“कर्मयोगी विद्यानिकेतन, सेमी इंग्लिश स्कुल” पंढरपूरचा “प्रथम बॅचचा इ.१० वी परीक्षेचा १०० % निकाल”

 0
“कर्मयोगी विद्यानिकेतन, सेमी इंग्लिश स्कुल”  पंढरपूरचा  “प्रथम बॅचचा इ.१० वी परीक्षेचा १०० %  निकाल”

शैक्षणिक वर्ष २०२१-२२  मध्ये घेण्यात आलेल्या १० वी एस.एस.सी. परीक्षेचा निकाल आज दिनांक १६.०७.२०२० रोजी जाहीर झाला.

पंढरपूर तालुक्यातील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेचा इ.१० वीच्या पहिल्या बॅचचा निकाल १०० %  लावून प्रशालेने उत्तुंग यश मिळविले. ही माहिती प्रशालेच्या प्राचार्या सौ.सोनाली पवार यांनी दिली.

इ.१० वीच्या विद्यार्थ्यांकडून नियमित अभ्यास करुन घेतल्यामुळे व कोरोना कालावधीतही विद्यार्थ्यांकडून सकाळी ९.०० ते दु.२.०० वाजेपर्यंत ऑनलाईन क्लासद्वारे सर्व अभ्यासक्रम पूर्ण करुन घेतला गेला. कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाला ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्नशील असते.

 सदरच्या इ. १०वी परीक्षेमध्ये विघ्नेश कुलकर्णी याने ९२.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला तसेच अथर्व जाधव याने ९१.२०% मिळवत व्दितीय क्रमांक तर रिद्धी सावंत हिने ८९.६० % गुण मिळवून प्रशालेमध्ये तृतीय क्रमांक मिळवला या प्रशालेतील इ. १०वी परीक्षेस एकूण २४ विद्यार्थी बसले होते त्यापैकी २२ विद्यार्थ्यांनी ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करुन घवघवीत यश संपादन केले.

सदर विद्यार्थ्यांना प्राध्यापक श्री केकडे, श्री जाधव, श्री याळगी, श्री तुरेवाले, श्री त्रिंबक कुलकर्णी, श्री नारायण कुलकर्णी व सौ कोरबू टीचर या सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 चौकट ओळ- कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेच्या सुत्रबद्ध नियोजनामुळे व कर्मयोगी शैक्षणिक प्रणालिमुळे प्रशालेच्या इ.१० वीच्या प्रथम बॅचचा १००% निकाल लावून घवघवीत यश संपादन केले. ही निकालाची परंपरा कर्मयोगी विद्यानिकेतन कायम ठेवणार याची मी ग्वाही देतो.

                                                                                                       रोहन परिचारक

                                                                                                          (चेअरमन)

                                

                                         

Files

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow