गरोदर स्त्रियांसाठी २० आरोग्यविषयक टिप्स

गरोदर स्त्रियांसाठी २० आरोग्यविषयक टिप्स

अभिनंदन, तुम्ही गर्भवती आहात! तुम्ही ह्या बातमीमुळे जरी रोमांचित झाला असाल तरी त्याबरोबरच अनेक विचार तुमच्या मनात येत असतील! तुम्हाला गरोदरपणाविषयी सगळं काही माहित करून घेण्याची उत्सुकता आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ह्या प्रवासास सुरुवात करता तेव्हा दररोज अनेक गोष्टीचा तुम्हाला उलगडा होणार आहे.

इथे गरोदरपणात पडणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे आहेत, तसेच गरोदरपणात काय काळजी घ्यावी ह्याविषयी टिपूस आहेत. त्यामुळे तुमच्या बाळाच्या जन्माची तयारी तुम्ही करू शकता.

निरोगी गर्भारपण म्हणजे काय?

आजच्या काळात प्रत्येकजण संतुलित आणि निरोगी जीवनशैलीकडे वळत आहे. तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी जीवनशैलीची निवड करताना चांगल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित होणे जरुरी आहे. बाळाची सुयोग्य वाढ आणि विकास ह्याबरोबरच निरोगी गरोदरपणात इतरही घटक असतात जसे वजनातील निरोगी वाढ, संतुलित आहार, पोषक अन्नपदार्थ, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि भावनिकरीत्या सुद्धा सक्षम असणे इत्यादी होय. ह्या मध्ये उच्चरक्तदाब, मधुमेहाची पातळी नॉर्मल ठेवणे महत्वाचे असते तसेच अल्कोहोल, अमली पदार्थ आणि धूम्रपान सुद्धा बंद केले पाहिजे.

गरोदरपणात तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी कशी घेतली पाहिजे?

तुम्ही तुमच्या तब्येतीची चांगली काळजी घेतलीत तर तुमच्या निरोगी गर्भधारणेची शक्यता वाढते. निरोगी जीवनशैलीमुळे गर्भधारणा सुकर होते तसेच तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी ते चांगले असते. पहिली तिमाही तुमच्यासाठी महत्वाची असते कारण तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या प्रवासाच्या वाटेवर पावले टाकण्यास सुरुवात केलेली असते.

. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळातील काळजी

गर्भधारणा झाली आहे हे समजल्यापासूनच निरोगी गरोदरपणासाठी योग्य काळजी घेण्यास सुरुवात केली पाहिजे. इथे काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळापासून मनात ठेवल्या पाहिजेत.

 • तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि प्रसुतीपूर्व काळजी घेण्यास सुरुवात करा त्यासाठी काही चाचण्या करण्याची गरज असते.
 • तुमच्या आहाराची काळजी घ्या आणि कमी शिजवलेले अन्न घेणे टाळा, थंड मांस आणि पाश्चराईझ न केलेले दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळा. त्यामुळे बाळास संसर्ग होऊ शकतो आणि ते बाळासाठी धोक्याचे आहे. पोषक आणि ताजे अन्नपदार्थ खा.
 • प्रसुतीपूर्व पूरक गोळ्या तसेच लोह व फॉलिक ऍसिड सारखी पूरक औषधे घ्या. फॉलिक ऍसिड मुळे जन्मतः बाळामध्ये दोष आढळत नाहीत.
 • भरपूर आराम करा तसेच तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करा.
 • तुमच्या भावनिक आरोग्याकडे लक्ष द्या आणि तुम्ही ताणविरहित आहात ह्याची खात्री करा. स्वतःला सकारात्मक आणि आनंदी ठेवा कारण गरोदरपणात बरीच भावनिक आंदोलने येण्याची शक्यता असते

. गरोदरपणात कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे

जसजशी गरोदरपणात प्रगती होते तसे तुम्हाला सुद्धा बदलले पाहिजे. इथे काही महत्वाच्या गोष्टी दिल्या आहेत ज्याच्या बाबतीत तुम्ही तुमच्या गरोदरपणात संपूर्ण कालावधीत सावधानता बाळगली पाहिजे.

 • आरामदायक चपला वापरा आणि पडू नये म्हणून काळजी घ्या
 • वाहन चालवताना सीट बेल्ट लावा आणि एअर बॅग पासून दूर बसा
 • तुमच्या स्त्रीरोगतज्ञांना विचारल्याशिवाय कुठलेही औषध घेऊ नका
 • मद्यपान आणि धूम्रपान टाळा. जिथे धूम्रपान केले जाते तिथे जाणे टाळा
 • कॅफेन आणि कृत्रिम रंग टाकलेली उत्पादने टाळा .
 • भरपूर पाणी प्या आणि निर्जलीकरण टाळा
 • थकवा घालवण्यासाठी पायांना आराम द्या. तुमचे पाय आणि पायाचे घोट्याना सूज येण्याची शक्यता असते. दिवसभरात तुम्ही पाय वारंवार वर ठेवत आहात ना ह्याची काळजी घ्या.
 • पुरेशी झोप घ्या आणि मध्ये मध्ये लागेल तशी विश्रांती घ्या. तुम्ही निरोगी राहण्यासाठी कमीत कमी ८ तासांची झोप आवश्यक आहे.

गरोदरपणात बाळ निरोगी होण्यासाठी मी काय करू शकते?

गर्भधारणा होणे हे खूप रोमांचक असते आणि त्यामुळे तुमच्या मध्ये आणि तुमच्या जीवनशैलीमध्ये खूप बदल होतात. जरी गर्भवती असताना तुम्ही निरोगी राहणे महत्वाचे असले तरीसुद्धा तुमचे बाळ निरोगी आहे ना ह्याबद्दल सतत तुमचे विचार सुरु असतात. तुम्हाला निरोगी बाळ होण्यासाठी खाली काही मुद्दे दिले आहेत.

 • नियमित पोषक आणि आरोग्यपूर्ण आहार घ्या कारण अन्नपदार्थांमधून तुम्हाला ऊर्जा मिळते तसेच तुम्ही जे खाता ते तुमच्या शरीरासाठी बिल्डिंग ब्लॉक्स असतात. खूप ताज्या भाज्या, फळे, अन्नधान्य, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ खा.
 • सगळी प्रसुतीपूर्व औषधे घ्या जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या बाळाला लागणारी सगळी पोषणमूल्ये मिळत आहेत ना ह्याची खात्री होईल. बाळाची मज्जातंतू नलिका मेंदू आणि पाठीच्या कण्यामध्ये विकसित होते आणि त्यासाठी गर्भधारणेच्या पहिल्या दिवसांपासून फॉलिक ऍसिड, कॅल्शिअम आणि लोहाची गरज असते.
 • ताणविरहित रहा. ताणाचे योग्य नियोजन केल्यास तुम्ही भावनिकरीत्या सक्षम होता.

निरोगी आणि सुरक्षित गरोदरपणासाठी २० टिप्स

निरोगी गरोदरपणासाठी काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळालेली आहेत. आता निरोगी आणि सुरक्षित २० टिप्स गरोदरपणासाठी ज्या तुम्ही कायम जवळ ठेऊ शकता.

. प्रसुतीपूर्व काळजीचे नियोजन

प्रसुतीपूर्व काळजीचे नियोजन

सर्वात प्रथम म्हणजे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात तुम्ही चांगल्या स्त्रीरोगतज्ञांची आणि इस्पितळाची माहिती मिळवली पाहिजे जेणे करून तुम्ही प्रसुतीपूर्व काळजी घेऊ शकाल. तुम्ही त्या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर ज्यांच्याशी तुम्हाला लगेच संपर्क साधता येईल आणि तुम्हाला पुरेसे मार्गदर्शन मिळेल अशा डॉक्टरांना प्राध्यान द्या. गरजेच्या अल्ट्रासाऊंड चाचण्या आणि स्कॅन ह्यांचे नियोजन आधीच केले आहे ना ते पहा जेणेकरून तुम्ही त्या चाचण्या करण्याची तयारी असेल.

. आरोग्यकारक आणि पोषक अन्नपदार्थ खा आरोग्यकारक आणि पोषक अन्नपदार्थ खा

शरीरास ऊर्जेची गरज असते. आरोग्यपूर्ण आणि पोषक अन्न खाणे हे बाळासाठी आवश्यक असते आणि त्यामुळे आईची सुद्धा काळजी घेतली जाते. संपूर्ण धान्य, ताज्या भाज्या आणि फळे, अंडी, ऑरगॅनिक मांस आणि दुग्धजन्य उत्पादने घेतल्याने तुम्हाला पुरेशी पोषणमूल्ये मिळत आहेत ह्याची खात्री होते. ह्या अन्नपदार्थांमध्ये खनिजद्रव्ये, जीवनसत्वे, चरबी, अमिनो ऍसिड्स आणि इतर पोषक मूल्ये असतात. जरी तुम्हाला सक्रिय राहण्यासाठी अन्नपदार्थांची गरज असली तरी तुम्ही काय खात आहात ह्याकडे तुमचे लक्ष असले पाहिजे. जंक फूड टाळा.

. भरपूर पाणी प्या

भरपूर पाणी प्या

तुम्ही स्वतःला सजलीत ठेवल्याने गर्भजल पातळी नियमित राहण्यास मदत होते. तुम्ही दिवसभरात कमीत कमी १० ग्लास पाणी पीत आहात ना ह्याची खात्री करा. कमी पाणी प्यायल्याने दुसऱ्या तिमाहीत मॉर्निंग सिकनेस, थकवा, पेटके येतात. पाण्याची बाटली सोबत बाळगा आणि ते ग्लास, स्टीलचा पेला किंवा BFA विरहीत भांड्यातून प्या जेणेकरून इस्ट्रोजेन सारखी टॉक्सिन्स तुमच्या बाळापर्यंत पोहचत नाहीत.

. प्रसुतीपूर्व पूरक औषधे घ्या

प्रसुतीपूर्व पूरक औषधे घ्या

तुम्हाला आणि तुमच्या बाळाला लागणारी सगळी पोषणमूल्ये मिळत आहेत ना ह्याची खात्री होण्यासाठी तुम्ही प्रसुतीपूर्व औषधे घेतली पाहिजेत परंतु ही औषधे नैसर्गिक अन्नपदार्थांना पर्याय म्हणून वापरू नका. ही पूरक औषधे घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. ह्या पूरक औषधांमध्ये फॉलिक ऍसिड आणि लोह असते, बाळाला जन्मतः व्यंग निर्माण होऊ नये म्हणून फॉलिक ऍसिड मदत करते. म्हणून ही पूरक औषधे वेळेवर घेणे महत्वाचे असते.

. नियमित व्यायाम करा

नियमित व्यायाम करा

तुमच्या शरीरात खूप बदल होत आहेत. त्यापैकी सर्वात लक्षणीय बदल म्हणजे तुमच्या शरीराचा आकार आणि वजन. नियमित व्यायामासह सक्रिय जीवनशैलीचा अवलंब केल्यास तुम्हाला निरोगी आणि लवचिक राहण्यास मदत होते. व्यायामाने ताण हलका होण्यास मदत होते आणि पुढे जाऊन तुम्ही प्रसूती आणि बाळाची काळजी घेण्यासाठी सक्षम होऊ शकता. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यायाम करू शकता. त्यामध्ये चालणे, पोहणे आणि योग इत्यादींचा समावेश होतो. गरोदरपणात, रक्ताचे प्रमाण वाढते त्यामुळे हृदयावर ताण येतो. ४५ मिनिटे व्यायाम केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय बळकट होते आणि तुमच्या बाळाच्या निरोगी वकासासाठी बाळाला भरपूर ऑक्सिजन असलेल्या रक्ताचा पुरवठा होतो.

. थोडी विश्रांती घ्या

विश्रांती घ्या

गरोदरपणात पुरेशी झोप आणि आरामाची गरज असते. तुम्ही पुरेशी झोप घेत आहात ना ह्याची खात्री करा नि तुमच्या पायांना जितके शक्य होईल तितका आराम द्या. योग आणि दीर्घश्वसनामुळे आरामदायक आणि शांत वाटेल.

. मद्यपान, अमली पदार्थ आणि धूम्रपान टाळा

मद्यपान, अमली पदार्थ आणि धूम्रपान टाळा

मद्यपान टाळा कारण रक्तातून ते बाळापर्यंत पोहोचते. त्यामुळे बाळाला जन्मतःच फेटल अल्कोहोल सिंड्रोम (एफए एस) होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाचा मानसिक विकास होत नाही. अमली पदार्थ आणि धूम्रपान हे सुद्धा धोकादायक असतात कारण त्यामुळे बाळाच्या वाढीवर आणि तब्येतीवर परिणाम होतो.

. कॅफेन घेणे टाळा आणि फळे खा

कॅफेन घेणे टाळा आणि फळे खा

फळे खाऊन ताजेतवाने होणे हे कॅफेन घेण्यापेक्षा अधिक फायद्याचे आहे. संशोधनाद्वारे असे दिसून आले आहे कि कॅफेनमुळे गर्भपाताची शक्यता वाढते. गर्भवती स्त्रीमध्ये लोह कमी प्रमाणात असेल तर कॅफेनमुळे लोह शरीरात शोषले जात नाही. म्हणून कॅफेन घेणे टाळा.

. वातावरणातील धोकादायक गोष्टींपासून दूर रहा

वातावरणातील धोकादायक गोष्टींपासून दूर रहा

जर रसायने, कीटकनाशके, धोकादायक घटक, किरणोत्सर्गी पदार्थ, पारा इत्यादी गोष्टींशी घरी किंवा बाहेर संपर्क येत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून सल्ला घेतला पाहिजे कारण हे सर्व घटक तुमच्यासाठी आणि बाळासाठी धोकादायक आहेत.

१०. दंतवैद्यांची भेट

दंतवैद्यांची भेट

संप्रेरकांमधील बदलांमुळे तुमच्या हिरड्या कमकुवत होतात. त्यामुळे दंतवैद्यांची भेट घेणे जरुरी आहे, तसेच हिरड्यांचे विकार होऊ नयेत म्हणून काळजी सुद्धा घेतली पाहिजे. इस्ट्रोजेन आणि प्रेजेस्टेरॉन च्या पातळीत वाढ झाल्यास हिरड्यांमधून रक्त येऊ शकते. म्हणून गरोदरपणात दात आणि हिरड्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे असते.

११. तुमच्या भावनिक आरोग्यावर लक्ष ठेवा

तुमच्या भावनिक आरोग्यावर लक्ष ठेवा

गरोदरपणात संप्रेरकांमध्ये बदल होतात, म्हणून तुम्हाला मड सविंग्स आणि भावनिक आंदोलनांचा अनुभव येईल. जर तुम्हाला उदास वाटत असेल आणि त्याचा तुमच्यावर दुष्परिणाम होत असेल तर वेळीच मदत घ्या.

१२. ओटीपोटाजवळील स्नायू मजबूत करा

ओटीपोटाजवळील स्नायू मजबूत करा

ओटीपोटाच्या भागातील स्नायू मजबूत असतील तर प्रसूतीच्या वेळेला त्याची मदत होते. तुमचे गर्भाशय, पचनसंस्था, मूत्राशय ह्यांना हे स्नायू आधार देतात. योग्य मार्गदर्शनाखाली केलेल्या प्रसुतीपूर्व व्यायामाने तुमचे ओटीपोटाजवळी स्नायू बळकट होण्यास मदत होते.

१३. तुमच्या वजनातील वाढीवर लक्ष ठेवा

तुमच्या वजनातील वाढीवर लक्ष ठेवा

तुमच्या वजनात स्थिर वाढ होत असेल तर त्याचा अर्थ बाळाची योग्य वाढ होते आहे असा होतो. त्यामुळे, वजनावर नियमित लक्ष ठेवणे महत्वाचे आहे आणि त्यामुळे तुमची वाटचाल योग्य दिशेने होते आहे ह्याची खात्री होते.

१४. योग्य कपडे घाला

योग्य कपडे घाला

तुम्ही आरामदायक कपडे घाला. तुमचे वजन आणि आकार ह्यामध्ये खूप वेगाने बदल होतो आहे त्यामुळे घट्ट कपडे घातल्याने तुम्हाला आणि परिणामी बाळाला त्रास होऊ शकतो.

१५. योग्य पादत्राणे घाला

योग्य पादत्राणे घाला

जसजसे तुमच्या गरोदरपणात प्रगती होते तसे गुरुत्वाकर्षणाच्या केंद्रबिंदूवर परिणाम होतो आणि तुमच्या पावलांवर वेदनादायी दाब येतो. म्हणून तुमच्या पायाला आरामदायक वाटतील अश्या पादत्राणांची खरेदी करा.

१६. तुमच्या त्वचेची काळजी घ्या

त्वचेची काळजी घ्या

गरोदरपणात, तुमची त्वचा सूर्यप्रकाशाला खूप संवेदनशील झालेली असते. तुम्हाला सनबर्न आणि गडद डाग पडण्याची शक्यता असते. SPF ३० किंवा जास्त असलेली सनबर्न क्रीम वापरा.

१७. स्वतःचे लाड करा

स्वतःचे लाड करा

जरी तुम्ही काय खाता आहात ह्यावर लक्ष ठेवणे जरुरी असले तर तुमच्या शरीराचे ऐका, काही विशिष्ट पदार्थ कधीतरी खावेसे वाटले तर खा. तसेच, कधीतरी दुपारी बाहेर जेवण करून स्वतःचे लाड करून घ्या. मॅनिक्युअर, मैत्रिणींसोबत हवा तसा दिवस घालवणे किंवा शांतपणे चालून येणे अशा गोष्टी तुमचा ताण हलका करण्यास मदत करतील. ह्या क्रिया तुम्हाला आणि तुमच्या बाळाला मदत करतील.

१८. स्वतःला शिक्षित करा

स्वतःला शिक्षित करा

गर्भावस्थेच्या वेगवेगळ्या टप्प्यांविषयी स्वतःला शिक्षित करा आणि गरज लागेल तेव्हा वैद्यकीय मदत घेण्यास जागरूक रहा. तुमच्या डॉक्टरांना फोन करा जर तुम्हाला:

 • खूप दुखत असेल
 • पेटके
 • योनीमार्गातून रक्तस्त्राव
 • पाणी जाणे
 • चक्कर येत असेल
 • धडधड होत असेल
 • सांध्यांना सूज
 • बाळाची हालचाल मंदावली असेल तर

१९. ताणाचे नियोजन

ताणाचे नियोजन

गरोदरपणाशी निगडित जीवनशैलीतील बदल आणि संप्रेकांमधील बदल होत असतात. गरोदरपणात होणाऱ्या ह्या चढउतारांमुळे तुम्ही भारावून जाऊ शकता. त्यामुळे, ताणाचे नियोजन कसे करायचे हे माहिती असणे महत्वाचे असते, तुम्ही घरी आणि ऑफिस मध्ये परिस्थितीला कशी प्रतिक्रिया देता त्याचे नियोजन करून तुम्ही ताणाचे नियोजन करू शकता. ध्यानधारणा, योग, मित्रमैत्रिणींशी बोलणे आणि काही क्राफ्टच्या ऍक्टिव्हिटी केल्याने तुमचा ताण हलका होण्यास मदत होते.

२०. तुमच्या बाळाशी बोला

तुमच्या बाळाशी बोला

तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळाशी बोलत राहिल्याने खूप समाधान मिळते. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये बांध निर्माण होण्यास मदत होते तसेच तुमच्या बाळाशी संवाद साधला जातो. तुम्ही तुमच्या बाळाला तुम्हाला कसे वाटते आहे, तुमच्या कुटुंबाविषयी तसेच तुम्ही काय खात आहात किंवा तुम्ही कुठल्या क्रिया करत आहात ह्याविषयी बोलू शकता. तुम्ही तुमच्या बाळासाठी गाणी म्हणू शकता किंवा वाचन करू शकता.

निरोगी गरोदरपणाची लक्षणे

तुमच्या आरोग्यावर दररोज लक्ष ठेवणे आणि तुमच्या तब्येतीविषयी जागरूक असल्यास तुमचे गरोदरपण योग्य मार्गावर आहे ह्याची खात्री होते. कुठलीही वेगळी लक्षणे जाणवली तर त्याकडे वेळीच लक्ष द्या, जर तुम्हाला भूक लागली असेल तर पोषक नाश्ता करा आणि जंक फूड पासून दूर रहा. जर तुम्हाला तहान लागली असेल तर कॅफेन आणि शीतपेये घेणे टाळा. जर तुम्हाला ताण आला असेल तर एखादे चांगले पुस्तक वाचा किंवा थोडा वेळ झोपा. तसेच खालील गोष्टीवर लक्ष ठेवा. ते तुमच्या चांगल्या तब्येतीचे निर्देशक आहेत

1. रक्तातील साखर आणि रक्तदाबाची पातळी सामान्य असणे

गरोदरपणात, तुमचा रक्तदाब थोडा वाढलेला असतो तसेच रक्ताची साखरेची पातळी सुद्धा बदलते. म्हणून तुम्ही रक्तदाब आणि रक्तातील साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवले पाहिजे. जर शक्य असेल तर त्याची नोंद ठेवा आणि गरज भासल्यास तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा.

2. गर्भाशय आणि प्लॅसेंटाचे आरोग्य

गर्भाशय आणि प्लॅसेंटा ह्याचे आरोग्य चांगले असले पाहिजे. तुमचे बाळ गरोदरपणाच्या शेवटपर्यंत सुरक्षित असल्याची खात्री होते. प्लॅसेंटा गर्भाशयाच्या भित्तिकांना जोडलेला असतो. जर तो घट्ट नसेल तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तुमच्या डॉक्टरांना त्याविषयी विचारा तसेच कुठले व्यायाम केले पाहिजेत म्हणजे तो योग्य जागी बसेल ह्याविषयी सुद्धा जाणून घ्या

3. गर्भाचा विकास

बाळाची वाढ आणि निरोगी गर्भारपण हे बाळाची वाढ किती वेगाने होत आहे ह्यावर अवलंबून असते. जर वजनात वाढ झाली तर बाळाची वाढ होत असल्याचे ते निर्देशक आहे. ऑक्सिजन कमी पडण्याने बाळावर परिणाम होतो. काहीवेळा, त्यामुळे प्लॅसेंटाच्या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण होतो. बाळाची हालचाल नीट असेल तर बाळाला पुरेसा ऑक्सिजन मिळत असल्याची खात्री होते. तुम्हाला गर्भधारणेच्या दुसऱ्या आठवड्यात बाळाची हालचाल जाणवू लागेल. ह्या हालचाली जाणवणे आणि त्याचे प्रमाण तुमच्या गरोदरपणाच्या आरोग्याचे निर्देशक असते.

4. वजनात वाढ

तुमच्या वजनात होत असलेली स्थिर वाढ म्हणजे बाळाची वाढ परिणामी तुमच्या गरोदरपणाचे चांगले आरोग्य दर्शवते.

तुमच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर नीट लक्ष देणे, पोषण आणि चांगली तब्येत हे तुमच्या गरोदरपणाच्या काळात तुम्ही चांगले राहण्यास मदत करतील. स्वतःला आनंदी ठेवणे आणि शारीरिक व भावनिक आरोग्याची काळजी घेतल्याने तुम्हाला ह्या संस्मरणीय प्रवासात त्याची नक्कीच मदत होईल.