दिलीपकुमार यांना मरणोत्तर भारतरत्न, महाराष्ट्र भुषणने गौरवा .

सादिक खाटीक यांची मागणी.

दिलीपकुमार यांना मरणोत्तर भारतरत्न, महाराष्ट्र भुषणने गौरवा .

आटपाडी दि . ८ (प्रतिनिधी )
                भारतीय सिने सृष्टीतील या शतकातील महानायक,अभिनय सम्राट दिलीपकुमार यांना मरणोत्तर, भारताचा सर्वोच्य बहुमान भारतरत्न ने गौरविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने केंद्राला प्रस्ताव पाठवावा आणि राज्याचा सर्वोच्य बहुमान असलेल्या महाराष्ट्र भुषण ने दिलीपकुमारांना मरणोत्तर सत्वर गौरवावे अशी महत्वपूर्ण मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी केली आहे .
                राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठविलेल्या ईमेल द्वारे केली आहे .
                या पत्राच्या प्रति उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, सामाजीक न्याय मंत्री धनंजयराव मुंढे, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री नवाब मलीक, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, इतर मागासवर्ग विकास मंत्री विजयराव वडेट्टीवार , सांस्कृतीक कार्य मंत्री अमित देशमुख, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराजबाबा चव्हाण , खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, खासदार फौजिया खान, माजी खासदार हुसेन दलवाई राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही, प्रदेशाध्यक्ष अॅड मोहंमद खान पठाण, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख या मान्यवरांना तसेच ख्यातनाम अभिनेत्री श्रीमती सायराबानु दिलीपकुमार यांना पाठविल्या आहेत .
                नुकतेच निधन पावलेले भारताचे सर्वकालिक महानायक अभिनय सम्राट दिलीपकुमार यांना त्यांच्या अभिनय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल  भारतरत्न आणि महाराष्ट्र भूषण बहुमान मिळणे न्यायोचित ठरणार आहे.
                दिवंगत दिलीप कुमारजी यांची चित्रपट क्षेत्रातील कामगिरी तर संपूर्ण जग जाणते. आजही त्यांच्या अभिनयातून धडे घेऊन अनेक अभिनेते सुपरस्टार बनत आहेत. शिवाय भारतीय चित्रपट सृष्टीचा ते अभिन्न अंग बनून गेले आहेत. याशिवाय देखील त्यांची सामाजिक जाणीवेतून केलेली कामगिरी फार मोठी आहे. भारतातील प्रत्येक अंध व्यक्तीला शिक्षणाची द्वारे खुली व्हावीत म्हणून त्यांनी योगदान दिले. त्यासाठी चालविल्या जाणाऱ्या मुंबई - पुणे विशेष रेल्वेतून प्रवास करून ते प्रत्येक वर्षी फंड निर्माण करत आणि त्यात आपले स्वतःचे 50 हजार घालून जगभरात ब्रेल लिपी मध्ये निर्माण झालेली हजारो पुस्तके संपूर्ण भारतातील अंध व्यक्तींपर्यंत पोहोचवत. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेचे ते अनेक वर्षे राष्ट्रीय अध्यक्ष होते. महाराष्ट्रातील मुस्लीम ओबीसी समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी देखील त्यांनी मोठे प्रयत्न केले आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मुस्लीम समाजाला न्याय देणार्‍या , ओबीसी आरक्षणात , मुस्लिम ओबीसींचा समावेश झाला . ज्यामुळे त्यांची शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती सुधारून समाजाच्या मुख्य प्रवाहात यशस्वी नागरिक होण्यास संधी लाभली. असंख्य ज्ञात अज्ञात समाज कार्य त्यांच्या हातून घडली. आयुष्यभर त्यांचे महाराष्ट्रात वास्तव्य होते. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. एका ध्येयाने प्रेरित होऊन कार्य करणाऱ्या अशा या व्यक्तीने भारत आणि पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी मोठे योगदान दिले. समझोता एक्सप्रेस निघाल्यानंतर तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे जाऊ शकले नाही. कारगिल घुसखोरीचे प्रकरण जेव्हा पुढे आले तेव्हा भारतातर्फे पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांना नाराजी प्रकट करण्यासाठी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जी यांनी दिवंगत दिलीप कुमारजी यांना भारतीयांच्या या बाबतीतली तीव्र भावना व्यक्त करण्याची सूचना केली असता त्यांच्या सुचनेवरून त्यांच्या समक्षच दुरध्वनीवरून पाकिस्तान चे पंतप्रधान नवाज शरीफ यांना खडे बोल सुनावणारे दिलीपकुमार खरे भारतीय होते हेच दर्शविते .
                 अभिनयाचे मानदंड, कोहीनूर, चालते बोलते विद्यापीठ असलेल्या युसूफखान सरवरखान पठाण उर्फ दिलीपकुमार यांनी ७ दशके सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजविले . मराठी, मराठी माणूस, मराठी साहित्य, गाणी, लावण्या वर प्रचंड प्रेम करणाऱ्या दिलीपसाहेबांचे मराठी बरोबरच हिंदी, उर्दू ,पंजाबी, इंग्रजी या भाषांवरही मोठे प्रभुत्व होते . नाशीक, पुणे, मुंबईतच जीवन व्यतीत केलेले दिलीपसाहेब सच्चे महाराष्ट्रीयन तर होतेच तथापि ते प्रखर देशप्रेम असणारे भारतभक्त ही होते . डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता .
                धर्मनिरपेक्ष, समाजवादी विचारधारेच्या, हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या दिलीपकुमार यांनी सदैव मानवतावादी भूमिकेचे समर्थन केले आहे .अशा या नटसम्राटास सिने जगतातील सर्वोत्कृष्ट दादासाहेब फाळके पुरस्कार ,पद्मश्री, पद्मविभूषण या सन्मानाने यापूर्वीच गौरविले गेले आहे . पाकिस्तानचा सर्वोच्य बहुमान निशान ए इम्तियाज ने ही दिलीपकुमार साहेबांना गौरविले गेले होते . २००० ते २००६ या दरम्यान ते राज्यसभेचे खासदार ही होते . मुंबईचे शेरीफ असताना विविध समाज घटकांची मने जिंकणाऱ्या दिलीपकुमार साहेबांनी मुंबईच्या आधूनिक विकासाला गती देण्यासाठी मोठे प्रयत्न केले . भारतीय सिने सृष्टीतील सर्वात जास्त पुरस्कार, सन्मान मिळविणारे दिलीपकुमार एकमेव व्यक्तीमत्व असावेत . जागतिक स्तरावर मोठा चाहता वर्ग असलेले दिलीपकुमार भारत मातेचे खरे सुपुत्र होत . अशा देशभक्त व्यक्तीला मरणोत्तर न्याय मिळणे आवश्यक आहे . महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे त्यांच्या नावाची भारतरत्न सन्मानासाठी शिफारस करावी अशी आमची कळकळीची विनंती आहे . याशिवाय महाराष्ट्रभूषण हा मानाचा बहुमान आजपर्यत अनेक गणमान्य व्यक्तींना देण्यात आला असून दिलीपकुमार यांना मरणोत्तर हा बहुमान देऊन या पुरस्काराला एक आगळे वेगळे कोंदण चढवावे अशी विनंती शेवटी सादिक खाटीक यांनी या ईमेल मध्ये केली आहे .