राम नवमी साजरी करण्यामागे काय उद्देश आहे?

राम नवमी साजरी करण्यामागे काय उद्देश आहे?

प्रत्येक वर्षाच्या राम जन्माबरोबर रामनामाच्या प्रेमाची वाढ होऊन त्यामुळे मिळणाऱ्या आनंदात अधिकाधिक भर पडावी हा रामजन्म साजरा करण्याचा मूळ उद्देश आहे.

आपला 'राम' हा केवळ देवघरात किंवा मंदिरात नसून तो प्रत्येकाच्या हृदयात आहे हे जाणून त्याप्रमाणे व्यवहारात वर्तन व्हावे हा रामनवमी साजरा करण्यामागे उद्देश असावा.

उत्सवात नुसती आरास करणे,थाट करणे, हा हेतू नसावा. प्रपंचात भगवंत आणणे हा मूळ हेतु आहे. भगवंताच्या स्मरणात राहणे हा उत्सवाचा शेवट आहे.

“राम कर्ता आहे " ही भावना दृढ होऊन मन रामनामात जास्तीत जास्त रमणे ही रामजन्म साजरा केल्याची फलश्रुति होय. रामजन्म साजरा करताना श्रीमंतांप्रमाणे गरिबांना,लहानांप्रमाणे मोठ्यांना आपलेपणा वाटेल व ज्यायोगे रामनामाचे प्रेम उत्पन्न होऊन भक्तीभाव वाढेल, अशा रितीने रामनवमीचा उत्सव साजरा व्हावा.