बाळांच्या छातीत कफ होणे: कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय

बाळांच्या छातीत कफ होणे: कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय

जर तुमच्या बाळाचे नाक सारखे वहात असेल ती चांगली गोष्ट आहे कारण त्याचे शरीर जंतुनाशकांपासून मुक्त होत असल्याचे ते चिन्ह आहे. परंतु जेव्हा त्याच्या नाकात श्लेष्मा जमा होतो तेव्हा त्याचे नाक चोंदले जाते आणि छातीत कफ साठतो. लहान मुलांमध्ये असे होणे खूप सामान्य आहे परंतु ते जीवघेणे नाही. परंतु तुमचे बाळ त्यामुळे अत्यंत अस्वस्थ होऊ शकते कारण बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या लेखामध्ये आम्ही बाळाच्या छातीत कफ होण्याची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपचार ह्याचा आढावा घेणार आहोत.

छातीत कफ होणे म्हणजे काय?

श्वसन प्रणालीच्या आतील बाजूस आवरण असते आणि त्यामुळे श्लेष्मा नावाचा जाड आणि चिकट द्रव तयार होतो. जेव्हा धूळ कण किंवा धूर यासारख्या बाहेरील गोष्टी शरीरात प्रवेश करतात तेव्हा हे अस्तर श्लेष्मा तयार करण्यास सुरवात करते. हा श्लेष्मा बाहेर टाकण्यास अयशस्वी झाल्यास छातीत कफ तयार होतो. अशाप्रकारे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर हा श्लेष्मा नाकात किंवा वायुमार्गात साचून राहिल्यामुळे छातीत कफ जमा होतो.

छोट्या बाळांच्या छातीत कफ होण्याची कारणे

बाळांच्या छातीत कफ जमा होण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत

. सामान्य सर्दी

सामान्य सर्दी ही श्लेष्मा तयार होण्यास कारणीभूत असणाऱ्या मुख्य घटकांपैकी एक आहे. अर्भकांना तो बाहेर काढून कसा टाकावा हे माहिती नसल्यामुळे छातीत कफ होतो.

. कमी प्रतिकारशक्ती

बाळांची रोगप्रतिकारक शक्ती विकसित होण्याच्या अवस्थेत असते म्हणून त्यांना सर्दी आणि खोकला होण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा बाळास सर्दी आणि खोकला होतो तेव्हा त्याच्या छातीत कफ संचय होण्याची शक्यता असते.

. धूर

धूर

सिगारेटचा धूर, वाहनांमधून बाहेर पडणारा धूर आणि स्वयंपाक धूर यासारख्या घटकांमुळे लहान बाळांच्या श्वसन प्रणालीवर परिणाम होतो आणि छातीत कफ साठतो.

. दमा

जर एखाद्या मुलास दम्याचा त्रास होत असेल तर त्याला छातीत कफ होऊ शकतो.

. अकाली जन्म

अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. यामुळे त्यांना छातीत कफ होण्याची शक्यता असते.

बाळांमध्ये छातीत कफ होण्याची चिन्हे आणि लक्षणे

बाळांमध्ये छातीत कफ होण्याची पुढील चिन्हे आणि लक्षणे पहा.

. श्वास घेण्यात अडचण

छातीत कफ झाल्यास तुमच्या बाळाची श्वास घेण्याची पद्धत बदलण्याची शक्यता आहे. जर बाळ वेगाने श्वास घेत असेल आणि त्याला श्वास घेण्यास अडचणी येत असतील तर ते कदाचित छातीत रक्तस्राव होण्याचे प्रकरण असेल.

. खोकला

जर तुमच्या बाळाला बर्‍याचदा खोकला होत असेल तर, त्याच्या छातीत कफ असल्याचे ते लक्षण असू शकते.

. मूड स्विंग्स

अस्वस्थता बाळांना चिडचिडे बनवते. तुमच्या बाळाच्या मूडमध्ये अचानक बदल झाल्याचे लक्षात आले तर छातीत कफ आहे की नाही ते तपासा.

. निद्रानाश

नाक भरलेले असताना झोपणे हे लहान मुलांसाठी एक आव्हान आहे. जर तुमच्या बाळाला झोप येत नसेल तर त्यांच्या छातीत कफ साचलेला असू शकतो.

. भूक मंदावणे

भरलेल्या नाकामुळे बाळाच्या घाणेंद्रियांवर परिणाम होऊ शकतो आणि बाळाला खावेसे वाटत नाही. म्हणूनच जर तुमचे बाळ कमी खात असेल तर त्याला छातीत कफ झाला असण्याची शक्यता आहे.

. ताप

ताप येणे हे छातीत कफ होण्याचे लक्षण नसले तरी तो सामान्य सर्दीचा भाग असू शकते. परंतु जर छातीत कफ झाला आणि त्याचे रूपांतर न्यूमोनिया मध्ये झाले तर ताप येणे हे त्याचे लक्षण असू शकते.

धोक्याची चिन्हे

छातीत कफ होणे आणि सर्दी बालरोगतज्ञांकडे जाणे नेहमीच गरजेचे नसते. तथापि, जर तुम्हाला खालील लक्षणे दिसली तर आपण ताबडतोब तुमच्या मुलास डॉक्टरकडे न्या.

. श्वास घेण्यास त्रास

छातीत तीव्र कफ किंवा बंद झालेल्या वायू वाहिन्यांमुळे असे होते. जर त्याचे ओठ निळे झाले आणि तो कुरकुर करत असेल विव्हळत असेल तर तुमच्या बाळाला डॉक्टरांकडे नेण्याची गरज आहे.

. थकवा

जर आपल्या बाळाला थकवा येत असेल आणि लघवी कमी होत असेल तर तुम्ही ताबडतोब त्याला डॉक्टरकडे न्यावे.

थकवा

बाळांच्या छातीत कफ होण्यावर घरगुती उपचार

छातीत कफ होण्यावर घरगुती उपचार खूप प्रभावी आहेत. तुमच्या बाळाच्या छातीत होणार कफ कमी करण्यासाठी काही घरगुती उपचार करून पहा.

. वाफ घेऊन पहा!

आपल्या बाळाला त्वरित आराम मिळवून देणारी एक प्रभावी पद्धत म्णजे वाफ घेणे. वाफ घेण्यामुळे छातीच्या आतील श्लेष्मा सैल होण्यास मदत होते. शिवाय, त्यामुळे नाकाच्या पोकळीला ओलावा मिळतो आणि श्लेष्मा कोरडा होत नाही . श्लेष्मा कोरडा झाल्यास वायुमार्ग बंद होतो. ह्युमिडिफायर हवेमध्ये ओलावा वाढवते. तुम्ही तुमच्या बाळाला स्टीमने भरलेल्या बाथरूममध्ये घेऊ शकता.

. ओवा आणि लसूण पुरचुंडी वापरा

तव्यामध्ये थोडा लसूण आणि ओवा गरम करा आणि कापड्याच्या तुकड्यात लपेटून घ्या. छातीत झालेल्या कफ पासून मुक्त होण्यासाठी हे आपल्या बाळाच्या छातीवर लावा. बाळाला चटका बसून बाळाच्या त्वचेची हानी होऊ नये म्हणून खूप जास्त गरम करणे टाळा.

. तुमच्या बाळाला स्तनपान द्या

जर तुमच्या बाळाचे वय सहा महिन्यांपेक्षा कमी असेल तर त्याला फक्त स्तनपान द्या. औषधांपेक्षा स्तनपानाचा उपयोग चांगला होतो. स्तनपान बाळाला सजलीत करेल, त्याच्या पौष्टिक गरजा पूर्ण करेल आणि संक्रमणास लढायला मदत करेल.

. डोके उंचावर ठेवा

तुमच्या बाळाचे डोके उंचावर ठेवून नाकातून श्लेष्मा काढून टाका जेणेकरून बाळाच्या छातीतील कफ कमी होण्यास मदत होईल

. मोहरीच्या तेलाचा वापर करून मालिश करा

हा दुसरा उपाय आहे. तुमच्या बाळाच्या छातीवर मालिश करण्यासाठी तुम्ही लसणासह कोमट मोहरीचे तेल वापरू शकता. गरम तेल वापरताना सावधगिरी बाळगा नाहीतर बाळाच्या त्वचेला त्यामुळे हानी पोहचू शकते.

. त्याच्या पाठीवर थाप द्या

तुमच्या बाळाला मांडीवर पालथे झोपवा आणि एका हाताने मानेला आधार द्या. आता दुसऱ्या हाताने त्याच्या पाठीवर थोपटा असे केल्याने श्लेष्मा सैल होण्यास मदत होईल.

. हळद द्या

हळदमध्ये कर्क्युमिन असते ज्यामुळे शरीरातील कफ कमी होण्यास मदत होते. हळद कोमट पाण्यात मिसळून बाळाला दिली जाऊ शकते. तथापि, जास्त हळद देणे टाळा कारण यामुळे मळमळ होऊ शकते.

. चिकन नूडल सूप

प्राचीन काळापासून चिकन नूडल सूपचा उपयोग छातीचा त्रास दूर करण्यासाठी केला जात आहे. हे फुफ्फुसातील श्लेष्मा साफ करते आवश्यक पौष्टिक तत्त्वे पुरवते आणि त्याच्या पचनासाठी कमी ऊर्जा आवश्यक असते.

. लिंबू आणि मध वापरून पहा

लिंबू आणि मध कफ सैल करण्यास मदत करतात. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. तथापि, हे मिश्रण एका वर्षाच्या मुलास देऊ नये.

१०. कांद्याचा रसही मदत करतो!

एक कांदा किसून घ्या आणि कोमट पाण्यामध्ये रस घाला. कांद्यामध्ये सल्फर आणि क्वेरेसेटिन असते जे श्लेष्मा कमी करण्यास मदत करते. कांद्याच्या रसात अँटीमायक्रोबियल गुणधर्म देखील असतात ज्यामुळे संक्रमण दूर होण्यास मदत होते. कांद्याचा रस एका वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना देऊ शकता. तथापि, बाळांना त्याची चव आवडत नाही. बाळाला देण्यापूर्वी आपण ते मध आणि कोमट पाण्यात मिसळू शकता.

११. मुळा रस देण्याचा प्रयत्न करा!

मुळ्याच्या रसामध्ये अशी संयुगे असतात ज्यामुळे छातीतील कफाचा त्रास कमी होतो. मुळा बाळाला तसाच दिला जाऊ शकतो किंवा छातीवर लावला तरी चालतो.

१३. नीलगिरीचे तेल देखील कार्य करते!

निलगिरीच्या तेलामध्ये एक आनंददायी सुगंध असतो आणि आपल्या मुलास सर्दी आणि खोकला असल्यास त्याचा उपयोग होतो. रुमालावर निलगिरीच्या तेलाचे काही थेम्ब टाका आणि आपले बाळ झोपलेल्या ठिकाणी ठेवा म्हणजे तो सुगंध बाळापर्यंत पोहोचेल.

१३. तुमच्या मुलाला कोमट पाण्याने आंघोळ घाला.

वरील घरगुती उपचारांव्यतिरिक्त बाळाला उबदार स्नान द्या. ह्यामुळे बाळाचे लक्ष दुसरीकडे वेधले जाईल आणि नाक मोकळे होईल.

प्रतिबंधात्मक उपाय

छातीत कफ होण्याची शक्यता कमी करू शकणारे काही प्रतिबंधात्मक उपायः

. योग्य स्वच्छता ठेवा

आपल्या घरात योग्य स्वच्छता ठेवा. त्यामुळे बाळ आजारी पडणार नाही आणि बाळ निरोगी व तंदुरुस्त राहील.

. टिश्यू वापरा

आपल्या बाळाचे नाक आणि तोंड पुसण्यासाठी टिश्यू वापरा कारण ते डिस्पोजेबल असतात आणि स्वच्छता राखण्यास मदत करतात.

. आपले तोंड झाकून घ्या

खोकला असताना जंतू पसरतात. जर घरातल्या कोणाला फ्लूचा संसर्ग झाला असेल तर त्यांना खोकला असताना तोंड झाकण्यासाठी सांगा.

. हँड सॅनिटायझर वापरा

जर आपल्या मुलाने हाताने जेवण्यास सुरुवात केली असेल तर आपण जेवणाच्या वेळेपूर्वी त्याने सॅनिटाय झर वापरले असल्याची खात्री करा. त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे नवीन जंतूंचा संपर्क झाल्यास ती आणखी बिघडू शकते. बाळाला स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर तुम्ही तुमच्या कुटूंबाच्या सदस्यांना हँड सॅनिटायझर वापरण्यास सांगू शकता.

. तुमच्या बाळाचा आहार निरोगी असल्याची खात्री करा

छातीत कफ होऊ नये म्हणून तुमच्या मुलाच्या आहारात हळद, लिंबू आणि आल्याचा समावेश करा.

. तुमच्या बाळाला सजलीत ठेवा

फ्लू झाल्यावर श्लेष्मा कोरडा होऊ नये म्हणून तुमच्या बाळाला सजलीत ठेवा.

. तुमच्या बाळाला पुरेशी झोप मिळेल याची खात्री करा

जर तुमचा मुलगा आजारी असेल तर त्याला झोप चांगली लागण्याची शक्यता नाही. तुम्ही त्याला झोपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या बाळाच्या खोलीचे तपमान उबदार ठेवा जेणेकरून तुमचे बाळ शांत झोपू शकेल.

. गर्दीची ठिकाणे टाळा

सर्दी झालेल्या लोकांच्या संपर्कात येण्यापासून रोखण्यासाठी तुमच्या बाळाला गर्दीच्या ठिकाणी नेण्याचे टाळा.

लहान मुलांच्या छातीत कफ होणे सामान्य आहे आणि त्यांच्यासाठी ते खूप अस्वस्थ करणारे असू शकते. परंतु घरगुती उपचारांमुळे बाळाला बरे करता येते. तथापि, जर घरगुती उपचार प्रभावी ठरले नाहीत तर, तुमच्या बाळास उशीर न करता बालरोगतज्ञांकडे घ्या.