सोडणार नाही?. आमचे धंदे बंद पाडतो काय? असा दम, जीवे मारण्याची धमकी देऊन निघुन गेले .सदर गुन्हयाची तक्रार जिल्हा पोलीस प्रमुख, नात्याने आपणाकडे पाठवत आहे व हीच कायदेशीर तक्रार आहे असे धरुन तेथेच शुन्य क्रमांकाने नोंदवून घ्यावी. आशा आशयाची मी तक्रार अकलूज पोलीस स्टेशन व ईमेलद्वारे एस. पी. आय. जी. डी. आय. जी .गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना पाठवली आहे.
अकलूज व परिसरामध्ये अनेक प्रकारचे अवैध धंदे बोकाळलेआहेत. त्यामध्ये मटका, गुटखा, मावा ,हातभट्टी दारू, शिंदी ,ऑनलाईन जुगार ,बेकायदेशीर गॅस भरणे, गांजा विक्री, जुगार अड्डे, गोल्ड कॅफेची दुकाने व त्यातून चालणारा व्यवसाय अशा प्रकारचे एक ना अनेक अवैधधंदे चालू आहेत. त्यामुळे अवैधंदेवाल्यांना असलेला पैशाचा माज व पोलिसांशी असलेले संबंध त्यामुळे ते कायद्याला कसलेही जुमानत नाहीत. वर्षभरापूर्वी एका पोलिसाला ही वाळू वाल्याने मारहाण केली होती. या सर्वांना वेळीच चाप लावला नाही, तर सर्वसामान्याचे जगणे अक्षरश मुश्किल होऊन जाईल. याबाबत अकलूज पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी गांभीर्याने विचार करून अवैध धंद्यावर कारवाई करावी अन्यथा अकलूज मधील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याशिवाय राहणार नाही.
What's Your Reaction?






