नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराची अद्भुत रहस्ये जाणून घ्या…या ठिकाणी एकाच वेळी शिव, ब्रम्हा आणि विष्णू..

नमस्कार मित्रांनो, देवाधिदेव महादेव आपल्या १२ ज्योतिर्लिंगामध्ये वास करून शिवलिं- गाच्या रूपात भक्तांना तारतात अशी आपल्या स माजात मान्यता आहे. त्यामुळे भगवान शिवाचे भक्तगण मोठ्या श्रध्देने शिवाची आराधना , उपासना करतात. महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी १ असलेले ज्योतिर्लिंग म्हणजे नाशिक चे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग होय. जे ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी असुन गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे.
संपूर्ण देशभरात या ज्योतिर्लिंगा बद्दल भाविकांच्या मनात आस्था असून अनेक लोक दरवर्षी येथे दर्शनासाठी येत असतात. कारण या ज्योतिर्लिंगाचे एक खास वैशिष्ट्य आहे. तेच आपण जाणून घेऊ. श्री सोमनाथ, श्री मल्लिकार्जुन, श्री ओंकारेश्वर, श्री विश्वेश्वर, श्री औंढा नागनाथ, श्री भीमाशंकर, श्री घृष्णेश्वर, श्री रामेश्वर, श्री केदारेश्वर, श्री महाकालेश्वर, श्री नागनाथ, श्री वैद्यनाथ असे ज्योतिर्लिंग संपूर्ण भारतात विराजमान आहे.
आणि १२ वे ज्योतिर्लिंग म्हणजे श्री त्र्यंबकेश्वर. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं हे ज्योतिर्लिंग आपल्याला लाभलेल्या निसर्ग सौंदर्याने अधिक रम्य वाटते. इथले मंदिर काळ्या दगडांनी बांधले गेले आहे. मंदिरासमोर भगवान शिवाचा नंदी आहे. असे मानतात की भगवंताच्या दर्शनासाठी जाण्या अगोदर या नंदीच्या कानात आपली विनंती, मागणी सांगावी लागते.
आणि ती तशी त्याच्या कानात आपण सांगितली की मग तो नंदी आपले म्हणणे भगवान शंकराजवळ पोचवतो. त्यामुळे नंदिजवळ अनेक भाविक आपली मनो कामना प्रकट करत असतात. मंदिराचे बांधकाम भव्य असून स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. गोदावरी नदीचे हेच उगमस्थान आहे. असे सांगितल्या जाते की गोदावरी नदी या पर्वतावरून सारखी सारखी पलायन करत होती.
ती इथे थांबायला राजी होईना. त्यामुळे ऋषी गौतम यांनी आपल्या साधनेच्या तपाने एक तलाव निर्माण करून गोदावरी नदीला कायमचे याठिकाणी बांधून घेतले. आजही हा तलाव आपल्याला इथे आढळतो. जो कुशावर्त तलाव म्हणून ओळखला जातो. अत्यंत रम्य असा हा परिसर असून भगवान भोलेनाथ यांच्या आशीर्वादाने पावन झालेला आहे. महा शिवरात्रीचा इथला थाट तर न भूतो न भविष्यती असाच असतो.
या मंदिराच्या पंचक्रोशीमध्ये कालसर्प शांती ,त्रिपिंडी विधी आणि नारायण नागबली इत्यादींची पूजा केली जाते. या मंदिराच्या आत एक ग-र्भगृह आहे, ज्यामध्ये प्रवेश केल्यावर फक्त शिवलिं’गाचे दर्शन होते, जर तुम्ही नीट बघितले तर 1 इंचाचे तीन लिं’ग समोर दिसतात. हे तीन लिं’ग त्रिदेवाचे अवतार मानले जातात म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश. सकाळी पूजेनंतर या आज्ञेवर पाच मुखांचा मुकुट अर्पण केला जातो.
पुराणांनुसार, एकदा महर्षि गौतमच्या तपोवनात राहणाऱ्या ब्राह्मणांच्या बायका गौतम ऋषींच्या पत्नी अहिल्यावर काही कारणांमुळे रागावल्या. त्या सर्व बायकांनी आपल्या पतींना गौतम ऋषींचा अपमान करण्यासाठी प्रेरित केले. त्या ब्राह्मणांनी यासाठी गणपतीची पूजा केली. त्यांच्या पूजेने प्रसन्न होऊन गणेशजींनी त्यांना वरदान मागण्यास सांगितले. ते ब्राह्मण म्हणाले, प्रभु, कसतरी करून गौतम ऋषींना या आश्रमातून बाहेर काढा. गणेशजींना त्यांचे पालन करण्यास भाग पाडले गेले.
मग गणेशजीने दुर्बल गायीचे रूप धारण केले आणि गौतम ऋषींच्या शेतात गेले आणि पीक खाण्यास सुरुवात केली. गाईला पीक खाताना पाहून ऋषी गौतमने हातात काठी घेतली आणि गायीला तिथून दूर नेण्यास सुरुवात केली. जेव्हा त्यांच्या काठ्यांना स्पर्श झाला तेव्हा गाय तिथे पडली आणि मरण पावली. त्यावेळी सर्व ब्राह्मण जमले आणि त्यांनी गौतम ऋषींना गोह-त्या केली म्हणवून त्यांचा अपमान करण्यास सुरुवात केली.
महाशिवरात्रीला अनेक भाविक इथे गर्दी करतात. तसेच श्रावण महिन्यातही विशेष पुण्य कमविण्यासाठी भाविक इथे येत असतात. मित्रांनो आपण भारतातील इतर ज्योतिर्लिं -ग पाहिली असतील. पण त्यांच्यात आणि श्री त्र्यंबकेश्वरामध्ये एक फरक आपल्या लक्षात येतो. तो म्हणजे श्री त्र्यंबकेश्वर येथील शिव लिं -ग हे तीन मुखी आहे.
ऋषी गौतम आणि माता गोदावरी यांच्या विनंतीने भगवान भोलेनाथानी तीनही देवांसह येथे येऊन निवास करण्याची विनंती मान्य करून याठिकाणी आपले ठाणे वसवले असे म्हणतात. त्यामुळे भगवान शिवासह परमात्मा ब्रम्हा आणि श्री विष्णू हे देखील येथे असतात, दर्शन देतात अशी श्रद्धा भक्तांमध्ये दिसून येते. आणि हेच या ज्योतिर्लिं-गाचे प्रमुख वैशिष्टय आहे.
असे म्हणतात की पांडवांच्या काळात हे अशाप्रकारचे शिव लिं -ग निर्माण करून घेऊन याठिकाणी बसवण्यात आले. त्याला सोन्याचा थाट असून हिरे, माणिक इत्यादी रत्ने याला लावलेली आहे. महाशिवरात्रीच्या यात्रेत अशाच सोन्याच्या शिव लिं- गाची पालखी येथून काढली जाते. यात्रेला बहुसंख्य भाविक गर्दी करतात. भोलेबाब संपूर्ण भारतात शक्तीची देवता म्हणून प्रसिद्ध आहे.
आणि त्यांचा क्रोधही सर्वांना ज्ञात आहे. भोलेबाबांची साधना करणाऱ्या साधुंना ना गासाधू असे म्हणतात. हे साधक म्हणजे एक नवलच आहे. त्यांची दैनंदिनी, उपासना, उपाशी राहणं, एवढ्या शित प्रदेशात हे नागा साधू नि र्व स्त्र राहून भगवान शिवाची आराधना करतात. भोलेबाबाच त्यांना त्यासाठी प्रेरणा आणि बळ देतात. आपल्या भक्तांसाठी भोलेबाबा नेहमीच धाऊन आले आहे. अशा अनेक कथा आपण जाणतोच.
What's Your Reaction?






