हनुमान आजही जिवंत आहेत, हे आहेत त्यांच्या जिवंत असण्याचे पुरावे..आजही याठिकाणी एक वानर अशा पद्धतीने..

रामायणामध्ये असा उल्लेख आहे की, श्रीराम पृथ्वी सोडून जाई पर्यंत हनुमानजी अयोध्येमध्ये श्रीरामांची सेवा करत राहिले. ..............

हनुमान आजही जिवंत आहेत, हे आहेत त्यांच्या जिवंत असण्याचे पुरावे..आजही याठिकाणी एक वानर अशा पद्धतीने..

रामायणामध्ये असा उल्लेख आहे की, श्रीराम पृथ्वी सोडून जाई पर्यंत हनुमानजी अयोध्येमध्ये श्रीरामांची सेवा करत राहिले. श्रीराम आयोध्या सोडून गेल्यानंतर हनुमानजी जंगलात वास्तव्य करू लागले. त्यावेळी त्रेतायुग सं पले आणि द्वापार युग चालू झाले. रामायण घडून गेल्यानंतर हनुमानजी कुठे गेले हा प्रश्न तर सर्वांनाच पडलेला आहे.

पण हे मात्र अंतिम सत्य आहे की ते चिरंजीव आहेत. अफाट आणि ब लाढ्य शक्ती असणाऱ्या हनुमानजी ना अमरत्वाचे वरदान मिळाले होते. त्यामुळे ते कलियुगाच्या शेवटपर्यंत जि वंत असतील. असे त्यांना वरदान मिळालेले आहे. हनुमानजी जि वंत असल्याचे पुरावे आणि ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत.

द्वापार युगात घडलेल्या या दोन गोष्टी हनुमांजी जि वंत असल्याचे पुरावे देतात. तर पहिली घटना अशी की, संपूर्ण महाभारताच्या यु द्धात हनुमान जी अर्जुनाबरोबर त्याच्या रथात ध्वजाच्या रुपात राहिले होते. महाभारताचे यु द्ध झाल्यानंतर हनुमानजी आपल्या मूळ स्वरूपात प्रकटले. आणि त्यानंतर तो रथ सुद्धा भस्मसात झाला.

अर्जुनाने याचे कारण विचारले असता श्रीकृष्णांनी सांगितले, ते हनुमान जी होते म्हणून या रथाला काहीही झाले नाही. नाही तर इतक्या वि ध्वंसक अ स्त्रांचा समोर हा रथ उभा राहिला नसता. हनुमानजी यांची बलाढ्य ताकद आणि शक्तीमुळे या रथाला काही झाले नाही.

एक घटना अशी सांगतात की, एकदा भीम जंगलांमधून जात असताना त्याला एक म्हातारे वानर वाटेत पडलेले दिसले. भीमाने त्याला वाटेतून बाजूला होण्यास सांगितले परंतु तो वानर ऐकायला तयार नव्हता. तूच माझी शेपूट बाजूला कर आणि जा असे तो वानर म्हणाला. त्यानंतर भीम त्याची शेपूट बाजुला करण्याचा प्रयत्न करू लागला.

गर्विष्ठ झालेल्या भीमने सर्वतोपरी प्रयत्न करून सुद्धा त्याला त्या वानराची शेपटी बाजूला करता आली नाही. त्यावेळी भीमच्या लक्षात आले की तो सर्वसामान्य वानर नाही तर ते हनुमानजी आहेत. यानंतर भीमाचे गर्वहरण झाले. भीमचा गर्विष्ठपणा दूर करण्यासाठी हनुमानजी तेथे आले होते.

14 व्या शतकामध्ये ऋषी माधवाचार्य यांनी देखील हनुमानजी भेटल्याचा दावा केला होता. तसेच तेराव्या शतकामध्ये तुलसीदासजींनी देखील असे सांगितले होते की, रामचरित मानस लिहिण्यासाठी हनुमानजी यांनी त्यांना प्रेरित केले होते. यानंतर सुद्धा अनेक ऋषींनी हनुमानजी भेटले होते असा दावा केला होता.

कंबोडिया मध्ये देखील हनुमानजींच्या कथा ऐकायला मिळतात. तसेच आफ्रिकेपासून ते अमेरिकेपर्यंत आज सुद्धा बलाढ्य वानर जि वंत असल्याची चर्चा आहे. आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी मोठ्या पावलांचे ठसे पाहायला मिळाले आहेत. यावरून शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, हे ठसे हा मोठ्या बलाढ्य प्राण्याचे आहेत. ज्याचे श रीर मोठे असेल. जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये असे मोठ्या पावलांचे ठसे पाहायला मिळालेले आहेत.

असे म्हणतात की जेव्हा श्रीराम मानवी श रीर सोडून गेले, तेव्हा हनुमान यांनी आयोध्या सोडून श्रीलंकेच्या जंगलामध्ये श्रीराम यांच्या स्मरणार्थ पीदारू पर्वतावर गेले. तेथे त्यांच्या भक्तांनी त्यांची खूप सेवा केली. त्यांची श्रद्धा आणि भक्ती याच्यावर खुश होऊन हनुमानजी यांनी त्यांना असे वचन दिले की, प्रत्येक 41 वर्षांनी ते स्वतः त्यांच्या कुळात राहायला येतील.

तसेच कोणत्याही हनुमान मंदिराच्या आसपासच्या परिसरात तुम्हाला वानरे पाहायला मिळतील. आणि हे अगदी खरे आहे. आपण देखील हे पाहतोच की प्रत्येक हनुमान मंदिराच्या आसपास आपल्याला वानरे पाहायला मिळतात. या सर्व पुराव्यांवरून आजही हनुमानजी जि वंत आहेत असे आपल्याला समजून येईल.