दुसऱ्या तिमाहीतील आहार व पोषण

 0
दुसऱ्या तिमाहीतील आहार व पोषण

दुसरी तिमाही हा गरोदरपणाचा सुवर्णकाळ आहे, कारण ह्या काळामध्ये पहिल्या तिमाहीतली अस्वस्थता संपलेली असते, आणि तिसऱ्या तिमाहीतला त्रास अजून दूर असतो. त्यामुळे ह्या महिन्यांमध्ये आरोग्यपूर्ण आहार घेतला पाहिजे, म्हणजे तुम्हाला आणि वाढणाऱ्या बाळाला पुरेसे पोषण मिळेल.

गरोदरपणातील दुसऱ्या तिमाहीत काय खायला हवे?

दुसरी तिमाही म्हणजे १४ वा आठवडा ते २६ वा आठवडा जेव्हा तुमचे बाळ ३५ सेंमी पर्यंत वाढते. दुसऱ्या तिमाहीत आरोग्यपूर्ण आहार घेणे महत्वाचे आहे. आरोग्यपूर्ण आहारामुळे तुम्हाला लागणारी पोषणमूल्ये ह्या काळात मिळतील. पोषक आहार हा बाळाच्या हाडांच्या आणि मांसाच्या विकासासाठी महत्वाचा आहे. तुम्ही कॅल्शिअम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार घेणे गरजेचे आहे.

दुसऱ्या तिमाही साठी लागणारी पोषणमूल्ये आणि त्यांचे स्रोत

तुमच्या आहारात कार्बोहैड्रेट्स, फॅट्स, जीवनसत्वे आणि भरपूर पाणी असायला हवे. प्रत्येक जेवणात वरील प्रत्येक प्रकारचे ३ भाग हवेत.

आपल्या आहारात पुढील गोष्टींचा समावेश हवा


  • फॉलीक ऍसिड आणि लोह योग्य प्रमाणात मिळण्यासाठी तुम्ही हिरव्या पालेभाज्या जसे की पालक आणि फळे खायला हवीत.
  • तुमच्या प्रत्येक जेवणात कार्बोहैड्रेट (पिष्टमय पदार्थ, सर्वधान्य ब्रेड) असायला हवेत.
  • शरीराला कॅल्शिअम मिळावे म्हणून कमी चरबी असलेले दुग्धजन्य पदार्थ दिवसातून कमीतकमी २ वेळा खाल्ले पाहिजेत.
  • जास्त प्रथिने असलेले अन्नपदार्थ (जसे की मासे, अंडी) दिवसातून २ वेळा खाल्ले पाहिजेत.
  • बाळाचा मेंदूच्या विकासासाठी ओमेगा ३ फॅटी ऍसिडस् जरुरी आहेत, त्यामुळे मासे (आठवड्यातून एकदा) खायला हवेत.
  • नाश्त्यासाठी आरोग्यपूर्ण पर्याय निवड (उदा: सँडविचेस, दही).

दुसऱ्या तिमाहीसाठी जेवणाची योजना

तुमच्या बाळाला लागणारी पोषणमूल्ये योग्य प्रमाणात मिळण्यासाठी आणि वजन व्यवस्थित वाढण्यासाठी गर्भारपणातील दुसऱ्या तिमाहीत तुमच्या जेवणाची नीट योजना आखून त्याप्रमाणे जेवण घेणे अतिशय महत्वाचे आहे.

योजना तयार करताना जी फळे कायम उपलब्ध असतात त्यांचा त्यात समावेश करायला हवा. जर एखादे फळ किंवा भाजी उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुम्ही त्या काळात उपलब्ध असलेले फळ खाऊ शकता.

काहीवेळा एकच पदार्थ अनेक पोषणमूल्यांचा स्रोत असू शकतो. त्यामुळे तुम्हाला एकच पदार्थ वेगवेगळ्या तिमाही मध्ये वेगवेगळ्या पोषणमूल्यांचा स्रोत म्हणून खायला सांगतिले जाते.

गर्भारपणाच्या पूर्ण कालावधीत तुम्ही स्वतःला सजलीत ठेवले पाहिजे. गर्भधारणेदरम्यान कॅफेन चा वापर मर्यादित हवा.

दुसऱ्या तिमाहीसाठी जेवणाची योजना

आहाराचा नमुना

न्याहारी २ कप धान्य, १ कप फळे, १ oz मांस/ बीन्स आणि १ कप दूध

नाश्त्याचे एक उदा: २ oz पूर्णधान्य ब्रेड, १ टी स्पून मार्गरिन आणि अंडे, १ कप क्यानटलोप आणि १ कप दूध (चरबीविरहित)

गरोदरपणात तुम्हाला दररोज १०००-३००० मि.ग्रॅ. कॅल्शिअम लागते.

दुपारचे जेवण १ कप हिरवी पालेभाजी, १ कप फळे, १ कप दूध आणि २ oz मांस

दुपारच्या जेवणाचे उदा: रोस्टेड बीफ (२oz) सॅन्डविच, १ टेबल स्पून मेयॉनीज, टोमॅटो अँड लेट्युस. तुम्ही १ कप बेबी कॅरेट, ताजे मोसंबी आणि एक कप चरबी नसलेले दूध

गरोदरपणात तुम्हाला दररोज २७ मि.ग्रॅ. लोह लागते.

रात्रीचे जेवण २ कप धान्य आणि हिरव्या पालेभाज्या, ३ oz मांस/ बीन्स

रात्रीच्या जेवणाचे उदा: ३ oz ग्रिल्ड चिकन, १ कप ब्राऊन राईस, ऑलिव्ह ऑइल मध्ये थोडा लसूण घालून परतून घेतलेला पालक, १ टेबलस्पून सलाड ड्रेसिंग घातलेले ग्रीन सलाड.

गरोदरपणात तुम्हाला दररोज ६०० मि.ग्रॅ. लोह लागते.

नाश्ता १ कप धान्य आणि १ कप दूध

नाश्त्याचे उदा: १ कप संपूर्ण धान्य, सिरिअल आणि एक कप दूध (चरबी विरहीत)

१ oz = २८.३५ ग्रॅ.

अन्नपदार्थांचा तिटकारा आणि लालसा

ह्या काळात प्रत्येक स्त्रीला एखाद्या पदार्थाचा तिटकारा वाटतो, संप्रेरकांमधील वेगवान बदलांमुळे असे होते.

काही महिलांना चॉकलेट्स किंवा मसालेदार पदार्थ खावेसे वाटतात.

ह्याउलट काहीजणींना काही विशिष्ठ प्रकारच्या पदार्थाचा तिटकारा वाटतो. त्यांना हे पदार्थ खावेसे वाटत नाहीत. जर हे तिटकारा वाटणारे पदार्थ भाज्या किंवा दुग्धजन्य पदार्थ असतील तर, ते बाळाच्या वाढीसाठी फार महत्वाचे असतात तर मात्र प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत डॉक्टर तुम्हाला दुसरे पदार्थ खाण्यास सुचवू शकतील. फूड सप्लिमेंट्स घेण्यास सांगू शकतील, त्यामुळे पोषणमूल्यांची कमी भरून निघते.

दुसऱ्या तिमाहीत वजनात वाढ

दुसऱ्या तिमाहीत, पहिल्या तिमाहीपेक्षा वजनामध्ये झपाट्याने वाढ होते. तुमचे वजन प्रत्येक आठवड्याला १ ते २ पौंड्स ने वाढते. ही वजनवाढ फक्त बाळाची वाढ होते म्हणून नसते तर ह्या काळात स्तनांची वाढ, गर्भाशयातले पाणी, नाळेची वाढ, गर्भाशयाच्या पेशी तसेच चरबी आणि प्रथिनांचा साठा ह्या सर्व घटकांचा समावेश असतो.

दुसऱ्या तिमाही मध्ये मळमळणे थांबते आणि बाळसुद्धा लहान असल्याने त्याचा अवयवांवर दाब पडत नाही. परंतु वजनात खूप जास्त वाढ झाल्यास प्रसूतीच्या वेळी गुंतागुंत होऊ शकते.

टाळावेत असे अन्नपदार्थ

गर्भारपणातील दुसऱ्या तिमाहीतील आहार महत्वाचा आहे, परंतु तो मर्यादित प्रमाणात घ्यायला हवा.

१. कच्चे आणि न शिजवलेले मांस टाळले पाहिजे कारण ते जीवाणू आणि साल्मोनेला ह्यांनी दूषित झालेले असतात.
२. पाऱ्याची उच्च पातळी असलेले मासे टाळलेच पाहिजे. पाऱ्यामुळे मेंदूची वाढ उशिरा होते.
३. कच्चे अंडे खाणे गर्भारपणात टाळायला हवे कारण साल्मोनेलाने ते दूषित असतात.
४. काही सॉफ्ट चीझ मध्ये लिस्टेरिया असते त्यामुळे ते खाणे टाळावे.
५. पाश्चरायझेशन न केलेले दूध पिणे टाळावे कारण त्यात सुद्धा लिस्टेरिया असते.
६. गरोदरपणात काही प्रमाणात कॅफेन चालू शकते.
७. अल्कोहोल पूर्णपणे टाळायलाच हवे.
८. न धुतलेल्या फळे आणि भाज्या खाण्यासाठी सुरक्षित नाहीत. कारण ते टोक्सओप्लास्मा नावाच्या जिवाणूमुळे दूषित झालेले असू शकतात. आई आणि बाळासाठी हे हानिकारक ठरू शकते.

टाळावेत असे अन्नपदार्थ

आरोग्यपूर्ण आहार घेताना तुम्हाला पुरेशी ऊर्जा मिळेल इतक्या प्रमाणात अन्नपदार्थ घेतले पाहिजेत. तुम्ही दररोज किती प्रमाणात आहार घ्यावा याविषयी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आहाराचा मुख्य उद्देश निरोगी वजन वाढ होणे हा आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow