गर्भपातानंतर लैंगिक संबंध ठेवण्याआधी किती वेळ वाट पाहावी?

गर्भपातानंतर लैंगिक संबंध ठेवण्याआधी किती वेळ वाट पाहावी?

गर्भपात ही स्त्रीसाठी आणि तिच्या पतीसाठी शारीरिक आणि भावनिकरित्या अत्यंत क्लेशकारक घटना असते. शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या बरे होण्यास थोडा वेळ लागू शकतो. नेहमीसारखे आयुष्य सुरु करणे आणि गर्भपात झाल्यानंतर आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणे हे एक आव्हानात्मक कार्य असू शकते. या लेखात, गर्भपात झाल्यानंतर पहिल्यांदा संभोगासाठी किती काळ प्रतीक्षा करावी याविषयी सांगितले आहे, गर्भपात झाल्यानंतर लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे की नाही, भावनिक आघाताशी सामना कसा करावा तसेच गर्भपात झाल्यानंतर गर्भधारणा होण्यासाठी काही टिप्स देखील ह्या लेखामध्ये दिलेल्या आहेत.

गर्भपात झाल्यानंतर लैंगिक संबंध पुन्हा सुरू करणे कधी सुरक्षित आहे?

गर्भपात झाल्यानंतर लैंगिक संबंध पुन्हा सुरू करण्याची प्रतीक्षा शारीरिक आणि भावनिक उपचारांसाठी आवश्यक असलेल्या वेळेनुसार प्रत्येक जोडप्यासाठी बदलते. भावनिकदृष्ट्या तयार झाल्यावर आणि स्त्रीचे शरीर पूर्णपणे बरे झाल्यानंतर जोडपे लैंगिक संबंध पुन्हा सुरू करू शकते.

थोडक्यात, पहिल्या तिमाहीत गर्भपात झाल्यास आणि वेदना, योनीतून गंध, रक्तस्त्राव किंवा गर्भधारणेची लक्षणे ह्यासारखी गुंतागुंत नसल्यास, २ ते ३ आठवड्यांनंतर लैंगिक संबंध पुन्हा सुरु केले जाऊ शकतात. तथापि, दुसर्‍या किंवा तिसर्‍या तिमाहीत गर्भपात झाल्यास, लैंगिक क्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी कमीतकमी ६ आठवडे थांबणे चांगले.

गर्भपात झाल्यानंतर आपल्या भावनांना सामोरे जाणे शिकणे

गर्भपात झाल्यानंतर शारीरिक बदलांसोबत स्त्रीला तीव्र भावनांचा सामना करावा लागतो. गर्भपात झाल्यानंतर दु: , चिंता, राग, अपराधी वाटणे किंवा चिडचिडेपणा वाढणे ही सामान्य गोष्ट आहे. या विरोधाभासी भावनांमुळे आपल्यास आपल्या जोडीदाराशी पुन्हा जिव्हाळ्याचा संबंध ठेवणे कठीण होऊ शकते आणि ते अगदी सामान्य आहे.

गर्भपातानंतर दुःखाच्या ५ अवस्था

गर्भपात झाल्यानंतर जोडप्यासाठी हा काळ भावनिकरीत्या आव्हानात्मक असतो. जरी वेळ आणि सांत्वन जखमा बऱ्या करीत असले, तरी दु: खाचे टप्पे समजून घेणे तुम्हाला आणि तुमच्या पतीसाठी भावनिक उलथापालथ सहन करण्यास मदत करते.

. नकार

नकार हा शोकांचा पहिला टप्पा आहे. आपले मन कदाचित शोकांतिका नाकारू शकेल आणि जे घडले त्यानुसार वागणे आपल्यास अडचणीचे ठरू शकते.

. राग / अपराधीपणा

एकदा आपले बाळ गमावल्याची जाणीव झाल्यावर राग नकाराची जागा घेईल. तुम्ही त्या भयंकर दिवसाच्या घटना पुन्हा पुन्हा आठवून त्यासाठी स्वत: ला किंवा इतरांना दोष देऊ शकता.

. देवाकडे प्रार्थना

या टप्प्यात, आपण स्वतःला विचारू शकता, “मी का?” आणि देवाकडे प्रार्थना करू शकता. काही स्त्रिया आपल्या बाळाला परत मागण्यासाठी देवाला नवस बोलतात.

. उदासीनता

तीव्र, नकारात्मक भावना नैराश्य वाढवू शकतात. जगण्यासाठी आता काहीही शिल्लक नाही असे वाटू शकते.

. स्वीकार

तथापि,लवकरच सगळं छान होणार आहे. बहुतेक जोडपी परिस्थिती स्वीकारतात आणि पुढे जातात. त्यांना हे समजते की जितक्या लवकर ते दु: खी होणे थांबवतात तितक्या लवकर ते दुसऱ्या गर्भधारणेसाठी प्रयत्न करू शकतात.

तुमच्या जोडीदारास तुम्हाला कसे वाटते ते समजावून सांगा आणि आधार घ्या.

या विनाशकारी घटनेमुळे होणाऱ्या भावनिक वेदनापासून मुक्त होण्यासाठी स्वत: ला पुरेसा वेळ द्या. आपले पती आणि कुटुंबासोबत आपल्या भावनांबद्दल खुलेपणाने व्यक्त होणे गरजेचे आहे. समुपदेशन किंवा आवश्यक असल्यास कपल कौन्सेलर्सचा सल्ला घ्या. आपल्या पतीशी चर्चा करा आणि तुम्ही दुसऱ्या गर्भारपणासाठी तयार आहात का ह्याविषयी पतीशी चर्चा करा.

तुम्ही दुसर्‍या गर्भधारणेसाठी केव्हा प्रयत्न करू शकता?

बहुतेक डॉक्टर पुन्हा मासिक पाळी येईपर्यंत गर्भधारणेची इच्छा ठेवणाऱ्या जोडप्यांना थांबण्याचा सल्ला देतात. यासाठी सहसा चार आठवडे लागतात. गर्भपात झाल्यानंतर संप्रेरकाची पातळी सामान्य होते की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी ती स्त्रीच्या शरीराची आवश्यकता असते. आपल्या नियमित मासिक पाळीनंतर, आपण आपल्या प्रजननक्षमता जास्त असलेल्या कालावधीची अचूक गणना करू शकता. त्यामुळे पुन्हा गर्भधारणेचा प्रयत्न सुरू करण्यासाठी तुम्ही कमीतकमी महिनाभर गर्भपात होण्याची प्रतीक्षा करावी.

दुसया गरोदरपणासाठी प्रयत्न करण्यापूर्वी किती काळ थांबावे हे देखील शारीरिक झीज भरून काढण्यासाठी लागणाऱ्या वेळेवर अवलंबून असते. काही स्त्रियांना गर्भपात झाल्यानंतर काही आठवड्यांपर्यंत योनीतून रक्तस्त्राव होऊ शकतो. वेदनादायक असो वा नसो, रक्तस्त्राव पूर्णपणे बंद होईपर्यंत संभोगापासून दूर राहणे चांगले आहे, त्यामुळे संक्रमणाची शक्यता कमी होते.

काही स्त्रियांना गर्भाशयातील टिशू काढण्यासाठी शस्त्रक्रिया करून घ्यावी लागू शकते त्यामुळे शरीराची झीज भरून काढण्यासाठी बराच कालावधी आवश्यक आहे. तसेच, गर्भपातानंतर गर्भाशयाचे मुख अंशतः उघडे राहते त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते, . म्हणूनच, पूर्णपणे बरे होईपर्यंत डॉक्टर लैंगिक संबंध टाळण्यास सांगतात आणि टॅम्पॉनचा वापर करण्याचा सल्ला देतात. या उपचार प्रक्रियेस दोन आठवडे लागू शकतात.

जर गर्भपात होण्याचे कारण माहिती झाले आणि ते उपचार करण्यायोग्य आढळले तर ते कारण ओळखून पुढील गर्भधारणेची योजना आखली पाहिजे.

गर्भपात झाल्यानंतर गर्भधारणेसाठी टिप्स

  • प्रीनेट्ल व्हिटॅमिन्स घ्या: गर्भधारणेचा प्रयत्न करण्यापूर्वी कमीतकमी एक महिना आधी प्रीनेट्ल व्हिटॅमिन्स, विशेषत: फॉलिक ऍसिड घेण्यास सुरुवात करा लक्षात घ्या की हे औषध तुमच्या डॉक्टरांनी लिहून दिले पाहिजे.
  • पूर्णपणे बरे होईपर्यंत प्रतीक्षा करा: तुम्ही शारीरिकदृष्ट्या बरे झालेले आहात आणि गर्भधारणेसाठी भावनिकदृष्ट्या तयार आहात याची खात्री करा आपल्या डॉक्टरांशी बोला आणि जर गर्भपात झाल्याने भावनिक वेदना दूर करण्यासाठी मदत आवश्यक असेल तर ट्रॉमा कौन्सेलर्स चा सल्ला किंवाआधार घेण्यास अजिबात संकोच करू नका.
  • निरोगी आहार आणि नियमित व्यायाम: आपल्या आहारात भरपूर फळे आणि भाज्या असुद्या. निरोगी आहारामुळे पुढील गर्भपात होण्याचा धोका कमी होण्यास मदत होईल. तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा.
  • हानिकारक पदार्थ टाळा: अल्कोहोल, निकोटीन आणि ड्रग्ज टाळा. कॅफिनचे सेवन मर्यादित करा किंवा शक्यतो टाळा. हे सर्व पदार्थ गर्भपाताचा धोका वाढवू शकतात आणि त्यामुळे गर्भधारणेत इतर गुंतागुंत होऊ शकते.
  • विश्रांती आणि आराम: संशोधन अभ्यासानुसार ताणतणावामुळे गर्भपात होण्याचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढतो. तणावविरहित राहण्यासाठी योग आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करा, एखादे पुस्तक वाचा, फिरायला जा किंवा इतर कोणत्याही क्रियाकलापात व्यस्त राहून तुम्ही शांत आणि आनंदी होऊ शकता म्हणून आराम करण्याचा आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.

  • लैंगिक संबंध सुरु करण्याआधी आपल्या डॉक्टरांच्या सूचनांची वाट पहा: आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे अनुसरण करा आणि लैंगिक क्रिया पुन्हा सुरू करण्यापूर्वी थांबा. जर गर्भपात झाल्यानंतर योनीतून रक्तस्त्राव होत असेल तर तो रक्तस्त्राव पूर्णपणे थांबेपर्यंत थांबा. गर्भपात झाल्यानंतर प्रथमच लैंगिक संबंध ठेवाल तेव्हा काळजी घ्या. रक्तस्त्राव पुन्हा सुरू झाल्यास, लैंगिक संबंध ठेवणे थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • निरोगी लैंगिक जीवन: अभ्यास असे दर्शवितो की आठवड्यातून किमान तीन वेळा शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भवती होण्याची शक्यता बरीच वाढते.तुमचा सर्वात जास्त प्रजननक्षमता असलेला कालावधी निश्चित करण्यासाठी ओव्हुलेशन किट वापरू शकता. ओव्यूलेशन कालावधीच्या आधी ३४ दिवस शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते.
  • ऍस्पिरिन चा लहान डोस गर्भधारणेसाठी पुन्हा प्रयत्न करण्यापूर्वी ३ महिने आधीपासून घेण्यास सुरुवात करा.

गर्भपात म्हणजे जोडप्यांना त्रास देणारा अनुभव आहे. पुन्हा प्रयत्न करण्याआधी फक्त शारीरिक रित्या बरे होणे पुरेसे नाही. भावनिक वेदना दूर करण्यासाठी तुम्हाला स्वत: ला वेळ द्यावा लागेल. चिंता, भीती आणि इतर भावनांविषयी तुमच्या पतीसोबत स्पष्टपणे चर्चा करा. जेव्हा तुम्ही पुन्हा मातृत्वाचे आव्हान स्वीकारण्यास भावनिक रीत्या तयार असाल, तेव्हा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रसूतिपूर्व जीवनसत्त्वे घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुन्हा गर्भधारणेसाठी प्रयत्न करा.