गरोदरपणातील मूत्रमार्गाच्या संसर्गावर (यूटीआय) ६ घरगुती उपाय

 0
गरोदरपणातील मूत्रमार्गाच्या संसर्गावर (यूटीआय) ६ घरगुती उपाय

जेव्हा जीवाणू मूत्रमार्गात प्रवेश करतात तेव्हा एखाद्या महिलेला मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग होऊ शकतोएखाद्या स्त्रीच्या मूत्रमार्गात जीवाणूंची पैदास होऊ शकतेगरोदरपणात मूत्रमार्गाचा संसर्ग होणे सामान्य असतेजेव्हा गरोदरपणात गर्भाशय वाढते तेव्हा गर्भाशयाच्या वाढलेल्या वजनामुळे मुत्राशयातून मूत्राचा निचरा नीट होत नाही आणि त्यामुळे संसर्ग होऊ शकतोगर्भवती महिलांना गर्भावस्थेच्या ६व्या आणि २४व्या आठवड्यादरम्यान मूत्रमार्गाच्या संसर्गाचा(युटीआयधोका वाढतोतुम्ही गर्भवती असल्यासगरोदरपणात मूत्रमार्गाचा संसर्ग झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुमचे डॉक्टर लघवीची चाचणी किंवा कल्चर करण्यास सांगू शकतीलजर ह्या चाचण्यांचे निकाल सकारात्मक आले तर काळजीचे कारण आहे कारण त्यावर त्वरित उपचारांची गरज असते अन्यथा त्यामुळे मूत्रपिंड खराब होऊ शकतेडॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक आहे परंतु तुम्ही ह्या संसर्गापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपायांचा सुद्धा विचार करू शकतामूत्रमार्गाचा संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी किंवा त्यावर उपचार करण्यासाठी नेहमीच्या उपचारपद्धतीपेक्षा नैसर्गिक उपाय सुद्धा आहेतपरंतु यूटीआयच्या नैसर्गिक उपायांवर चर्चा करण्यापूर्वीत्याच्या लक्षणांशी परिचय करून घेऊयात.

यूटीआयची चिन्हे आणि लक्षणे

तुम्हाला यूटीआय असल्यासतुम्हाला खालीलपैकी एक किंवा अधिक लक्षणे जाणवू शकतात आणि तुम्ही त्याबद्दल आपल्या डॉक्टरांना माहिती दिली पाहिजे.

  1. मूत्रात रक्त किंवा श्लेष्मा
  2. लघवी करताना जळजळ होणे
  3. पोटदुखी
  4. ताप आणि असंयम
  5. ढगाळ किंवा दुर्गंधीयुक्तमूत्र
  6. वारंवार लघवी करण्याची इच्छा

गरोदरपणातील मूत्रमार्गाचा संसर्गावर नैसर्गिक उपाय

शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती असूनहीकाही प्रमाणात बुरशीजीवाणू आणि विषाणू मूत्रमार्गात प्रवेश करतात आणि मूत्राशय व मूत्रमार्गात राहतातबहुतेक मूत्रमार्ग जंतुसंसर्गविशेषतखालच्या मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग बहुधा आपोआप कमी होतोपरंतु जेव्हा ते होत नाहीतेव्हा प्रतिजैविके लिहून दिली जाताततथापिगरोदरपणात हे काटेकोरपणे टाळले पाहिजेगर्भवती असताना मूत्रमार्गाचा संसर्गावर उपचार करण्याचा एक चांगला पर्याय म्हणजे त्यावरील नैसर्गिक उपायघरी मूत्रमार्गाच्या संसर्गावर उपचार करण्याचे काही मार्ग येथे आहेत.

द्रवपदार्थाचे सेवन वाढवा

दररोज भरपूर प्रमाणात पाणी आणि द्रवपदार्थ पिण्यामुळे तुमच्या मूत्रमार्गातील जीवाणूंना बाहेर काढण्यास मदत होतेजास्त पाणी प्यायल्याने जास्त प्रमाणात लघवी होते आणि संसर्ग टाळता येतोआपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर जेव्हा तुमहाला तहान लागेल तेव्हा पाणी प्याअशाप्रकारे जीवाणू तुमच्या शरीरातून बाहेर पडून संक्रमणाची शक्यता कमी होते.

द्रवपदार्थाचे सेवन वाढवा

वारंवार लघवी करणे

गरोदरपणातमूत्राशयात जिवाणू वाढू नयेत म्हणून अनेकदा लघवीला जाणे आवश्यक आहेजर एखाद्या व्यक्तीने बराच काळ मूत्र धरून ठेवले तर त्यामुळे संसर्ग होऊ शकतोपरंतु जर तुम्ही वारंवार लघवी केली तर जिवाणू मुत्राशयातून बाहेर पडण्यास मदत होईलत्यामुळे वारंवार लघवी करा आणि तुमच्या मुत्राशयातून जिवाणू बाहेर टाकण्यास त्यामुळे मदत होईल.

प्रोबायोटिक्स घ्या

प्रोबायोटिक्स मानवी शरीराच्या वनस्पतीचे समर्थन करतात जे शरीराच्या संरक्षणासाठी वापरले जातातप्रोबियॉटिक्समुळे आतड्यातील निरोगी जिवाणू वाढण्यास मदत होते (ते हानिकारक जिवाणूंपासून मुक्त ठेवतात). प्रोबायोटिक दही आणि कच्चे चीज सारखे आंबवलेले पदार्थ हे आरोग्यासाठी प्रोबियोटिक पदार्थ आहेतहे पदार्थ खाल्ल्यास कोणत्याही रोगाचा त्रास न होता तुमच्या शरीराच्या जीवाणूंची सामग्री पुनर्संचयित करण्यात मदत होऊ शकते.

प्रोबायोटिक्स घ्या

क्रॅनबेरी रस प्या

मूत्रमार्गाचा संसर्गावर क्रॅनबेरी रस पिणे हा एक उत्तम उपाय आहेक्रॅनबेरी मूत्रमार्गाचा संसर्ग प्रतिबंधित करतेक्रॅनबेरीचा रस देखील संसर्गास कारणीभूत असलेल्या जिवाणूंची वाढ टाळण्यासाठी मदत करू शकतो.

लवंग तेल वापरा

लवंग तेल अँटीबॅक्टेरिअलअँटीवायरल आणि अँटीफंगल गुणधर्मांकरिता ओळखले जातेलवंग तेलाचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म ई कोली ला मारण्यासाठी आणि मूत्रमार्गाचा संसर्गाची शक्यता टाळण्यास मदत करतातलवंग तेलाच्या विशिष्ट उपयोगामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग रोखला जाऊ शकतोतथापिलवंग तेलाचा वापर केल्याने शरीरावर काही प्रतिक्रियाही येऊ शकतातम्हणूनचकेवळ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आणि आपल्या आरोग्य सेवा प्रदात्याच्या देखरेखीखालीच याचा वापर करा.

लवंग तेल वापरा

व्हिटॅमिन सी चे प्रमाण वाढवा

व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढल्यास ई कोलाईच्या संसर्गाची शक्यता कमी होऊ शकते आणि मूत्रमार्गाच्या संसर्गास प्रतिबंध होऊ शकतोव्हिटॅमिन सी मुळे लघवीच्या आम्लीय पातळीमध्ये वाढ होते आणि त्यामुळे संसर्गास कारणीभूत असलेले जिवाणू मारले जाताततसेच व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होतेव्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेली फळे आणि भाज्या खालाल मिरचीसंत्री आणि किवी हे व्हिटॅमिन सी चे चांगले स्रोत आहेतडॉक्टर आणि आहारतज्ञाशी सल्लामसलत केल्यानंतर आपल्या आहारात त्यांचा समावेश करा.

यूटीआय कसा रोखायचा?

खाली काही टिप्स दिल्या आहेत ज्यायोगे तुम्ही गरोदरपणात मूत्रमार्गाच्या संसर्गास प्रतिबंध करू शकताजरी तुम्हाला मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग झाला असेल तरीदेखील तो आणखी वाढू नये म्हणून खालील उपाय करा.

सैल कपडे घाला

हवा जाण्यासाठी आणि मूत्रमार्ग कोरडा राहण्यासाठी हलके आणि सैलफिटिंगचे कपडे आणि आतील कपडे घालातसेचशौचास जाऊन आल्यानंतर जीवाणू मूत्रमार्गात येऊ शकत नाहीत याची खात्री करण्यासाठी पुढून मागच्या दिशेने पुसा.

पोषक अन्न खा

निरोगी अन्न खा आणि निरोगी जीवनशैली जगा आहारतज्ञांचा सल्ला घ्या आणि गरोदरपणात आपण काय खाऊ शकता ते विचाराकोणत्याही परिस्थतीत जंक फूड खाणे टाळा.

स्त्रियांसाठीची उत्पादने वापरणे टाळा

अत्तरयुक्त उत्पादनेपावडर किंवा डौच वापरू नका कारण यामुळे आधीच असुरक्षित क्षेत्राला त्रास होऊ शकतो आणि परिस्थिती आणखी बिघडू शकते.

शुक्राणूनाशकांचा वापर टाळा

शुक्राणुनाशक नसलेले कंडोम वापरालैंगिक संबंध ठेवणाऱ्या महिलांमध्ये यूटीआयचे प्रमाण जास्त आहेम्हणून जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी लैंगिक संबंध ठेवत असाल तर सावधगिरी बाळगा.

वंगण वापरा

जोडीदारासह संभोग करताना वंगण वापराकारण लैंगिक संबंध असताना जास्त घर्षण झाल्यास मूत्रमार्गातील श्लेष्मल त्वचेवर सूक्ष्म आघात होऊ शकतो आणि त्यामुळे जिवाणूंच्या संख्येत वाढ होऊ शकते.

योनिमार्गाच्या आजारावर उपचार करा

योनिमार्गाच्या संसर्गाचा प्रभावीपणे उपचार करा कारण सहसा योनिमार्गाच्या संसर्गामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग बळावतोतर तुम्हाला योनिमार्गाचा संसर्ग असल्यास वेळेत उपचार करा आणि यूटीआयची शक्यता कमी करा.

मूत्रमार्गाचा संसर्ग हा मूत्रमार्गात प्रवेश करणाऱ्या जिवाणूंमुळे संभवतोत्यामुळे वेदना होऊन अस्वस्थता येतेहि समस्या पुनःपुन्हा होत राहिल्यास हे जिवाणू औषधांना प्रतिकार करताततसेच त्यामुळे दुष्परिणाम देखील होतातत्यामुळे त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही वर दिलेले घरगुती उपचार करून बघू शकतापरंतु हे घरगुती उपचार करण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्यागरोदर असताना आपल्या डॉक्टरांशी प्रत्येक छोट्या गोष्टीबद्दल बोलणे आणि सुरक्षित राहणे चांगले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow