हिमाचल प्रदेशात दरड कोसळून नऊ पर्यटकांचा मृत्यू; व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
दरड पुलावर कोसळल्यानंतर पुलाचा काही भाग नदीत कोसळल्याचंही व्हिडीओत दिसत आहे

हिमाचल प्रदेशात दरड कोसळून नऊ पर्यटकांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. सांगला खोऱ्यात ही दरड कोसळली आहे. दरड कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून डोंगवरावरुन दगडं वेगाने खाली खोऱ्यात कोसळत असल्याचं दिसत आहे. दरड नदीवर असणाऱ्या पुलावर कोसळल्यानंतर पुल नदीत कोसळतानाही व्हिडीओत दिसत आहे.
किन्नोरच्या बटसेरीत ही दुर्घटना घडली आहे. मृत झालेले सर्व ११ जण पर्यटक असून त्यांच्या वाहनांवर दगडं कोसळली अशी माहिती किन्नोरचे पोलीस अधिक्षक सॅजू राम राणा यांनी दिली आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
#WATCH | Himachal Pradesh: Boulders roll downhill due to landslide in Kinnaur district resulting in bridge collapse; vehicles damaged pic.twitter.com/AfBvRgSxn0 — ANI (@ANI) July 25, 2021
डॉक्टरांची एक टीम सध्या घटनास्थळी दाखल आहे.
तिथे उपस्थित काही नागरिकांनी दरड कोसळतानाचा व्हिडीओ मोबाइलवर रेकॉर्ड केला आहे. यामध्ये दगडं तिथे पार्क असणाऱ्या गाड्यांवर वेगाने कोसळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशी
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करत घटनेसंबंधी चौकशी केली आहे. प्रशासनाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं असून मदत पुरवली जात आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी आपण प्रार्थना करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान हवामान खात्याने पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करत दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त करत इशारा दिला होता.
What's Your Reaction?






