महिला नसबंदी (ट्युबेक्टॉमी किंवा ट्युबल लिगेशन) विषयक मार्गदर्शिका

 0
महिला नसबंदी (ट्युबेक्टॉमी किंवा ट्युबल लिगेशन) विषयक मार्गदर्शिका

संतती नियमनाच्या अनेक पद्धती स्त्रिया आणि पुरुषांकरिता उपलब्ध आहेत. त्यापैकी काहींमध्ये छोटी शस्त्रक्रिया करावी लागते आणि त्या साधारणपणे संततिनियमनाच्या कायमसाठीच्या पद्धती असतात. महिला नसबंदी ज्याला इंग्रजीमध्ये ट्युबल लिगेशन किंवा ट्युबल स्टरलायझेशन असे म्हणतात ही सामान्य प्रक्रिया आहे आणि ती करण्याच्या अनेक पद्धती आहेत.

महिला नसबंदी म्हणजे काय?

सामान्य माणसाच्या भाषेत, ट्यूबल लिगेशनला आपल्या कडे बीजवाहिन्या बांधणे असेही म्हणतात. स्त्री नसबंदीच्या या पद्धतीत, बीजवाहिन्या, ज्यामधून आपल्या अंडाशयातून अंडी पुढे जातात त्यांना घट्ट बांधून बंद केले जाते किंवा वेगळ्या करून त्या अवरोधित केल्या जातात. असे केल्याने शुक्राणूंना स्त्रीबीजाकडे जाण्यापासून आणि त्यांचे फलन करण्यापासून प्रतिबंधित केले जाते, यामुळे गर्भधारणा प्रभावीपणे रोखली जाते. या प्रकारची नसबंदी लैप्रोस्कोपिक प्रक्रियेद्वारे, मिनीलेप्रोटॉमी किंवा ट्यूबल इम्प्लांट्सद्वारे केली जाऊ शकते.

महिला नसबंदी किती प्रभावी आहे?

ट्यूबल लिगेशन जवळजवळ १००% प्रभावी मानली जाते. परंतु ०.% ची शक्यता आहे (१००० मध्ये ५) ज्यामध्ये एक वर्षानंतर ट्यूबल लिगेशन झालेली महिला गर्भवती होऊ शकते. प्रक्रियेनंतर पाच वर्षांत, गर्भधारणेची १.% शक्यता असते. प्रक्रियेच्या वेळी अयोग्य शस्त्रक्रिया किंवा गर्भवती असणे ही ट्यूबल लिगेशननंतर गर्भधारणा का होऊ शकते याची कारणे आहेत.

नसबंदी तुमच्यासाठी योग्य आहे का?

ज्या स्त्रियांना आता मुले नको आहेत त्यांच्यासाठी महिला नसबंदीची शिफारस केली जाते. तसेच काही स्त्रियांना आरोग्याच्या काही तक्रारी असतील आणि गर्भारपणामुळे त्या वाढणार असतील तसेच काही कौटुंबिक आजार असतील जे तुम्हाला पुढच्या पिढीमध्ये नको असतील तर ही शस्त्रक्रिया केली जाते. तुम्ही निर्णय घेण्याआधी हा पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे किंवा कसे ह्याविषयी तुमच्या पतीशी, कुटुंबातील सदस्यांशी आणि डॉक्टरांशी चर्चा करा.

नसबंदी वेदनादायी आहे का?

काही प्रकारच्या स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेत शरीरावर छेद घेतला जातो, तुम्ही कुठल्या प्रकारची नसबंदी शस्त्रक्रिया निवडली आहे त्यावर सामान्य किंवा लोकल भूल दिली जाते. जेव्हा सामान्य भूल दिली जाते तेव्हा तुम्ही झोपी जाता आणि शस्त्रक्रिया झाल्यावरच तुम्हाला जाग येते. तर एका विशिष्ट जागी भूल दिल्यास तुम्ही पूर्ण वेळा जागे असता, तो विशिष्ट भाग बधिर होतो आणि त्यावेळी तुम्हाला काही जाणवत नाही.

महिला नसबंदी प्रक्रियांचे प्रकार

महिला नसबंदी प्रक्रियेचे सामान्यपणे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते आणि ते म्हणजे ज्या मध्ये छेद घेतला जातो आणि छेद घेतला जात नाही. लॅप्रोस्कोपी आणि मिनीलॅप्रोक्टॉमी ह्या प्रक्रिया पहिल्या प्रकारात मोडतात तर ट्युबल इम्प्लांट ज्यास इश्युरम्हणतात ते दुसऱ्या प्रकारात मोडतात.

. छेद घेतला जातो अशी नसबंदी शस्त्रक्रिया

छेद घेतला जातो अशा नसबंदीच्या शस्त्रक्रिया म्हणजे लॅप्रोस्कोपी आणि मिनीलप्रोस्कोपी. दोन्हीसाठी त्या भागापुरती किंवा जनरल भूल देतात.

लॅप्रोस्कोपी मध्ये रिकव्हरी लगेच होते, वेदना कमी होतात आणि कमी आक्रमक असते. ह्या सगळ्या प्रक्रियेला फक्त ३० मिनिटे लागतात आणि कमीत कमी जखम होते. बऱ्याच स्त्रिया त्याच दिवशी घरी येतात.

मिनीलॅप्रोटोमी ही मोठी शस्त्रक्रिया समजली जाते आणि ह्यामध्ये संपूर्ण भूल दिली जाते. ही शस्त्रक्रिया सिझेरिअन करताना सुद्धा केली जाते.

. ट्युबल प्रत्यारोपण

ह्या प्रक्रियेत कुठल्याही प्रकारचा छेद घेतला जात नाही कारण ही प्रक्रिया गर्भाशयाचे मुख आणि योनीच्या माध्यमातून केली जाते. धातूंच्या स्प्रिंग बीजवाहिनीतून घातल्या जातात आणि हळू हळू त्याभोवती त्याचे व्रण तयार होतात आणि त्यामुळे बीजवाहिन्यांमध्ये कायमचा अडथळा येतो.

महिला नसबंदीची प्रक्रिया कशी केली जाते?

ट्युबल लिगेशन रुग्णालयात केले जाते तसेच काही आऊट पेशंट क्लिनिक्स मध्ये सुद्धा ते केले जाते. तुमचे डॉक्टर तुम्ही हा पर्याय का निवडला ह्या बाबत चर्चा करतील, आणि हा निर्णय तुम्ही नीट विचार करून घेतला आहे ना हे सुद्धा जाणून घेतील. तुमच्या परिस्थितीला अनुसरून कुठल्या प्रकारची नसबंदीची प्रक्रिया तुमच्यासाठी योग्य आहे त्याची माहिती तुम्हाला दिली जाते. बऱ्याच स्त्रिया बाळाच्या जन्मानंतर किंवा इतर शस्त्रक्रियेसोबत ही शस्त्रक्रिया करून घेण्याचा पर्याय निवडतात. जर बाळाच्या जन्मानंतर तुम्ही ही शस्त्रक्रिया करून घेतली नाही तर तुम्हाला ह्या शस्त्रकियेच्या आधी आणि नंतर एक महिना गर्भनिरोधक वापरण्याचा सल्ला दिला जातो.

छेद घेतला जातो अशी नसबंदीची प्रक्रिया

लॅप्रोस्कोपी आणि मिनी लॅपरोटोमी ह्या छेद घेऊन केल्या जाणाऱ्या नसबंदीच्या प्रक्रिया आहेत.

लॅप्रोस्कोपिक नसबंदीमध्ये, तुम्हाला लोकल किंवा संपूर्ण भूल दिली जाते. त्यानंतर डॉक्टर पोटाच्या पोकळीत सगळे अवयव नीट दिसण्यासाठी गॅस पंप करतात. बेंबीच्या जवळ दोन छोटे छेद घेऊन डॉक्टर लॅप्रोस्कोप आत ढकलतात आणि बीजवाहिन्यांवर लक्ष ठेवतात. एकदा लक्षात आल्यावर बीजवाहिन्या बंद केल्या जातात आणि प्रक्रिया पूर्ण होते. ह्या संपूर्ण प्रक्रियेस ३० मिनिटे लागतात.

मिनीलॅप्रोक्तोमी बाळाच्या जन्मानंतर केली जाते आणि त्यावेळेला सामान्य भूल दिली जाते व डॉक्टर बेंबीच्या जवळ छेद घेतात. ह्या छेदातून बीजवाहिन्या वर उचलल्या जातात आणि क्लिप्सच्या साह्याने त्या बंद केल्या जातात तर काही वेळा बीजवाहिन्यांचा भाग कापून टाकला जातो.

ट्युबल प्रत्यारोपणाची प्रक्रिया

ह्या नसबंदीचा प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची भूल देण्याची गरज नसते. तुमचे डॉक्टर प्रक्रियेआधी गर्भाशयाचे मुख उघडतील आणि योनीमार्गातुन गर्भाशयाच्या मुखात कॅथेटर घालतील आणि तो बीजवाहिन्यांपर्यंत नेतील. कॅथेटरद्वारे इम्प्लांट बीजवाहिनीमध्ये बसवला जाईल. अशीच प्रक्रिया दुसऱ्या ट्यूबवर केली जाईल. नंतर एक्सरे काढून इम्प्लांट्स नीट बसवले गेले आहेत ना तसेच बीजवाहिन्या नीट बंद झाल्या आहेत ना ते पहिले जाईल.

नसबंदी नंतर तुम्हाला कसे वाटेल?

मासिक पाळीदरम्यान येतात तसे पेटक्यांचा अनुभव तुम्हाला येईल तसेच योनीमार्गातून थोडा रक्तस्त्राव सुद्धा जाणवेल कारण प्रक्रियेदरम्यान गर्भाशयाची हालचाल झालेली असते. जर तुमची लेप्रोस्कोपिक प्रक्रिया झालेली असेल तर, वापरला जाणाऱ्या गॅस मुळे पोटाला एक किंवा दोन दिवस सूज येईल. ह्या गॅस मुळे पाठ किंवा खांद्यात सुद्धा काही काळासाठी वेदना होतील. जिथे छेद घेतला होता तिथून रक्त येऊ लागले किंवा तुम्हाला ताप आणि रॅश आली, श्वास घेण्यास त्रास झाला, पोटात सतत वेदना झाल्या किंवा योनीमार्गातून वेगळा स्त्राव होत असेल तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.

नसबंदी नंतर सुद्धा रजोनिवृत्ती येईपर्यंत तुमची मासिक पाळी अधिसारखीच राहील. नसबंदीमुळे संप्रेरकांचे असंतुलन होत नाही. परंतु गर्भनिरोधकांची इतर साधने संप्रेरकांच्या पातळीत बदल घडवू शकतात.

नसबंदी नंतर पूर्ववत होण्यासाठी साधारपणे किती वेळ लागतो?

रिकव्हरी साठी लागणारा वेळ तुमच्या जीवनशैलीवर आणि शस्त्रक्रियेसाठी तुम्ही कुठली पद्धती निवडली आहे ह्यावर अवलंबून असतो. लॅप्रोस्कोपिक ट्युबल लिगेशन नंतर तुम्ही त्याच दिवशी घरी जाऊ शकता. मिनी लॅप्रोटोमी झाली असेल तर रिकव्हरी साठी काही दिवस लागू शकतात. जर ट्यूबल इम्प्लांट असेल तर तुम्ही त्याच दिवशी तुमचे नॉर्मल रुटीन सुरु करू शकता. प्रक्रियेनंतर दोन आठवड्यांनंतर तपासणीसाठी बोलावले जाते.

नसबंदी उलट करता येऊ शकते का?

बीजवाहिन्या पुन्हा अधिसारख्या होण्यासाठी मोठी शस्त्रक्रिया करावी लागते आणि तुम्हला काही दिवसांसाठी रुग्णालयात रहावे लागू शकते. हि शस्त्रक्रिया यशस्वी होणे हे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. ते घटक म्हणजे नसबंदी शस्त्रक्रियेचा प्रकार, तुमचे वय, प्रक्रिया केल्यानंतर उलटलेला काळ आणि बीजवाहिन्यांचे झालेले नुकसान. बीजवाहिन्या पूर्ववत केल्यानंतर गर्भधारणेचा दर खूप बदलतो आणि ३०% ते ८५% ह्या प्रमाणात असते. बीजवाहिन्या पूर्ववत केल्याने एकटोपीक गर्भधारणेचा धोका वाढतो ज्यामुळे आयुष्याला धोका पोहचू शकतो.

धोके आणि गुंतागुंत

ट्युबल लिगेशन ही पोटाची शस्त्रक्रिया आहे आणि ह्यामध्ये भूल देणे आवश्यक असते त्यामुळे काही धोके आणि गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते

  • आतडे, मूत्राशय किंवा महत्वाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहचू शकते
  • भुलीची प्रतिक्रिया
  • जखम नीट न भरून येणे आणि त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता
  • ओटीपोट किंवा पोटात दुखणे आणि ते दीर्घकाळ राहणे
  • जिथे छेद घेतला आहे तिथे कायमचे व्रण राहतात
  • ह्या आधी जर ओटीपोटाची किंवा पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल तर धोका जास्त वाढतो. लठ्ठपणा किंवा मधुमेह ह्या आजारांचा कौटुंबिक इतिहास असेल तर ट्युबल लिगेशन नंतर गुंतागुत वाढते.

नसबंदी नंतर तुम्ही लवकरात लवकर केव्हा शारीरिक संबंध ठेऊ शकता?

बरेच लोक ह्यासाठी एक किंवा दोन आठवडे वाट पाहतात तरीसुद्धा नसबंदी नंतर लैंगिक संबंध ठेवण्यास केव्हा सुरुवात करणे सुरक्षित आहे ह्या विषयी तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील. जर बाळाच्या जन्मानंतर नसबंदी झालेली असेल तर कमीत कमी ४ आठवडे वाट बघायला लागू शकते. इश्युर इम्प्लांट्स मुळे काही स्त्रियांना लैंगिक संबंधादरम्यान वेदना किंवा अस्वस्थता येऊ शकते.

लैंगिक संबंधांपासून पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते का?

नाही, ट्युबल लिगेशन ही फक्त कायमसाठीच्या नसबंदीची प्रक्रिया आहे आणि त्यामुळे स्त्री किंवा पुरुषांना लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या आजारांपासून कुठलेही संरक्षण मिळत नाही. नसबंदी ही संतती नियमनाची परिणामकारक पद्धती आहे. लैंगिक संबंधांतुन पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी कॉन्डोम वापरणे हा उत्तम मार्ग आहे. नसबंदीच्या पद्धतींची इथे काहीही मदत होत नाही.

नसबंदी शस्त्रक्रियेनंतर दुसरे कुठलेही गर्भ निरोधक वापरण्याची गरज नसते. परंतु ट्युबल इम्प्लांट्सच्या बाबतीत, तीन महिन्यांपर्यंत गर्भनिरोधक साधन वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर एक्स रे काढून प्रक्रिया यशस्वी झाली आहे की नाही हे निश्चित केले जाते आणि त्यानंतर तुम्ही इतर गर्भनिरोधक साधने वापरण्याचे बंद करू शकता. नसबंदीच्या शस्त्रक्रियेनंतर तुमच्यात बदल होईल असा विचार येणे नॉर्मल आहे. परंतु, तुमचे वजन वाढणार नाही, तुमच्या चेहऱ्यावर केस येणार नाही किंवा रजोनिवृत्ती येणार नाही. नसबंदी करणे ही आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे फक्त सुनिश्चित करा.

अस्वीकरण: ही माहिती केवळ मार्गदर्शक आहे आणि पात्र व्यावसायिकांच्या वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow