भगवान शिवाच्या 5 मुली कोण होत्या…या मुलींबद्दल माता पार्वतीला देखील महिती नव्हते…जाणून घ्या आश्यर्यकारक असे रहस्य

 0
भगवान शिवाच्या 5 मुली कोण होत्या…या मुलींबद्दल माता पार्वतीला देखील महिती नव्हते…जाणून घ्या आश्यर्यकारक असे रहस्य

श्रावणात केल्या जाणाऱ्या शिवपूजेला अनन्य साधारण महत्त्व असते. शिवाच्या उपासनेसाठी श्रावण हा सर्वोत्तम काळ मानण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील शिवमंदिरांमध्ये जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करण्यासाठी भाविकांची रीघ लागते. श्रावणातील पहिला मोठा सण म्हणजे नागपंचमी. सापाला शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते.

त्यामुळे नागपंचमी हा सण व्रत आणि उत्सव अशा दोन्ही स्वरूपात साजरा केला जातो. शिवाची ही महत्त्वाची प्रतीके आहेत, त्यापैकी एक म्हणजे नाग. त्यामुळे श्रावणातील नागाचे पूजन महत्त्वाचे मानले जाते. महादेवांना वर म्हणून प्राप्त करण्यासाठी पार्वती देवीने कठोर तप केल्याचे सर्वश्रुत आहे.

गणपती आणि कार्तिकेय ही शिवांची दोन मुले आहेत. मात्र, याव्यतिरिक्त महादेवांना पाच कन्या असल्याचे संदर्भ पुराणात आढळतो. कोण होत्या त्या पंचकन्या? त्यांची नावे काय? जाणून घेऊया महादेव शिवशंकराचे दोन पुत्र गणपती आणि कार्तिकेय सर्वश्रुत आहेत. मात्र, महादेव शिवशंकराना पाच कन्या होत्या.

याबाबत खूप कमी जणांना माहिती आहे. मधुश्रावणी कथेत महादेवांच्या या पाच कन्यांविषयी संदर्भ आढळतो. याशिवाय शिवपुराणात महादेवांच्या एका कन्येचा उल्लेख आढळतो. या मुलीचे नाव मनसा असून, ती नागांची देवता असल्याचे सांगितले जाते. महादेव शिवशंकरांच्या पंचकन्या नेमक्या कोण होत्या आणि त्यांचा जन्म कसा झाला.

याविषयीची एक कथा पुराणात आढळते. पुराणातील एका कथेनुसार, महादेव आणि माता पार्वती कैलासावरील एका सरोवरात जलक्रीडा करत होते. त्यावेळी शिवलीलेमुळे पाच कन्यांचा जन्म झाला, असे सांगितले जाते. मात्र, या कन्या मनुष्यरुपात प्रकटल्या नाहीत, तर त्यांनी नागरुप धारण केले, अशी मान्यता आहे.

मात्र, शिवलीलेमुळे पाच कन्यांच्या जन्म झाला आहे, याबाबत माता पार्वतींना काहीच माहिती नव्हते. गणपती आणि कार्तिकेयाप्रमाणे महादेव या पंचकन्यांचीही काळजी घेत. त्यांच्यावरही सारखेच प्रेम करत. महादेव दररोज आपल्या पंचकन्यांना भेटण्यासाठी जात असत. दररोज महादेव नेमके कुणाला भेटायला जातात, याबाबत पार्वती देवीला उत्सुकता होती.

मात्र, असे अनेक दिवस सुरू होते. शेवटी पार्वती देवींची उत्सुकता शंकेत परावर्तीत झाली. एके दिवस महादेवांच्या पाठलाग करत पार्वती देवी सरोवराजवळ पोहोचली आणि पार्वती देवीने जे पाहिले, ते अगदी थक्क करणारे होते. पार्वती देवी पाहतात, तर महादेव शिवशंकर पाच नाग कन्यांसोबत खेळत होते.

ते दृश्य पाहून पार्वती देवी अगदी अचंबित झाल्या. त्यांचा रा ग अनावर झाला आणि त्या नागकन्यांना क ठोर शासन करण्यासाठी त्या पुढे सरसावल्या. आपल्या शक्तीचा प्र हार त्या पाच नाग कन्यांवर करणार, इतक्यात महादेवांनी पार्वती देवींना रोखले. पार्वती देवींचा रा ग शांत करत या आपल्याच कन्या असल्याचे सांगितले.

सुरुवातीला पार्वती देवींचा यावर विश्वास बसला नाही. मात्र, दिव्य दृष्टीने महादेवांनी पार्वती देवींना पटवून दिले. महादेवांच्या या पंचकन्यांची नावे आहेत, जया, विषहर, शामिलबारी, देव आणि दोतली. महादेव आपल्या पंच कन्यांबाबत पार्वती देवीला सांगताना म्हणाले की, श्रावण शुद्ध पंचमीला या पाच नाग कन्यांची जो पूजा करेल, त्याच्या संपूर्ण कुटुंबाला सर्पदं शाचे भय राहणार नाही.

एवढेच नव्हे, तर या पंचनाग कन्यांच्या शुभाशिर्वादामुळे घरात धन-धान्याची कम तरता राहणार नाही. म्हणूनच नागपंचमीला या पाच नागकन्यांचे पूजन करणे, अत्यंत शुभ मानले जाते. मित्रांनो, आमच्या पे जचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow