श्रीकृष्णांनी मध्यरात्रीच का घेतला जन्म? एखादी दुसरी वेळ निवडायला त्यांना कोणी नाही म्हटलं होतं का?..रहस्यमय वास्तव

श्रीकृष्णांनी मध्यरात्रीच का घेतला जन्म? एखादी दुसरी वेळ निवडायला त्यांना कोणी नाही म्हटलं होतं का?..रहस्यमय वास्तव

नमस्कार मित्रांनो, आमच्या या पेज वरती आपले स्वागत आहे. आपली जिज्ञासा वाढून अनेक गोष्टींचा योग्य दिशेने शोध घेता यावा म्हणून आम्ही अशा काही रोमांचकारी गोष्टी आपल्यासमोर घेऊन येत असतो. आता पाहा ना, खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट नाही का? २४ तास असूनही देवाने मध्यरात्री का बरे जन्म घेतला असेल? दुसरी वेळ घेण्याचे का टाळले असेल? की मध्यरात्र केवळ शुभ होती?

फक्त सै निक झोपले असतील आणि आपल्याला कारा गृहातून सुटून जायला संधी मिळेल म्हणून का त्यांनी ही वेळ निवडली असावी? पण मग असे असते तर हाता पायात ठो कलेल्या बे ड्यांचं काय? भलेही सै निक झोपलेले असेनात का पण बेड्या तर होत्याच ना? मग कसे बरे सुटता आले असते? मग मध्यरात्रीचं नेमकं प्रयोजन काय हा खरोखरच श्रध्देने चर्चा करण्यासारखा विषय आहे.

तर मित्रांनो, त्याचे असे झाले की भक्त गणांच्या मागणी पुढे देवाला तसे करणे भाग पडले. देव आणि भक्त यांचे नाते दुधात मिसळलेल्या साखरेसारखे असते. जे कितीही प्रयत्न केला तरी वेगळे करणे अशक्य असते. देव आपल्या भक्तांच्या सेवेसाठी काहीही करतो. मग एकदा पूर्व जन्माच्या श्रीराम अवतारात भक्तांनी म्हणजे चंद्र देवाने विनंती केली.

की देवा आपण या जन्मी सूर्यप्रकाशात जन्म घेतला पण आता पुढील जन्म आमच्या कुळात म्हणजे चंद्राच्या रात्री घ्यावा. आणि म्हणून शुक्ल पक्षाच्या अष्टमीच्या रात्री भगवान विष्णू आपल्या श्रीकृष्ण अवतारात अवतीर्ण झाले. त्याचप्रमाणे चंद्राचा मुलगा बुध म्हणून बुधवारी श्रीकृष्णाने जन्म घेतला. तसेच श्रीकृष्ण जन्मावेळी नक्षत्र हे रोहिणी असे होते.

आणि त्याच नक्षत्रावर जन्म घेण्यामागचे प्रयोजन असे होते की रोहिणी ही चंद्राची पत्नी होती. त्यामुळे चंद्राची जी विनंती होती की देवांनी माझ्या कुळात जन्म घ्यावा ती अशाप्रकारे पूर्ण करण्यासाठी म्हणून श्रीकृष्ण मध्यरात्री जन्माला आले. शिवाय जन्म का रागृहात घ्यायचा होता. कारण दुष्ट मामा कं साने आपली आई देवकी आणि पिता वासुदेव यांना मथुरेच्या किल्ल्यातील कारागृहात कै देत डांबले होते.

त्यामुळे कारा गृहाच्या दारावर सक्त प हारा होता. सै निक डोळ्यात तेल घालून पहारा द्यायचे. त्यांचा हा पहारा चुकवून श्रीकृष्णाच्या वडिलांना बाहेर पडून गोकुळ गाठायचे होते. शिवाय परत सुखरूप का रागृहात सुद्धा यायचे होते. रात्री सै निक झोपतात. त्यामुळे पहारा थोडा सैल होतो आणि हीच संधी साधून वासुदेवाला निसटून जाता येईल म्हणून मध्यरात्र निवडण्याचे मत अनेक ता र्किक लोक देतात.

पण आधुनिक दृष्टीने पाहणारे लोक असे म्हणतात की त्यांच्याकडे तर शक्ती होती, माया होती. तसेही सै निकांना त्यांनीच तेवढ्या वेळेपूरते झोपवले होते. मग अशी शक्ती असताना रात्रीच का झोपवले? दिवसाही झोपवू शकले असते. मात्र जर दिवसा झोपवले असते तर सै निक झोपलेले पाहून अधिकारी जागृत झाले असते. आणि त्यामुळे कार्यक्रम बि घडू शकला आता.

त्यामुळे मध्यरात्र निवडण्याचे समाधानकारक उत्तर आपल्याला मिळते. पुढे मग कशाप्रकारे वासुदेवाने आपल्या लाडक्या कृष्णाला यमुनेतून गोकुळात नेले ते आपल्याला माहितीच आहे. श्रीकृष्ण जन्मावेळी सगळे वातावरण उठून उभे राहिले होते. आकाशात ढग दाटले होते, विजांचा कडकडाट होत होता, वारा सा-सा करून वाहत होता, झाडांची पडझड होत होती, जंगलातील पशू पक्षी आपल्या मंजुळ आवाजात श्रीकृष्ण जन्माचे स्वागत करत आवाज करत होते.

तिकडे मथुरेच्या वाड्यात कोणालाही या बदललेल्या वातावरणाची नेमकी कल्पना नव्हती. सारे जण आपापल्या कामात, आरामात पहुडले होते. आणि इकडे मात्र देवाधिदेव, सर्व शक्तिमान, तेजस्वी, ध र्म संस्थापक भगवान परमात्मा अवतीर्ण होत होते. शुक्ल पक्षाची ती अष्टमी आणि भगवान विष्णू अवतिर्ण झाले. माता देवकीच्या पोटी एक बालक जन्माला आले.

आणि वडिलांना आकाशवाणी ऐकू आली की ह्या बालकाला ताबडतोब गोकुळात आपल्या मित्राच्या पत्नीच्या म्हणजे माता यशोदा च्या पदरी नेवून ठेवा आणि तिची तिथली कन्या परत इथे घेऊन या. त्यानुसार पिता वासुदेव भगवंताचे नामस्मरण करत करत त्या बालकाला घेऊन निघाले. सै न्य झोपलेलं होतं पण मनात दिसण्याची दाट भीती होती. पण काय आश्चर्य सगळ्या बेड्या तु टून पडल्या, का रागृहाचे दार आपोआप उघडले गेले.

ही किमया त्या परमेश्वराची होती. भगवान सुखरूप निसटले. त्यांना स्वतःला वा चवण्यात रस नव्हता पण ते वाचल्याशिवाय कंसाचा व ध होणे शक्य नव्हते. कंसाच्या अ त्याचारापासून जनतेला वाचविण्यासाठी आणि स माजाला योग्य दिशा देण्यासाठीच हा सर्व शक्तिमान अवतार वडिलांच्या डोक्यावरील टोपलीत बसून यमुना नदी पार करत होता.