मुलांची उंची वाढविण्यासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थ

 0
मुलांची उंची वाढविण्यासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थ

मुलांची उंची जास्तीत जास्त वाढण्यासाठी नक्की काय केले पाहिजे हा पालकांसाठी एक मोठा प्रश्न असतोपरंतु आपल्या लक्षात येत नाही की मुलांच्या उंचीचा त्यांच्या आत्मविश्वासावर सुद्धा परिणाम होतोअर्थातचमुलांची उंची त्यांच्या वयाच्या मानाने कमी असणे किंवा त्यांची वाढ इतर मुलांच्या मानाने कमी गतीने होत असणे ह्यात काही चुकीचे नाहीबऱ्याच वेळाज्या मुलांची उंची इतर मुलांपेक्षा कमी असते त्यांची शाळेत चेष्टा केली जातेत्यामुळे कमी उंची असलेले मूल घाबरट होते आणि त्यांच्या आत्मविश्वासावर सुद्धा त्याचा परिणाम होतो.

इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की उंची तुमच्या जनुकांवर अवलंबून असतेतथापि संशोधनानुसार उंचीसाठी इतरही बाह्य घटक अवलंबून असतातजी मुले त्यांच्या वाढीच्या वयात योग्य गोष्टी खातात त्यांच्या वाढीवर त्याचा चांगला परिणाम होतोउंचीसाठी मुख्यतः तीन घटक कारणीभूत असतात जनुकेआहार आणि जीवनशैलीतुम्ही तुमची जनुके बदलू शकत नाही परंतु दुसऱ्या दोन्ही घटकांची तुम्ही काळजी घेऊ शकता आणि ते म्हणजे – पोषक आहार आणि वाढ होण्यासाठी योग्य जीवनशैलीजरी उंचीसाठी योग्य जनुके असली तर अपुऱ्या पोषणाने मुलांची वाढ होत नाही.

अन्नपदार्थ आणि तुमच्या मुलाच्या वाढीचा संबंध

अन्नपदार्थ आणि तुमच्या मुलाच्या वाढीचा संबंध

 

जर तुम्ही आणि तुमचे पती उंच असाल तरतुमचे मूल उंच होण्याची शक्यता खूप जास्त असतेतसेचजर तुम्ही दोघेही बुटके असाल तर तुमच्या मुलाची उंची कमी राहण्याची शक्यता असतेपरंतु बऱ्याच पालकांना ह्याची कल्पना नसते की त्यांच्या मुलांची उंची जास्तीत जास्त वाढवणे त्यांच्या हातात असतेयोग्य आहार घेतल्यास जनुकीय उंचीपेक्षा ही उंची वाढू शकतेउंची मध्ये खूप काही जादुई फरक पडणार नसला तरी दोन इंचाचा फरक नक्कीच पडू शकतो.

बाळाची वाढ जन्मानंतर लगेच सुरु होतेपरंतु हे माहित करून घेणे महत्वाचे आहे की स्त्रियांची उंची वयाच्या १९ पर्यंत वाढते आणि पुरुषांची उंची २५ पर्यंत वाढतेआपल्या शरीरात असणाऱ्या पिट्युटरी ग्रंथींचा उंची वाढवण्यात मोठा सहभाग असतोपिट्युटरी ग्रंथी ह्युमन ग्रोथ हॉर्मोन तयार करते (HGH) आणि ते उंची वाढण्यास कारणीभूत असतेह्यूमन ग्रोथ हॉर्मोनचे कार्य प्रेरित करण्यासाठी बऱ्याच अन्नपदार्थांची मदत होऊ शकते त्यामुळे वाढीच्या वयात जास्तीत जास्त उंची वाढण्याची शक्यता असते.

अन्नपदार्थ आणि मुलांची उंची ह्यांचा संबंधांचा विचार करताना तुम्ही लक्षात घेतले पाहिजे की उंची वाढण्यासाठी कुठल्या पोषणमूल्यांची आणि कशी मदत होतेतुमच्या मुलाची उंची वाढण्यासाठी कुठल्या अन्नपदार्थांची मदत होते ह्याची यादी खालीलप्रमाणे

नैर्सर्गिकरित्या जास्तीत जास्त उंची वाढण्यासाठी लागणारी पोषणमूल्ये

प्रथिने

मुलांची उंची वाढण्यासाठी हा सर्वात महत्वाचा घटक आहेप्रथिने हे स्नायू आणि टिश्यू ह्यांच्या बांधणी साठी तसेच विकासासाठी मदत करतेप्रथिनांच्या कमतरतेमुळे मुलांची वाढ होत नाही आणि स्नायूंचे प्रमाण सुद्धा कमी असतेम्हणून तुम्ही तुमच्या मुलाचा आहार संतुलित ठेवला पाहिजे आणि त्यामध्ये पुरेश्या प्रथिनांचा समावेश असला पाहिजे.

खनिजद्रव्ये

अन्नपदार्थांमधील काही खनिजे ही उंचीच्या स्वरूपातील बाळाची वाढ होण्यास मदत करतातलोहमॅग्नेशियमफॉस्फेरसआयोडीनमँगेनीजफ्लुराईड तुमच्या मुलांच्या वाढीस मदत करतातकॅल्शिअम सुद्धा महत्वाचे आहे आणि ते फक्त वाढीस मदत करत नाही तर हाडे मजबूत होण्यासाठी सुद्धा मदत करते.

व्हिटॅमिन्स

हाडांचे आरोग्य आणि उंची साठी व्हिटॅमिन डी फार महत्वाची भूमिका पार पडतेम्हणून ते शरीरात कॅल्शिअमचे शोषण करण्यास मदत करतेव्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात आणि त्याचा उंचीवर नकारात्मक परिणाम होतोह्याव्यतिरिक्त मुलांच्या वाढीसाठी लागणारी इतर जीवनसत्वे जसे की व्हिटॅमिन एव्हिटॅमिन बी १व्हिटॅमिन बी २व्हिटॅमिन सीरिबोफ्लॅविनअस्कोर्बीक ऍसिड आणि व्हिटॅमिन एफ ह्याची गरज असतेव्हिटॅमिन समृद्ध भाज्या आणि फळे पोषक आणि संतुलित आहारास मदत करतात.

कर्बोदके

कर्बोदके ही हानिकारक समजली जातात परंतु मुलांची उंची वाढण्यासाठी त्यांची गरज असतेकर्बोदकांमुळे शरीरास ऊर्जा मिळतेविशेषकरून मुलांच्या बाबतीत हे जास्त लागू होतेसंपूर्ण धान्यांपासून मिळणारी कर्बोदके घेतली पाहिजे जसे की गहूसीरिअल्स इत्यादीपिझ्झाबर्गरव्हाईट ब्रेड हे कर्बोदकांनी समृद्ध असतात आणि ते हानिकारक असतात.

कर्बोदकेप्रथिनेव्हिटॅमिन्स आणि खनिजद्रव्ये ह्या व्यतिरिक्त तुमच्या मुलाला ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स आणि ओमेगा ६ फॅटी ऍसिड्सची गरज असतेत्यामुळे तबयेत आणि उंची चांगली होतेतुमच्या मुलाला हे पदार्थ खाण्यास सांगा.

उंची वाढण्यास मदत करणारे अन्नपदार्थ

तुमच्या मुलाला वर नमूद केलेली पोषणमूल्ये खालील अन्नपदार्थातून मिळतात

दुग्धजन्य पदार्थ

दुग्धजन्य पदार्थ

दुग्धजन्य पदार्थ जसे की दूधकॉटेज चीझदही हे कॅल्शिअमव्हिटॅमिन अ,इत्यादी घटकांनी समृद्ध असतातदूध सुद्धा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे त्यामुळे तुमच्या शरीरातील पेशींची वाढ होतेदुधाच्या मोठ्या ग्लास चा समावेश असल्याशिवाय तुमच्या मुलाचा दररोजचा आहार पूर्ण होत नाही.

अंडी

अंडी

जर तुम्हाला तुमच्या मुलाची उंची वाढवायची असेल तर प्रथिनेकॅल्शिअमव्हिटॅमिन बी १२ आणि रिबोफ्लाविन ह्यांनी समृद्ध अशा अंड्यांचा समावेश तुमच्या मुलाच्या आहारात असला पाहिजेअंड्याच्या पांढरा भाग (किंवा अल्बुमेनहा १००प्रथिनांचा बनलेला असतोम्हणून जर तुम्हाला चरबीपासून दूर राहायचे असेल तर तुम्ही बाळाला पिवळा भाग सोडून फक्त पांढरा भाग देऊ शकताअंड्यांच्या बाबतीत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अंडी वेगवेगळ्या प्रकारे तयार करता येऊ शकतात त्यामुळे मुलांना कंटाळा येत नाहीउकडलेल्या अंड्यापासून चविष्ट ऑम्लेट पर्यंत अंडी शिजवण्याची वेगवेगळे प्रकार आहेत.

चिकन

चिकन

चिकनअंड्यांप्रमाणेच प्रथिनांनी समृद्ध असतेकिंबहुना प्राणिजन्य अन्नपदार्थांमध्ये चिकन मध्ये सर्वात जास्त प्रथिने असतातचिकन मुळे स्नायू आणि टिश्यू बांधणी साठी मदत होते आणि मुलांची उंची वाढण्यास मदत होते.

सोयाबीन

सोयाबीन

तुमच्या बाळाची तब्येत चांगली राहण्यासाठी तसेच उंची वाढण्यासाठी हा एक चांगला अन्नपदार्थ आहेह्यामध्ये प्रथिनेफोलेटव्हिटॅमिन्सकर्बोदके आणि तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात आणि प्रथिनांसाठी उत्तम शाकाहारी पर्याय आहे.

केळी

केळी

पोटँशियममँगेनीज आणि कॅल्शिअम ह्यासाठी केळी हे साधे फळ आहे त्यामुळे तुमच्या मुलाची तब्येत सुधारण्यास मदत होते.

सुकामेवा आणि बिया

सुकामेवा आणि बिया

सुकामेवा आणि बिया तुमच्या वाढत्या वयाच्या मुलांना देण्यासाठी एक चांगले अन्न आहेसुकामेवा आणि बिया ह्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजद्रव्ये आणि व्हिटॅमिन्स असतात तसेच त्यामध्ये लागणारी चरबी आणि अमिनो ऍसिड्स असतात जे वाढीसाठी अत्यंत आवश्यक असताततुम्ही ते नाश्त्याच्या सीरिअल्स मध्ये किंवा नाश्त्याच्या कुठल्याही पदार्थामध्ये घालू शकता किंवा तुमच्या मुलाला नाश्ता म्हणून ते देऊ शकता.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या

तुमच्या मुलाला जरी हिरव्या पालेभाज्या आवडत नसतील तरी तुम्हाला त्याचे महत्व माहिती आहेब्रोकोलीपालकमटारभेंडीब्रुसेल स्प्राऊट हे व्हिटॅमिन्सखनिजद्रव्ये आणि तंतुमय पदार्थानी समृद्ध असतातहे सगळे घटक बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असतातजरी तुमच्या मुलाने पालेभाज्या खाण्यास कितीही आढेवेढे घेतले तरी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आहारात केला पाहिजे.

फळे

फळे

तुमच्या मुलासाठी ताजी हंगामी फळे भेटल्याने ते त्याच्यासाठी चांगले असतेत्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्सखनिजद्रव्ये आणि तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे तुमच्या मुलाचा आहार त्याच्याशिवाय अपूर्ण आहेम्हणून तुम्ही तुमच्या मुलाला सर्वप्रकारची फळे विशेषकरून व्हिटॅमिन क आणि अ ह्यांनी समृद्ध फळे जसे की पपईकलिंगडआंबेसफरचंद आणि ऍप्रिकॉट दिली पाहिजेत.

मासे

मासे

आणखी एक मांसाहारी पर्याय म्हणजे मासेहे प्रथिने आणि व्हिटॅमिन डी ह्यांनी समृद्ध असतात जे बाळाची हाडे आणि स्नायू ह्यांच्या विकासासाठी आवश्यक असतात.

१०गाजर

गाजर

गाजर हे व्हिटॅमिन अ आणि क ह्यांनी समृद्ध असतेही जीवनसत्वे हाडांमध्ये कॅल्शिअम जतन करून ठेवण्यास आवश्यक असतात तसेच हाडे निरोगी ठेवण्यास सुद्धा त्यांची मदत होते.

११संपूर्ण धान्य

संपूर्ण धान्य

संपूर्ण तृणधान्ये खूप पोषक असतात आणि मुलांसाठी खूप गरजेची असतातसंपूर्ण धान्य हे ऊर्जेचे उत्तम स्रोत असून ते तंतुमय पदार्थव्हिटॅमिन्सलोहमॅग्नेशिअम आणि सेलेनियम ह्यांनी समृद्ध असतातसंपूर्ण धान्य ब्रेड आणि पास्ता हे तुमच्या बाळाच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी चांगले पर्याय आहेत आणि त्यामुळे उंची वाढण्यास सुद्धा मदत होते.

१२. लाल मांस

लाल मांस

थोड्या प्रमाणात घेतल्यास लाल मांस सुद्धा प्रथिनांसाठी एक चांगला मांसाहारी पर्याय आहेतथापिखूप जास्त लाल मांसाचे प्रमाण तुमच्या शरीरासाठी चांगले नसते म्हणून ते मर्यादित प्रमाणात खाल्ले पाहिजे.

टाळावेत असे अन्नपदार्थ

वर नमूद केलेले सर्व अन्नपदार्थ तुमच्या बाळाची उंची वाढण्यास मदत करतातपरंतु काही अन्नपदार्थ बाळाची वाढ खुंटण्यास सुद्धा कारणीभूत असतातखूप जास्त प्रमाणात साखरमीठकॉफीचरबी आणि शीतपेये ह्यांचे सेवन करणे टाळले पाहिजे कारण हे अन्नपदार्थ कॅल्शिअमच्या शरीरातील शोषणावरनकारात्मकरीत्या परिणाम करतातधूम्रपान आणि अमली पदार्थांचे ह्यांचे बाळाच्या वाढीच्या वयात सेवन केल्यास बाळाची वाढ खुंटते आणि तब्येतीवर नकारात्मक परिणाम होतोज्या मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या नसतात त्यांच्या बाबतील पुढे जाऊन लठ्ठपणाहृदयाच्या समस्यामधुमेह प्रकार १ तसेच संधिवातहाडांचा ठिसूळपणा इत्यादी समस्या आढळतात.

तुमच्या बाळाला पोषक आहार देण्याव्यतिरिक्त इथे काही टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे तुमच्या बाळाची वाढ होण्यास मदत होईल.

  1. तुमच्या बाळाचे झोपेचे रुटीन नियमित असल्याची खात्री कराआपण जेव्हा आराम करतो तेव्हा शरीर वाढीच्या संप्रेरकांची निर्मित करते म्हणून तुमच्या बाळाने पुरेशी झोप घेतली पाहिजेबाळाच्या वयानुसार आवश्यक झोपेचे तास बदलतातनवजात बाळांसाठी रात्रीची १४१७ तास झोप आवश्यक असते तसेच ३११ महिन्यांच्या बाळासाठी दररोज रात्री १२१७ तास झोप आवश्यक असतेजसजसे बाळ मोठे होते झोपेचे तास कमी होतात आणि ते मुलाच्या ३५ वर्षे वयापर्यंत १०१३ तास इतके कमी होतातयोग्य वेळेला झोपून उठल्याने त्याचे फायदे तर होतातच परंतु शिस्त सुद्धा लागते.
  1. तुमच्या मुलाला एका जागी बसून राहण्याऐवजी दररोज व्यायाम करायला तसेच खेळायला सांगाकाही क्रियाकलाप किंवा खेळ दररोज बाहेर खेळल्याने त्यास उन्हातून व्हिटॅमिन डी सुद्धा मिळेल तसेच व्यायामुळे स्नायू शुद्ध बळकट होतीलजर शक्य असेल तर तुमच्या मुलासोबत काही मजेशीर खेळ खेळा त्यामुळे तुम्हाला सुद्धा आनंद मिळेल आणि बाळासोबत तुमचा चांगला बंध तयार होईल.
  1. तुमच्या मुलाचा शरीराचा पवित्रा योग्य आहे की नाही ह्याची खात्री करात्यामुळे त्याच्या पाठीचे आणि मानेचे स्नायू निरोगी राहतील तसेच ते उंच दिसण्यास सुद्धा मदत होईलकुबड काढून किंवा खाली मान घालून चालण्याने मूल बुटके दिसते आणि पाठीचे आणि मानेचे स्नायू सुद्धा दुखू लागतात .
  1. पोहणेतसेच ज्या खेळांमध्ये (जसे की बास्केटबॉलउड्या मारणे असते किंवा सूर्यनमस्कारस्ट्रेचेसदोरीवरच्या उद्या किंवा जॉगिंग ह्या सारख्या व्यायामप्रकारांमुळे तुमच्या मुलाची वाढत्या वयात उंची वाढतेलक्षात ठेवा ह्यासोबतच संतुलित आहेत आणि जीवनशैली अंगिकारल्यास त्याचा नक्की फायदा होतो.
  1. जर मुलाची जीवनशैली निरोगी ठेवातुमच्या कुटूंबाची जीवनशैली चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या मुलाची तब्येत आणि उंची चांगली होईलतुमच्या मुलाला जंक फूड पासून दूर ठेवा आणि ते घरी केलेले अन्न खात आहे ना ते पहाघरी अन्नपदार्थ तयार केल्यास तुमचा आहार संतुलित राहतो.
  1. तुमच्या मुलाची तब्येत चांगली राहण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना काही चांगली पूरक औषधे लिहून द्यायला सांगाव्हिटॅमिन आणि खनिजद्रव्यांची पूरक औषधे घेतल्याने तुमच्या मुलाला चांगले संतुलित पोषण मिळेलपरंतु हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नकाबाजारात मिळणारी उंची वाढवणारी‘ औषधे घेऊ नकाडॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना कुठलीही औषधे देणे टाळा.

तुमच्या मुलाची उंची जनुकांवर अवलंबून असतेतसेच एका रात्रीत उंची वाढेल अशी कुठलीही जादू नाहीचांगला आहारजीवनशैली ह्यांचा अवलंब केल्यास तुमचे मूल उंच होण्यास मदत होईलतसेचपोषक आणि संतुलित आहार घेतल्यास तब्येत चांगली राहणे किंवा विकासास गती मिळणे ह्यासारखे इतरही फायदे होतील.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow