कैरीचे लोणचे

आपल्याला जेवणात वरण,भात,भाजी आणि पोळीबरोबरच लोणचे,पापड,चटणी,कोशिंबीर हे पदार्थ देखील आवडतात. जेवणात जर लोणचे असेल तर जेवायलाही एक प्रकारची मजा येते. आज मी तुम्हाला या लेखातून कैरीचे लोणचे कसे करावे याची माहिती सांगणार आहे.

 0
कैरीचे लोणचे

कैरीचे लोणचे(Kairiche Lonche In Marathi)

साहित्य:

  • कैऱ्या-दीड किलो
  • मोहरीची डाळ-१ वाटी (१०० ग्रॅम )
  • मिरची पावडर -१/२ वाटी
  • हळद- २ ते ३ चमचे
  • मीठ-१ सपाट वाटी 
  • मेथी - २ चमचे
  • तेल-दीड वाटी

 

फोडणी साठीचे साहित्य:

  • मोहरी-२ चमचे
  • हिंग-४ चमचे

 

कृती-

सर्वात प्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. त्यानंतर त्या एका फडक्याला पुसून घ्याव्यात. कैऱ्या थोड्यासुद्धा ओल्या राहता काम नये याची काळजी घ्यावी. त्यानंतर कैरीच्या सालासकट चौकोनी छोट्या छोट्या फोडी कराव्यात. कैरीच्या बाटा टाकून द्याव्यात. त्यानंतर तेल तापत ठेवावे. तेल चांगले तापल्यावर त्यात मेथी टाकावी. मेथी गुलाबी रंग होईपर्यंत भाजावी. त्यानंतर मिक्सरमध्ये मेथी व मोहरीची डाळ जाडसर वाटावी. नंतर मोहरीच्या कुटात मीठ व मिरची पावडर एकत्र करून सर्व मंद गॅसवर गरम होईपर्यंत २ ते ३ मिनिटे परतावे. ते गरम झाल्यावर गॅस बंद करावा आणि एका प्लेट मध्ये काढून घ्यावे व थंड होण्यासाठी ठेवावे.

त्यानंतर अर्धी वाटी तेल तापण्यासाठी ठेवावे. तेल कडकडीत तापल्यावर त्यात मोहरीची आणि  हिंगाची फोडणी द्यावी. मोहरी चांगली तडतडल्यावर गॅस बंद करावा आणि त्यात हळद टाकावी. त्यानंतर दुसरे १ वाटी तेल गरम करून घ्यावे व गॅस बंद करावा.

 

तेल व मसाला पूर्णपणे थंड झाल्यावर कैरीच्या फोडीन चोळावा व १० ते १५ मिनिते तसेच ठेवावे. त्यानंतर एक स्वच्छ काचेची बरणी व्यवस्थित पुसून घ्यावी. काचेची बरणी अजिबात ओली राहता कामा नये. त्यांनतर हे लोणचे त्या बरणीत भरावे. नंतर तापवून थंड केलेले तेल वरतून ओतावे. त्यानंतर बरणीला  घट्ट झाकण लावावे व झाकणाभोवती फडके बांधून बरणी ऊन लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावी. अशाप्रकारे आपले कैरीचे लोणचे तयार.

कैरीचे गुजराथी लोणचे 
साहित्य :
  • कैऱ्या-दीड किलो 
  • मिरची पावडर- ५ टेबलस्पून 
  • हळद-२ चमचे 
  • मीठ-१ सपाट वाटी 
  • गुळ - १ सपाट वाटी 
  • तेल - दीड वाटी 
  • मोहरी डाळ - अर्धी वाटी(५० ग्रॅम )
  • धणे - अर्धी वाटी 
  • बडीशेप-१ टेबलस्पून 
  • मेथी-२ चमचे 
 
फोडणीचे साहित्य:
  • मोहरी-२ चमचे 
  • हिंग- ४ चमचे 
 
कृती:
 
सर्वात प्रथम तेल तापण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यात २ चमचे तेल टाकावे. तेल तापल्यावर त्यात मेथी घालून गुलाबी रंगावर परतवावी. त्यानंतर त्यात मोहरीची डाळ,धणे,बडीशेप घालून परतवावे व त्यानंतर गॅस बंद करून त्यात मिरची पावडर व मीठ घालून एकत्र करावे. नंतर हे सर्व एका प्लेट मध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवावे. मसाला थंड झाल्यावर मिक्सरमध्ये कोरडाच जाडसर वाटावा. 
 
त्यानंतर १ वाटी तेल तापण्यासाठी ठेवावे. तेल चांगले तापल्यावर त्यात मोहरी आणि हिंगाची फोडणी द्यावी. फोडणी देऊन झाल्यावर गॅस बंद करून त्यात थोडीशी हळद घालावी. तेल थंड झाल्यावर मसाला व गूळ मिक्स करून त्यात कैरीच्या फोडी करून टाकाव्यात. त्यानंतर हे सर्व मिक्स करावे. नंतर हे तयार लोणचे एका काचेच्या बरणीत भरून ठेवावे. लोणचे बरणीत भरण्यापूर्वी बरणी स्वच्छ धुवून आणि मग एकदम कोरडी करून घ्यावी आणि त्यानंतरच लोणचे भरावे. नंतर अर्धी वाटी तेल गरम करून घ्यावे आणि ते थंड झाल्यावर लोणच्याच्या बरणीत भरावे. अशाप्रकारे कैरीचे गुजराथी लोणचे तयार. 

महत्वाची प्रश्नोत्तरे (Frequently Asked Questions )

१)लोणच्यासाठी कैऱ्या कापल्यावर काय चेक केले पाहिजे?

लोणच्यासाठी कैऱ्या कापल्यावर त्या आतून पांढऱ्या व करकरीत असायला हव्यात. जर कैऱ्या आतून पिवळसर असतील तर लोणच्याच्या फोडी मऊ पडण्याची शक्यता असते. तसेच लोणच्याच्या फोडींच्या वर तेल तरंगले पाहिजे. जर तेल कमी झाले असेल तर थोडे तेल गरम करून थंड करून टाकावे. 

 

२)लोणचे तयार झाल्यावर तेल कमी असेल तर काय करावे?

लोणचे तयार झाल्यावर जर तेल कमी झाले असेल तर थोडे तेल गरम करून थंड करून टाकावे.

३) लोणचे बनवताना कोणती काळजी घेतली पाहिजे?


लोणचे बनवताना सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून आणि मग कोरड्या फडक्याला व्यवस्थित पुसून घ्याव्यात. तसेच लोणचे शक्यतो काचेच्याच बरणीत ठेवावे. लोणचे ज्या बरणीत ठेवायचे आहे ती बरणीसुद्धा व्यवस्थित कोरड्या फडक्याला पुसून घ्यावी. चुकून थोडे जरी काही ओले राहिले तर लोणच्याला बुरशी येऊन ते खराब होण्याची शक्यता असते म्हणून ही काळजी घ्यावी.

मी केलेली एक छोटीशी कविता 

एकदा जरूर ट्राय करून पहा हे कैरीचे लोणचे

तुमच्या आमच्या सर्वांच्याच आहे हे आवडीचे

 

जेवणालाही येईल मग चव अजून थोडी

जेव्हा पानात असतील लोणच्याच्या फोडी

 

लोणचे तयार करून ठेवा एकदाच वर्षभराचे

फिरायला कुठेही जाताना बरोबर घेऊन जायचे

फक्त लोणचे घालतांना घ्या योग्य ती काळजी 

मग नाही येणार लोणच्याला कोणतीही बुरशी 

तर आज मी तुम्हाला कैरीचे लोणचे कसे तयार करावे ( Kairiche Lonche In Marathi) याची रेसिपी सांगितली मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow