नॉर्मल प्रसूती विरुद्ध सिझेरिअन – फायदे आणि तोटे

 0
नॉर्मल प्रसूती विरुद्ध सिझेरिअन – फायदे आणि तोटे

तुम्ही गर्भवती आहात आणि त्या विशेष दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पहात आहात का? होणाऱ्या आई बाबांना एक मोठा प्रश्न पडतो की बाळाच्या जन्मा साठी नेहमीची पारंपरिक पद्दत निवडावी की सध्या प्रसिद्ध होत असलेली सीसेक्शन प्रसूती हा पर्याय निवडावा?

नॉर्मल प्रसूती विरुद्ध सी सेक्शन

इस्पितळे आणि अल्ट्रासाउंड मशिन्स नव्हत्या तरीसुद्धा आई बाळाला जन्म देतच होती. आता तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे बाळाच्या आईला बाळाला जन्म देण्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध आहे आणि त्यामुळे प्रसूतीची मोठी प्रक्रिया आणि वेदना टाळता येतात. सीसेक्शन आणि नॉर्मल प्रसूतीची तुलना केल्यास बाळाच्या आई बाबांना बाळाच्या जन्मासाठी पर्याय उपलब्ध होतात.

नॉर्मल प्रसूती

नैसर्गिक प्रसूती किंवा नॉर्मल प्रसूती ही केव्हाही चांगली. ह्या पारंपरिक पद्धतीने प्रसूती झाल्यास त्याचा बाळाच्या आणि आईच्या आरोग्याला खूप फायदा होतो. तुमचा पर्याय निवडण्याआधी इथे काही मुद्धे आहेत जे तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत.

. नॉर्मल प्रसूतीचे फायदे

नैसर्गिक पद्द्धतीला कायम प्राधान्य दिले जाते आणि त्याचे आई आणि बाळासाठी अनेक फायदे आहेत जे तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत.

आईसाठी

  • बाळाला जन्म देण्याच्या प्रक्रियेत आईचा खूप मोठा सहभाग असतो आणि तो अनुभव आईसाठी खूप सकारात्मक आणि सशक्त करणारा अनुभव असतो
  • ह्या प्रक्रियेदरम्यान एकमेकांचा स्पर्श होत असल्याने आई आणि बाळामध्ये चांगला बंध निर्माण होतो
  • ह्या प्रक्रियेत पुनर्प्राप्ती लवकर होते, कुठल्याही वेदनेशिवाय आई त्याच दिवशी चालू शकते. तर सीसेक्शन पद्धती मध्ये आईला निदान एक दिवस आराम करावा लागतो
  • टाक्यांची काळजी घेण्याची गरज नसते. तसेच, रुग्णालयात सारखे जावे लागत नाही
  • जर तुम्ही नॉर्मल प्रसूतीचा पर्याय निवडला तर काही वेळा तुम्ही रुग्णालयात प्रसूती करण्याऐवजी घरीच प्रसूती करू शकता. हे डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानंतरच करा.

बाळासाठी

  • नॉर्मल प्रसूतीचा पर्याय निवडल्यावर बाळ सुद्धा गर्भाशयातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असते.
  • योनीमार्गातून बाहेर पडत असताना, बाळाच्या फुप्फुसातून गर्भजल बाहेर फेकले जाते आणि त्यामुळे बाळाचा श्वासोच्छवास सुरळीत सुरु राहतो आणि बाळाला श्वसनाच्या समस्या कमी येतात.
  • नॉर्मल प्रसूतीने जन्मलेल्या बाळाला आरोग्याच्या कमी समस्या येतात. ऍलर्जी कमी होतात आणि ही बाळे स्तनपान लवकर करतात.
  • पोटातून बाहेर येताना बाळ श्वासाद्वारे चांगले जिवाणू आत घेते आणि त्यामुळे प्रतिकारप्रणाली बळकट होण्यास मदत होते.

. नैसर्गिक प्रसुतीचे तोटे

नॉर्मल प्रसुतीचे फायदे वर दिले आहेत, परंतु हा पर्याय निवडताना त्याचे काही तोटे सुद्धा आहेत हे तुम्हाला माहिती असले पाहिजेत

आईसाठी

  • नैसर्गिक प्रसूतीमध्ये, बाळाच्या जन्म नक्की केव्हा होईल हे निश्चित नसते आणि तुम्ही तो ठरवू शकत नाही. प्रसूती ही संपूर्णतः आईच्या शरीरावर अवलंबून असते.
  • प्रसूतीदरम्यान खूप वेदना होतात आणि ताण येतो. प्रसूतीच्या प्रकियेसाठी सुद्धा ठराविक काळ नसतो. कधी तो खूपच कमी असतो किंवा तो काही तास राहू सुद्धा शकतो. परंतु, काही औषधे प्रसूतीसाठी आवश्यक असतात आणि ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिली जातात.
  • काहीवेळा, काही गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे बाळाच्या हृदयाचे ठोके सुद्धा कमी होतात. अशा वेळी, आईला भूल देऊन तात्काळ सीसेक्शनसाठी नेले जाते.
  • नॉर्मल प्रसूतीनंतर, प्रसुतीदरम्यान इजा झाल्यामुळे शारीरिक संबंध ठेवताना समस्या येऊ शकतात.

बाळासाठी

  • काहीवेळा जेव्हा बाळ मोठे असते तेव्हा प्रसुतीदरम्यान सक्शन कप्स किंवा फोर्सेप्सची गरज भासते
  • जन्माच्या वेळी योनीमार्गातून पुढे सरकताना बाळाला हानी झाल्याच्या काही घटना आहेत

सिझेरिअन प्रसूती

सिझेरिअन प्रसूती

सिझेरिअन किंवा सीसेक्शन प्रसूतीमध्ये बाळाच्या जन्मासाठी शस्त्रक्रियेचा वापर केला जातो. ओटीपोटाजवळील भागात एक छोटा छेद घेतला जातो आणि तो गर्भाशयापर्यंत आत घेतला जातो जेणेकरून बाळाला बाहेर काढता येईल. डॉक्टरांशी सल्लामसलत करून सीसेक्शनचे नियोजन केले जाते आणि ते आईच्या तब्येतीवर अवलंबून असते. जेव्हा आईला उच्चरक्तदाब, मधुमेह किंवा एच. आय. व्ही सारख्या समस्या असतील तेव्हा सीसेक्शन हा पर्याय बाळाच्या जन्मासाठी चांगला असतो. तसेच जर नैसर्गिक प्रसूतीसाठी काही समस्या असतील तर उदा बाळाला पुरेसा ऑक्सिजन मिळाला नसेल तर किंवा प्रसूतीला फार वेळ लागत असेल तर तात्काळ सी सेक्शन करणे जरुरीचे आहे.

. सीसेक्शन चे फायदे

सी सेक्शन हा प्रसिद्ध पर्याय आहे आणि त्याचे काही फायदे आहेत. बाळाच्या जन्मासाठी सी सेक्शनचे फायदे खालीलप्रमाणे

आईसाठी

  • ही नियोजित केलेली प्रक्रिया असते त्यामुळे जन्माचे नियोजन करण्यासाठी पालकांना फायदा होतो
  • सीसेक्शन चा पर्याय निवडल्यावर प्रसूतीचे अनेक तास टाळता येतात. त्यामुळे आईला ताण आणि वेदना टाळता येतात
  • सीसेक्शन नंतर आईला लैंगिक संबंध ठेवताना समस्या येत नाही

बाळासाठी

  • आईला झालेला कुठलाही संसर्ग बाळाला होण्याची शक्यता कमी असते
  • बाळ जन्माच्या वेळी जखमी होण्याची शक्यता कमी असते

. सीसेक्शनचे तोटे

वर सांगितलेल्या फायद्याव्यतिरिक्त सीसेक्शन प्रसूतीचे काही तोटे सुद्धा आहेत त्याकडे लक्ष दिले पाहिजे

आईसाठी

दुसऱ्या कुठल्याही शस्त्रक्रियेसारखेच, सीसेक्शन मध्ये खूप जोखीम आहे

  • भूल दिल्याने गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका असतो
  • रक्त खूप जाते
  • संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे जखमेची काळजी घेताना ती लवकर भरून यावी म्हणून रुग्णालयाला अनेक वेळा भेट द्यावी लागते.
  • नैसर्गिक प्रसूतीपेक्षा पुनर्प्राप्तीचा काळ जास्त मोठा असतो
  • स्तनपानाची प्रक्रिया सुद्धा उशिरा सुरु होते. त्यामुळे आई आणि बाळाच्या बंधावर परिणाम होतो
  • सीसेक्शन केल्यास आई आणि बाळाचा मृत्युदर जास्त असतो. भूल दिल्याने गुंतागुंत निर्माण होते

बाळासाठी

  • बाळाच्या जन्माची ही नैसर्गिक प्रक्रिया नाही आणि त्याबाबतचा निर्णय डॉक्टर आणि बाळाचे आईबाबा घेतात. आईच्या पोटातून येण्यासाठी कदाचित बाळ अजूनही तयार नसेल
  • काहीवेळा बाळाला जन्मानंतर श्वसनाचा त्रास होतो

सिझेरिअन प्रसूती टाळण्यासाठी शिफारस केलेले उपाय

  • तुमचे डॉक्टर काळजीपूर्वक निवडा. एखाद्या डॉक्टरांनी किती सीसेक्शन केले आहेत, त्यांची नॉर्मल आणि सीसेक्शन प्रसूतीबद्दलची मते तसेच मृत्युदर ह्यांचा अभ्यास केल्यास डॉक्टरांची निवड करणे सोपे जाईल
  • गर्भारपण आणि बाळंतपण ह्या क्षेत्रात व्यावसायिक असलेल्या स्त्रीला नोकरीवर ठेवल्यास गर्भधारणेदरम्यान अतिरिक्त मदत होऊ शकते आणि कमी गुंतागुंत असलेली प्रसूती प्रेरित करण्यास सुद्धा मार्गदर्शन मिळते.
  • प्रसुतीपूर्व वर्गाना जाणे ही चांगली कल्पना आहे. तिथे श्वसनाचे व्यायाम शिकवले जातात आणि औषधे न घेता नैसर्गिक पद्धतीने प्रसूतिविषयी मार्गदर्शन मिळते.
  • संतुलित आहार आणि नियमित व्यायाम केल्यास नैसर्गिक पद्धतीने प्रसूती होण्याची शक्यता वाढते.

प्रसूतीच्या ह्या दोन्ही पद्धतींचे फायदे आणि तोटे आहेत. योग्य पर्याय निवडण्याआधी पालकांनी सगळे घटक लक्षात घेतले पाहिजेत आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. जरी नैसर्गिक प्रसूती ही पारंपरिक पद्धत असली तरीसुद्धा नैसर्गिक प्रसूती ही वेदनादायी आणि ताणयुक्त प्रक्रिया आहे. तसेच, जरी तुम्ही नैसर्गिक प्रसूतीचा पर्याय निवडला तरी सुद्धा तुम्ही ठरवल्याप्रमाणे नैसर्गिक प्रसूती सुरळीत होईलच असे नाही आणि डॉक्टर तुमचे तात्काळ सीसेक्शन करू शकतात. नैसर्गिक प्रसूती आणि सीसेक्शन प्रसूती ह्या दोन्ही पद्धतीने बऱ्याच कालावधीपासून प्रसूती होते. अखेरीस, सगळ्या घटकांचा अभ्यास करून शेवटचा निर्णय पालकांचा आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow