मुलांनी दूध प्यावे म्हणून काही सोपे आणि परिणामकारक मार्ग

मुलांनी दूध प्यावे म्हणून काही सोपे आणि परिणामकारक मार्ग

मुलांना योग्य खाण्यापिण्याच्या सवयी लावताना बऱ्याच पालकांना, मुले दूध पीत नाहीत ही समस्या असते.आपल्या मुलाला दुधाची आवड नसल्यास हे आवश्यक आहे की, आपल्या मुलास योग्यरित्या दूध पिण्यास मदत करण्यासाठी असे काही मार्ग आहेत.

बरीच मुले दूध पिण्याचा कंटाळा का करतात?

बरीच मुले दूध पिण्याचा कंटाळा का करतात?

बऱ्याच पालकांना हे कळत नाही की आपले मूल दुधाचा तिरस्कार का करू लागले आहे? जेव्हा की ह्याच त्यांच्या मुलाला, बाळ असताना स्तनपान खूप तीव्रतेने आवडत असे, किंबहुना स्तनपान सोडवून फॉर्मुला आधारित किंवा गायीच्या दुधाची सवय करण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागले असतील हो ना? तोच बाळ मोठा झाला की दुधाचा द्वेष का करू लागतो? हा प्रश्न अनेक पालकांना पडणे साहजिक आहे. हे प्रामुख्याने स्वादांच्या मोठ्या फरकाच्या कारणाने आहे. बाळ नेहमी आईच्या दुधाची तुलना गाईच्या किंवा फॉर्मूलाधारित दुधाशी करते. आईच्या दुधाला एक विशिष्ट चव, रंग आणि वास असतो तो इतर वरच्या दुधामध्ये नसतो.

मुलांनी दूध पिणे का महत्वाचे आहे?

दूध पिण्याचे महत्व प्रत्येक हॉस्पिटल मध्ये सांगितले जाते तसेच प्रत्येक पालकांच्या दृष्टीनेसुद्धा त्यांच्या लहान मुलाच्या वाढीसाठी ते एक महत्वाचे कार्य आहे. ह्यास अपवाद फक्त लॅक्टोस इंटॉलरन्ट मुले आहेत.

 • डॉक्टर्स नेहमी सल्ला देतात की प्रत्येक मुलाने दूध पिणे आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. त्यामुळे वाढीसाठी आवश्यक पोषण मूल्य मिळतात. मुख्य घटक म्हणजे कॅल्शिअम, जो की हाडांच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे.
 • मुलांना लगेच चौरस आहार घेण्याची सवय लागत नाही. त्यामुळे कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम आणि इतर पोषणमूल्यांची कमतरता होण्याची शक्यता खूप जास्त असते. अशा परिस्थितीत ही कमतरता भरून काढण्यासाठी दूध हा सर्वोत्तम पर्याय आहे, कारण ह्या सर्व पोषणमूल्यांचा दूध उत्तम स्त्रोत आहे.
 • गाईचे ताजे दूध हे कमी प्रक्रिया केलेले असते. “पाश्चरायझेशन” ही एकच प्रक्रिया त्यावर केली जाते, ह्या प्रक्रियेद्वारे दुधातील हानिकारक विषाणू काढून टाकले जातात व दुधातील पोषणमूल्य अबाधित राहतात.
 • दूध नैसर्गिक आहे, आणि त्यातील सगळी पोषणमूल्ये ही नैसर्गिक असतात. त्यामध्ये कुठलाही कृत्रिम पदार्थ नसतो आणि दुधाचे पोषणमूल्य वाढवण्यासाठी वरून कुठलाही पदार्थ घालण्याची जरूर नसते. त्यामुळे आपल्या मुलासाठी दूध हे सर्वात सुरक्षित अन्न आहे.
 • सकाळी दूध पिणे ही सवय फार पूर्वीपासून प्रचलित आहे. दुधातील प्रथिने दिवसभर कार्यरत राहण्यासाठी ऊर्जा देतात. त्यामुळे मुलांच्या न्याहारी मध्ये दुधाचा समावेश असलाच पाहिजे.

तुमच्या मुलांना दूध पिण्याची सवय कशी लावाल?

तुमच्या मुलांना दूध पिण्याची सवय कशी लावाल?

तुमच्या मुलांना दूध पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी काही तंत्र आणि युक्त्या आहेत, ज्या तुम्ही वापरू शकता आणि ज्यामुळे मुलांना पुन्हा दूध आवडायला लागेल.

 • मुलांना दुग्धजन्य पदार्थ देण्यास सुरुवात करा. आणि त्यांना चवीची ओळख होऊ द्या. दूध, दही, चीझ ह्यामुळे त्यांना पोषण मिळतेच पण दूध पिण्यास सुद्धा मुले तयार होतात.
 • साधं दूध देण्याऐवजी, मुलांना मिल्कशेक्स किंवा स्मूदी तयार करून द्या. विशिष्ट फ्लेवरमुळे मुलांना ते प्यावंसं वाटेल.
 • बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॉ आणि मग्स मिळतात. त्यावर तुम्ही मुलाचे नाव किंवा एखाद्या सुपरहिरोचे चित्र छापून घेऊ शकता.
 • दुधाचा वास मुलांना आवडत नसेल तर तुम्ही थोडा व्हॅनिला इसेन्स, सुका मेवा पावडर घालून तुम्ही देऊ शकता. मुलांना असे दूध पिण्यास आवडेल.
 • तुमच्या मुलाला दूध पिणे हे त्याचे काम आहे असे शिकवा. त्याला स्वतःचे स्वतः दूध करून पिण्यास सांगा.
 • तुमच्या मुलासोबत त्याच्या कार्यकालात सहभागी व्हा. काही दिवस तुम्ही कॉफी किंवा चहा पिणे बंद करून मुलांसोबत दूध पिणे सुरु करा.
 • दूध पूर्ण ग्लास भरून देऊ नका. सुरुवातीला थोडे थोडे द्या आणि त्यांना पटकन संपवायला सांगा.

तुमच्या मुलासाठी दूध चविष्ट कसे कराल?

वेगवेगळ्या फ्लेवर चे दूध मुलांना करून दिल्यास त्यांना त्याची ओळख होऊन मुले पुन्हा नव्याने दूध पिऊ लागतात. तुम्ही अशा मार्गांचा अवंलब करू शकता आणि तुमच्याही मुलाचे दूध चविष्ट करा.

१. तापमान

तुम्ही नेहमी आपल्या मुलास गरम दूध देत असाल तर, छान थंड मिल्कशेक देऊन पहा.

२. दुधासोबत बिस्किटेही द्या

आपल्या मुलाच्या दुधाच्या कपासोबत त्याला आवडणारी बिस्किटेसुद्धा ठेवा. ती त्यांना दुधात बुडवून खायला सांगा.

३. स्मूदीस

तुमच्या मुलाचे आवडीचे फळ दुधात घालून मिक्सर मध्ये फिरवून आपल्या मुलाला द्या, ही आवडती स्मूदी आपलं मूल पट्कन पिऊन टाकेल.

४. कॉर्नफ्लेक्स

वेगवेगळ्या प्रकारचे कॉर्नफ्लेक्स दुध आणि साखर घालून मुलांना दिल्यास हा न्याहारी साठी चांगला पर्याय ठरू शकतो तसेच जरूरीपुरते दूधही त्याच्या पोटात जाईल.

५. मिल्क लॉलिपॉप्स

मिल्कशेक्स तयार करून वेगवेगळ्या आकाराच्या साच्यामध्ये घालून फ्रिज मध्ये ठेवा. तुमच्या मुलांना स्नॅक च्या वेळेला हे लॉलिपॉप्स देऊन आश्चर्यचकित करा.

आपल्या मुलाला दूध पिण्याची सवय कशी लागेल हे अनेक पालकांसाठी एक प्रकारचे आव्हानच आहे. काही युक्त्या वापरून तसेच त्यांच्यासोबत काही क्रियाकल्पांमध्ये भाग घेऊन तुम्ही त्यांना दुधाचा आनंद घेण्यास मदत करू शकता.