चिंचेचे पंचामृत
पंचामृत रेसिपी : गणपती,गौरी किंवा अजून काही कार्यक्रम असेल तर आपल्याला स्वयंपाकात बरेच पदार्थ करावे लागतात. मग तेचतेच चटणी,कोशिंबीर खाऊन कंटाळा आला असेल तर जोडीला हे पंचामृत करावे. याने तुमच्या तोंडाला छान चव येईल. आज मी तुम्हाला पंचामृत कसे करावे याची रेसिपी सांगणार आहे मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल.

चिंचेचे पंचामृत रेसिपी :
साहित्य :
चिंच - १/२ वाटी
गूळ - १/२ वाटी
खोबऱ्याचे पातळ तुकडे - १/४ वाटी
हिरव्या मिरच्या - १०
सुके खोबरे - १ टेबलस्पून
पांढरे तीळ - १ टेबलस्पून
चवीपुरते मीठ
थोडेसे काजूचे तुकडे
हळद - १/४ चमचा
शेंगदाण्याचे कूट - १/२ चमचा
फोडणीचे साहित्य:
पाव टीस्पून मोहरी,पाव टीस्पून जिरे,थोडेसे मेथीचे दाणे,हळद,१ टेबलस्पून तेल
कृती:
सर्वप्रथम खोबरे व तीळ निरनिराळे खमंग होईपर्यंत गुलाबी रंगावर भाजून घ्यावेत. नंतर ते मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. नंतर तेल तापवून घ्यावे आणि फोडणी करावी.
फोडणीमध्ये मोहरी,जिरे,हळद आणि मेथी दाणे आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घालाव्यात. त्यानंतर त्यात खोबऱ्याचे पातळ तुकडे घालावेत. त्यानंतर त्यात चिंचेचा कोळ,गूळ,मीठ,खोबरे व मिक्सरमध्ये वाटलेले वाटण व दाण्याचे कूट घालावे. नंतर थोडे पाणी घालून चांगले शिजू द्यावे. नंतर दाटसर झाल्यावर गॅस बंद करावा. नंतर सजावटीसाठी काजूचे तुकडे घालावेत. अशा पद्धतीने पंचामृत तयार.
मी केलेली एक छोटीशी कविता
पंचामृत आहे खूपच चटपटीत आणि चविष्ट
एकदा खाऊन तर बघा किती आहे हे स्वादिष्ट
एकदा खाल्ल्यावर राहील त्याची चव तोंडावर
काढाल नाव लगेचच तुम्ही ते खाल्ल्यावर
रोजच्या त्याचत्याच जेवणात थोडेसे वेगळेपण
आवडेल तुम्हालाही हे पंचामृत असलेले जेवण
महत्वाची प्रश्नोत्तरे (Frequently Asked Questions)
१)पंचामृतमध्ये दाण्याचे कूट ऐवजी शेंगदाणे घातले तर चालेल का?
होय,प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे शेंगदाणे किंवा दाण्याचे कूट घालावे.
२)पंचामृत नैवेद्याला चालते का?
होय,पंचामृतमध्ये कांदा किंवा लसूण नसल्यामुळे नैवेद्याला चालू शकते.
तर आज मी तुम्हाला पंचामृत कसे तयार करावे याची रेसिपी सांगितली मला खात्री आहे की ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
What's Your Reaction?






