प्रभू श्री राम यांच्या बहिणीचे रहस्यमय जीवन…असं काय घडलं की प्रभु श्रीरामाची बहीण आजही अनेकांना ठाऊक नाही धार्मिक

नमस्कार मित्रांनो, रामायण हे संस्कृत महाकाव्य आहे, याची रचना महर्षी वाल्मिकी यांनी केली होती. हे भारतीय साहित्यातील दोन विशाल महाकाव्यांपैकी एक आहे.

प्रभू श्री राम यांच्या बहिणीचे रहस्यमय जीवन…असं काय घडलं की प्रभु श्रीरामाची बहीण आजही अनेकांना ठाऊक नाही धार्मिक

नमस्कार मित्रांनो, रामायण हे संस्कृत महाकाव्य आहे, याची रचना महर्षी वाल्मिकी यांनी केली होती. हे भारतीय साहित्यातील दोन विशाल महाकाव्यांपैकी एक आहे. हिं दू ध र्मात रामायणाचे एक विशेष महत्व आहे, यामध्ये सर्वांना नात्यातील कर्तव्यांविषयी सांगितले गेले आहे. त्याचबरोबर या महाकाव्यात भगवान विष्णूंचा राम अवतार यामध्ये दाखवलेला आहे.

प्रभू श्रीराम यांच्याविषयी आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहे. त्याचबरोबर श्रीराम यांचे भाऊ, आई, वडील , पत्नी, मित्र त्याचबरोबर त्यांच्या मुलांविषयी सुद्धा आपल्याला माहीत आहे पण भगवान राम यांची एक बहिण सुद्धा होती याबद्दल खुप कमी लोकांना माहीत आहे. प्रभू श्रीराम यांना एक बहीणही होती पण याबद्दल अधिक माहिती नाही. त्यांच्याबद्दल इतिहासामध्ये खुप कमी उल्लेख आहे.

राम यांच्या बहिणीचा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये नाही तर व्यासमुनींच्या महाभारतात दिलेला आहे. पण त्यांच्याविषयी काही कथा आहेत, या कथा आज आपण जाणून घेऊया. अस म्हणलं जात की, अयोध्येचा राजा दशरथ याला तीन राण्या होत्या यातील कौशल्येचा पुत्र म्हणून श्रीराम यांना म्हणले जाते. पण प्राचीन कथेनुसार प्रभू श्रीराम यांच्या जन्मापूर्वी कौशल्या आणि दशरथ यांना एक कन्या होती जीचे नाव शांता होते. शांता खुपच सुंदर आणि बुद्धिमान होती.

एकदा कौशल्येचा भाऊ आणि पत्नी ज्यांचे नाव रोमपद आणि वर्षीणी हे अयोध्येला आले होते. अयोध्येमध्ये शांताला बघून वर्षीणीच्या तोंडातून निघाले की आमच्या इथे जर कोणी संतान झाले तर ते शांता सारखे व्हावे नाहीतर होऊ नये. आणि ही गोष्ट ऐकून दशरथ यांनी शांताला त्यांना दत्तक द्यायचे ठरवले आणि यामुळे शांता दुसऱ्या देशाची राजकुमारी बनली.

इतिहासात या ही घटनेचा उल्लेख आहे की राजा दशरथ ने आपल्या पुत्रीचा त्याग केला होता पण हा त्याग का केला होता याबद्दल वेगवेगळे उल्लेख आहेत. त्यापैकी एका लोककथेनुसार शांताच्या जन्मानंतर जवळ जवळ 12 वर्षे अयोध्येमध्ये दुष्काळ पडला होता. राजा दशरथने याबद्दल अनेकांना विचारले असता त्यांना हे समजले की हा दुष्काळ त्यांच्या मुली मुळे पडला आहे.

या गोष्टीमुळे दशरथ ने शांताला तिच्या मावशीकडे (वर्षीणी) पाठवले होते व त्यानंतर परत कधीच अयोध्येला आणले नाही. एक कथा अशी ही सांगितली जाते की, अयोध्येचा राजा दशरथ आणि कौसल्याच्या संतानाकडूनच रावणाचा व ध होणार आहे, यामुळे रावणाने आधीच कौसल्येला मारण्याची योजना केली. त्याने कौसल्येला एका डब्यात बंद केले आणि नदीत सोडून दिले पण जे घडणार आहे ते कोण टाळू शकते.

तिथूनच राजा दशरथ शिकारी साठी चालले होते व त्यांनी कौसल्येला वाचवले आणि त्यावेळी नारदमुनीनी या दोघांचा गंधर्व विवाह केला होता. नंतर त्यांना एक मुलगी झाली तिचे नाव शांता पण ती आंधळी होती, यावर राजा दशरथने अनेक उपचार केले पण काही उपयोग झाला नाही. काही ऋषिमुनींना विचारले तेव्हा कौसल्या आणि राजा दशरथ यांचे गोत्र एक आहे, त्यामुळे अशा स मस्येचा सा मना करावा लागत आहे.

त्यांना हे ही सांगण्यात आले की या कन्येचे आई वडील बदलले तर ही कन्या बरी होऊ शकते. हेच कारण होते की राजा दशरथने शांताला रोमपद आणि वर्षीणीला दत्तक दिले. अशी ही एक कथा आहे की राजा दशरथ ने ती मुलगी असल्यामुळे तिचा त्याग केला कारण ना वंश वाढणार होता ना ती राज्य सांभाळू शकत होती. शांताला दत्तक दिल्यानंतर राजा दशरथाला एकही सं तान नव्हते.

त्यामुळे सं तान प्राप्तीसाठी राजा दशरथने पुत्रकामयष्ठी हा यज्ञा केला यानंतर त्यांना चार पुत्र झाले. चार पुत्र असूनही कौसल्या आपल्या मुलीला मनातून काढू शकत नव्हती आणि या गोष्टीमुळे दशरथ आणि कौसल्यामध्ये वा द ही होत होते. पण जेव्हा भगवान राम मोठे झाले आणि त्यांना आपली बहीण शांता बद्दल माहिती झाले तेव्हा त्यांनी आपली बहीण आणि माता कौसल्याला भेटवले.

असही म्हणले जाते की जेव्हा राजा दशरथ पुत्रकामयष्ठी यज्ञ करणार होते तो शांताचा पती ऋषी सिंहनेच केला होता कारण जे कोणी ऋषी हा यज्ञ करणार होते, त्यांना जी वनभराच्या तपस्येची आहुती त्यामध्ये द्यायची होती म्हणून कोणीच ऋषी हा यज्ञ करायला तयार नव्हते, एवढंच काय ऋषी सिंह ही तयार नव्हते पण जेव्हा शांताने ऋषी सिंह यांना तयार केले तेव्हा त्यांनी तो यज्ञ केला आणि आपल्या जी वनभराची तपस्या आहुती मध्ये दिली.

या यज्ञ नंतर ऋषी सिंह हिमालयाला निघून गेले. आणि त्याचे फलित म्हणून अयोध्येमध्ये चार बालकांचा जन्म झाला. हिमाचल प्रदेशातील कुल्लू पासून 50 किमी अंतरावर ऋषी सिंह यांचे मंदिर बांधले आहे आणि तेथूनच थोड्या अंतरावर शांता देवीचे मंदिर आहे. रामायणात शांताविषयी या घटनांचा उल्लेख दिला आहे.