कुळ कायदा म्हणजे काय? कुळाचे प्रकार किती व कोणते? जाणून घ्या कुळ का यद्याशी सं बंधीत संपूर्ण महत्वपूर्ण माहिती…अन्यथा भविष्यात
जर एखादी व्यक्ति अज्ञान असेल, किंवा अ पंग असेल, किंवा सै न्य दलात नोकरीस असेल तर अश्या कुळाच्या जागी एखादी व्यक्ती जमीन कसत असेल तर तो पोट कुळ समजतात. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

नमस्कार मित्रांनो, जमीनीला कूळ लागणे हा वाक्य प्रयोग आपल्याला सर्वांना माहितीच आहे चांगला परिचयाचा झालेला आहे. कुळ म्हणजे काय? कुळाचे प्रकार कोणते याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. कुळ म्हणजे काय?:- कुळ का यद्यानुसार कलम 2/18 म्हणजे ज्याने जमीन करार पद्धतीने घेतली आहे, शेत मालकाकडून त्याला कुळ म्हणता येते.
सातबारावर ज्याची नोंद संरक्षित कुळ असे करण्यात येते जो का यदेशीर पद्धतीने शेत मालकाच्या मर्जीने ज्याची जमीन कसतो त्याला कुळ म्हणतात. बे कायदेशीर पद्धतीने जमीन ताब्यात घेतल्यास त्याला कुळ म्हणत नाहीत. डिमड टेनंट (Dee med Ten ant) चार/ अ का यदेशीरपणे जमीन कसणाऱ्याला कुळ असे म्हणतात.
कुळ कोणाला म्हणायचे?:- एखादी पडीक जमीन असेल व त्यात मशागत होत नसेल तर त्याला कुळ म्हणता येणार नाही. एखादा व्यक्ती कुळ आहे की नाही हे कसे ठरवणार तर ते अँ डरसन मॅ न्युअल मध्ये का यद्याने ठरवता येते. यामध्ये कुळाचा स्वतंत्र फेरफार केलेला असावा तसेच मालकाला त्याची नोटीस बजावलेली असावी व मालकाचा त्यावरती काहीही विरोध नसावा तरच तो फेरफार मंजूर होतो.
तलाठ्याला स्वतःला अधिकार असतो कि गावामध्ये जमिनीचा मालक आणि जमीन कसणारा ह्या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत तर तलाठी कुळाच्या विनंतीनंतर कुळाचे नाव लावण्याची प्रक्रिया करू शकतो. ही सर्व प्रक्रिया जर का यदेशीररित्या पूर्ण झालेली असेल व पीक पाणी मध्ये त्याची नोंद असेल तरच हा कुळ असल्याचा खूप मोठा पुरावा आहे.
कुळाचे प्रकार:- आता आपण कुळाचे प्रकार पाहूयात, 1 संरक्षित कुळ – संरक्षित कुळ म्हणजे असे कुळ जे पूर्वीच्या जुन्या ‘कुळ का यदा सन 148’ चे कलम 14 अन्वये संरक्षित कुळ मानले गेले होते. सात-बारा उताराच्या इतर हक्कात संरक्षित कुळ म्हणून अशा व्यक्तीचा उल्लेख असेल, परंतु त्यासाठी हे कुळ 1939 च्या कुळ का यद्यानुसार दिनांक 1 जानेवारी 1938 पूर्वी सतत सहा वर्षे कूळ म्हणून कसत होता.
तसेच एक जानेवारी पूर्वी सतत सहा वर्षे कुळ या नात्याने कसत असेल, आणि दिनांक 1 नोव्हेंबर 1947 रोजी कूळ म्हणून कसत असणाऱ्या व्यक्तीला संरक्षित कुळ असे मानले गेलेले आहे. हे देखील आपण उदाहरणाने समजून घेऊया. जर सुरेश 1 जानेवारी 1932 ते दिनांक 1 जानेवारी 1945 पर्यंत आणि त्याच प्रमाणे दिनांक 11 नोव्हेंबर 1947 रोजी कुळ या नात्याने जमीन कसत असेल तर त्यास संरक्षित कुळ मानले जाते.
2 कायम कूळ किंवा मिराशी कुळ:- मुंबई कुळ वहिवाट कायदा 1948 कलम 2(10) अन्वये कायम कुळं म्हणजे, ”अशी व्यक्ती जी मुंबई कुळ वहिवाट सुधारणा कायदा 1955 उदयास येण्या-पूर्वीपर्यंत ज्या व्यक्तींना त्यांच्या वहीवाटी मुळे किंवा न्यायालय निकालामुळे कायम कुळ ठरवले गेले आहे.” हे देखील आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊन. सुधारित का यदा 1955 येण्यापूर्वी सुरेशने कुळ का यदा अव्वल कारकून तहसीलदार यांच्याकडे त्याची कुळ या नात्याने वहिवाट आहे.
आणि त्या प्रमाणे जमिनीला नाव लावण्यासाठी अर्ज दिला आणि ती चौकशी होऊन सुरेशची कूळ या नात्याने नाव लागले, तर असे कुळ कायम कूळ असे मानले जाईल. 3 बेदखल कुळ:- बेदखल कुळ म्हणजे, ”कुळाने जर काही गोष्टींमध्ये किंवा नियमांमध्ये कसूर केलेला असेल तर अश्या व्यक्तिला कुळ या नात्याने बेदखल केले जाते आणि अशा कुळाला बेदखल कुळे असे म्हणतात.” आता कसूर म्हणजे काय हे का उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया.
सुरेश हा जमीन कुळ आहे, आणि जर सुरेशने महसूल वर्षाचा खंड त्या वर्षाच्या मे महिन्याच्या 31 तारखेपूर्वी जाणून-बुजून भरला नसेल, किंवा त्या जमिनीला जाणून बुजून काही कायमस्वरूपी नुकसान पोहोचविले असेल, किंवा जाणून बुजून कलम 27 चे उल्लंघन करून जमिनीची विभागणी किंवा हस्तांतरण केले असेल, किंवा अन्य कोणाला जमीन कसायला देत असेल, किंवा जमिनीचा वापर शेती शिवाय इतर प्रयोजना करिता करत असेल.
तर अशा वेळेस जमीन मालकाने सुरेशला तीन महिन्याच्या मुदतीत लेखी नोटीस द्यायचे असते. पुढे कुळ या नात्याने जमीन कसण्यास सुरेश अपात्र ठरतो आणि सुरेशला बेदखल कुळ असे म्हटले जाईल. 4 मानीव कुळ:- याला इंग्लिश मध्ये Dee med Ten ent असे म्हणतात. मानीव कुळ म्हणजे असे कुळ ज्याच्या वहिवाटी मुळे किंवा त्याच्या पूर्वजांच्या कुळवहिवाटी मुळे कुळ हे मानीव खरेदीदार होतात.
आणि अशा कुळाला मानीव कुळ असे म्हणले जाते. 5 पोट कुळ:- आपण आपल्या लेखा मधील सर्वात शेवटचा आणि पाचवा पर्याय म्हणजे पोट कुळ. का यद्यान्वये पोट कुळ आणि पोट पट्टा यासाठी निर्बंध घातलेले आहेत. पोट कुळ म्हणजे असे कुळ की काही कारणा मुळे कुळाने पट्ट्याने त्याला ठेवलेले असते. असे पोट कुळ कुळाप्रमाणेच पट्ट्यांवर कुळाची जमीन कसतो.
जर एखादी व्यक्ति अज्ञान असेल, किंवा अ पंग असेल, किंवा सै न्य दलात नोकरीस असेल तर अश्या कुळाच्या जागी एखादी व्यक्ती जमीन कसत असेल तर तो पोट कुळ समजतात. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.
What's Your Reaction?






