शेवयांचा उपमा

शेवयांचा उपमा शेवयांचा उपमा ही एक अतिशय पौष्टिक आणि चविष्ट बनणारी रेसिपी आहे. ही रेसिपी बनवण्यासाठी वेळही फारसा लागत नाही. आणि अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वानाच आवडते. लहान मुलं तर मॅगी समजून हा उपमा बोटं चाटूनपुसून खातात.

 0
शेवयांचा उपमा
The image is about Shevayancha Upma

शेवयांचा उपमा

शेवयांचा उपमा ही एक अतिशय पौष्टिक आणि चविष्ट बनणारी रेसिपी आहे. ही रेसिपी बनवण्यासाठी वेळही फारसा लागत नाही. आणि अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वानाच आवडते. लहान मुलं तर मॅगी समजून हा उपमा बोटं चाटूनपुसून खातात.

शेवयांचा उपमा करण्यासाठी साहित्य:

 • शेवई-१ कप
 • तूप किंवा तेल -१ चमचा
 • मोहरी-१/२ चमचा
 • जिरे-१/२ चमचा
 • लसूण-५ ते ६ पाकळ्या
 • हिंग
 • कडीपत्ता आवडीप्रमाणे
 • मिरच्या आवडीप्रमाणे
 • चिरलेला कांदा-१/२ कप
 • मटार-१/२ कप
 • किसलेले गाजर-१/२ कप
 • हळद-१/४ चमचा
 • गरम पाणी-दीड कप
 • कोथिंबीर
 • शेंगदाण्याचे कूट-१चमचा

 शेवयांचा उपमा करण्यासाठीची कृती:

सर्वात प्रथम पॅन गरम करत ठेवावा.त्यात तेल किंवा तूप टाकून बारीक गॅसवर शेवया भाजून घ्याव्यात. खूप जास्त वेळ भाजू नयेत साधारणपणे चार ते पाच मिनिटे भाजाव्यात. हलकासा लालसर रंग आल्यावर गॅस बंद करावा. नंतर शेवया एका प्लेट मध्ये काढून घेऊन फोडणीची तयारी करावी. नंतर एका पॅन मध्ये एक चमचा तेल गरम करत ठेवावे. नंतर त्यात थोडीशी मोहरी टाकावी. मोहरी तडतडल्यावर त्यात अर्धा चमचा जिरे टाकावे. 

नंतर बारीक चिरलेली लसूण आणि कडीपत्ता टाकावा.नंतर त्यात थोडासा हिंग,बारीक चिरलेल्या मिरच्या आणि हळद टाकावी. हे सर्व थोडा वेळ परतून घेतल्यावर त्यात थोडासा कांदा टाकावा. नंतर त्यात मटार आणि बारीक चिरलेले गाजर टाकून अजून थोडा वेळ परतून घ्यावे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता.नंतर त्यामध्ये भाजलेल्या शेवया टाकाव्यात.शेवया टाकल्यावर पुन्हा सर्व मिक्स करून पाच मिनिटे परतून घ्यावे. यामध्ये १ कप शेवईसाठी साधारणपणे  दीड कप गरम पाणी टाकावे. गरम पाणी टाकल्यामुळे लवकर शिजायला मदत होते. नंतर त्यात मीठ टाकून ते शिजवून घ्यावे. शिजून झाल्यावर तुम्हाला आवडत असेल तर त्यात १ चमचा शेंगदाण्याचे कूट टाकावे. नंतर थोडी चिरलेली कोथिंबीर टाकावी. अशाप्रकारे चविष्ट असा शेवयांचा उपमा तयार.

 महत्वाची प्रश्नोत्तरे

 १)शेवयांचा उपमा तयार करतांना कोणत्या शेवया घ्याव्यात?

    शेवयांचा उपमा तयार करतांना Vermicalli च्या शेवया घ्याव्यात. आपण ज्या खिरीसाठी घेतो त्या घेऊ नयेत.

 २)शेवयांचा उपमा तयार करतांना तुम्ही अजून कोणकोणत्या भाज्यांचा समावेश करू शकता?

    शेवयांचा उपमा तयार करतांना त्यात बटाटा,रंगीबेरंगी सिमला मिरची,टोमॅटो,स्वीट कॉर्न अशा तुमच्या  आवडीच्या  भाज्यांचा समावेश करू शकता.

 

एक छोटीशी कविता

रुचकर आणि चविष्ट शेवयांचा उपमा

लहान मुलांच्या खूपच तो आवडीचा

मुलांना तर ही मॅगीच वाटेल

सर्वच भाज्या पोटातही जातील

म्हणूनच एकदा करून पहा नक्की

ही शेवयांच्या उपम्याची कृती

 

तर आज मी तुम्हाला शेवयांचा उपमा कसा तयार करावा याची रेसिपी सांगितली मला खात्री आहे की हा उपमा तुम्हाला नाली आवडेल .जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow