मुलांच्या डोक्यातील उवांसाठी १५ घरगुती उपाय

मुलांच्या डोक्यातील उवांसाठी १५ घरगुती उपाय

लक्ष न दिल्यास मुलांच्या केसांमध्ये उवांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सतत खाजवणारे डोके आणि त्यानंतर होणार दाह यामुळे, आपल्या मुलास घर किंवा शाळेत दैनंदिन क्रिया शांततेत करणे कठीण जाईल. खूप वेळ घराबाहेर राहिल्याने आणि उवा झालेल्या मुलांच्या सान्निध्यात आल्याने हा संसर्ग होतो. जर आपल्या मुलाच्या स्काल्पवर उवांची अंडी आढळली तर आपल्या मुलाच्या डोक्यात उवा झाल्या असल्याचे ते चिन्ह आहे. डोक्यातील उवांसाठी नैसर्गिक उपायांबद्दल आपल्याला माहित असाव्यात अशा सर्व गोष्टी येथे आहेत.

पालक मुलांच्या डोक्यातील उवांचा प्रश्न हाताळताना घरगुती उपाय का निवडतात?

जरी आपण डॉक्टरांकडे जाऊन उवांवर इलाज करणारी औषधे लिहून आणलीत तरीही बरेचसे पालक ती औषधे वापरणे टाळतात कारण त्यांचे दुष्परिणाम खूप आहेत. डोक्यातील उवांसाठीचे घरगुती उपचार उवांवर नैसर्गिकरित्या काम करतात. स्काल्पचे आरोग्य चांगले राखले जाते.

डोक्यातील उवांपासून मुक्त होण्यासाठीचे १५ प्रभावी घरगुती उपाय

छोट्या बाळांमधील आणि मुलांमधील उवांच्या समस्येवर १५ प्रभावी घरगुती उपाय आहेत. हे वापरून पहा आणि आम्हाला खात्री आहे की आपले मूल आनंदी होईल.

१. व्हिनेगर

शुद्ध व्हिनेगर वापरा आणि हळूवारपणे आपल्या मुलाच्या केसांवर लावा. थोडा वेळ तसेच ठेवून, त्यांचे केस साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. आपण या उपचारांसाठी सफरचंद व्हिनेगर देखील वापरू शकता. केस धुतल्यानंतर मृत उवा आणि अंडी कंगव्याने केस विंचरून काढून टाका.

२. ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइल आपल्या मुलाच्या स्काल्पमध्ये लावा. ऑलिव्ह ऑइल मुळे उवांना श्वास घेणे कठीण होते त्यामुळे गुदमरून त्या मरून जातात. १५-२० मिनिटांनंतर मृत उवा कंगव्याने विंचरून बाहेर काढा आणि केस शाम्पूने स्वच्छ धुवा. उवांचा संपूर्णपणे नायनाट होईपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा आणि प्रत्येक सत्रानंतर मुलांचे कपडे धुण्याची काळजी घ्या.

३. टी ट्री ऑइल

डोक्यातील उवा आणि अंडी घालवण्यासाठी हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. फक्त टी ट्री तेल थोड्या पाण्यात घालून ते स्प्रे च्या बाटलीत भरा. आपल्या मुलाच्या डोक्यावर स्प्रे करा आणि डोके थोडावेळ टॉवेलने झाकून ठेवा. टॉवेल काढा आणि केस नीट काळजीपूर्वक धुवा. सर्वोत्तम परिणामांसाठी ही कृती आठवड्यातून दोनदा  करा. आपण आपल्या मुलाच्या शाम्पू मध्ये सुद्धा हे तेल घालू शकता किंवा नैसर्गिकरित्या उवा आणि त्यांच्या अंड्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण हे तेल ऑलिव्ह ऑइलमध्ये घालू शकता.

४. लसूण

उवा लसणीचा तिरस्कार करतात, आणि आपण लसूण वापरून त्यांना मारून टाकू शकता. फक्त लसणीच्या ८ किंवा १० पाकळ्या लिंबाच्या रसात मिसळून त्याची पेस्ट करा, आपल्या मुलाच्या डोक्यावर लावा. ते ३० मिनिटे राहू द्या आणि डोके गरम पाण्याने धुवून काढा.

५. पेट्रोलियम जेली

पेट्रोलियम जेली उवांचे डोक्यात फिरणे थांबवते आणि प्रतिबंधक म्हणून कार्य करते. आपल्या मुलांच्या स्काल्पवर पेट्रोलियम जेलीचा जाड थर लावा आणि झोपायला जाण्यापूर्वी डोक्याला टॉवेल किंवा शॉवर कॅप लावून रात्रभर ठेवा. जेव्हा मुलं सकाळी उठतील तेव्हा डोक्याला तेल लावून केस कंगव्याने विंचरून मृत उवा आणि लिखा काढून टाका.

६. केसांचे ड्रायर

आपल्या मुलाच्या डोक्यामधून उवा घालवण्याचा जलद आणि खात्रीशीर मार्ग म्हणजे हेअर ड्रायर वापरणे होय. ही कृती घराबाहेर करावी कारण उवा घरामध्ये पसरण्याची शक्यता असते आणि लहान मुलांसाठी हा उपाय करणे टाळावे कारण गरम हवा त्यांच्या डोक्यासाठी चांगली नव्हे.

७. कांद्याचा रस

कांदे उपयोगी नाहीत असे कोण म्हणते? घरी कांद्याचा रस बनवा आणि आपल्या बाळाच्या डोक्याला सुमारे ३ ते ४ तास लावून ठेवा. मृत उवा आणि लिखा कंगव्याने केसांमधून काढून टाका आणि केस शाम्पूने धुवून टाका. सर्वोत्तम परिणामांसाठी दर ३-४ दिवसांनी हे पुन्हा करा.

८. मॅश केलेले सफरचंद

अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. आपण आपल्या मुलाच्या स्काल्पवर मॅश केलेल्या सफरचंदांचा वापर करू शकता आणि उवा नष्ट होण्यासाठी काही तासांपर्यंत डोक्यावर ते तसेच ठेवा. नंतर शाम्पूने केस स्वच्छ धुवून टाका.

९. मेयोनेझ

आपल्या मुलाच्या डोक्यावर मेयोनेझ लावून ठेवा आणि रात्रीच्या झोपण्याच्याआधी शॉवर कॅप लावून ठेवा. शॅम्पूने दुसऱ्या दिवशी सकाळी केस स्वच्छ धुवा आणि कंगव्याने विंचरून मृत उवा बाहेर फेकून द्या.

१०. नारळ तेल

नारळाचे तेल घ्या आणि आपल्या मुलाच्या डोक्यावर भरपूर लावा. दोन तासांपर्यंत शॉवर कॅपसह ते अखंड ठेवा आणि नंतर कंगव्याने मृत उवा आणि अंडी काढून टाका. शाम्पू आणि कंडिशनर वापरून केस स्वच्छ धुवा आणि केस कोरडे झाल्यानंतर पुन्हा एकदा ही कृती करा. झोपायला जाण्यापूर्वी आणि रात्रीच्या वेळीही तेल तसेच राहू द्या sito web dell’azienda. पुन्हा केस कंगव्याने केस विंचरून स्वच्छ धुवा आणि आठवड्यातून दोनदा या उपचारांची पुनरावृत्ती करा.

११. नीम तेल

आपल्या मुलाच्या नियमित शैम्पूमध्ये लिंबूवर्गीय तेलाचे काही थेंब घाला आणि अंघोळीच्या वेळी केस चांगल्या प्रकारे धुवा. केसांचे छोटे भाग करा आणि मृत उवा काढून टाकण्यासाठी फणीने चांगले विंचरून घ्या. उवांचा डोक्यातील उपद्रव कायमचा घालवण्यासाठी नीम तेल घातलेला शाम्पू नियमितपणे वापरला पाहिजे.

१२. बेन्झिल अल्कोहोल

सहा महिन्यांहून अधिक वयाच्या मुलांसाठी, आपण त्यांच्या स्काल्पवर बेंझिल अल्कोहोल लावू शकता आणि मृत उवा काढण्यासाठी एखाद्या बेसिनमध्ये साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवा. केस कंगव्याने विंचरून घ्या आणि कोरडे करा. स्काल्पवर राहिलेल्या अंड्यांमधून बाहेर पडलेल्या उवांना मारण्यासाठी एका आठवड्यानंतर हे पुन्हा करा.

१३. निलगिरी तेल

जर उवा रासायनिक उपचारांना प्रतिरोधक असेल तर ऑलिव ऑइल मध्ये १५ ते २० थेंब नीलगिरीचे तेल घाला आणि ते डोक्याला लावा. रात्रभर डोक्याला शॉवर कॅप लावून ते तसेच ठेवा. सकाळी कंगव्याने केस विंचरून उवा काढून टाका. डोके स्वच्छ धुवून केस कोरडे करा.

१४. मीठ आणि व्हिनेगर मिश्रण

आपल्या मुलाचे डोके उवामुक्त हवे असेल तर आपण मीठ आणि व्हिनेगर ह्या मिश्रणाचा वापर करू शकता. मीठ एक एन्टीसेप्टिक आहे तर व्हिनेगर अंड्याना केसांवर चिकटून राहण्यास प्रतिबंध करते. मीठ आणि व्हिनेगर चे मिश्रण एका स्प्रे बाटली मध्ये भरून ठेवा आणि केसांवर स्प्रे करा. नंतर केस धुवून घ्या.

१५. बेकिंग सोडा

उवांची श्वसन प्रणाली थांबवून त्यांना मारण्यासाठी,१ भाग बेकिंग सोडा आणि ३ भाग केस कंडिशनर असे मिश्रण तयार करा. हे मिश्रण केसांना लावा. थोड्या वेळाने केस कंगव्याने विंचरून घ्या. मऊ टिशू पेपरने कंगव्यात आलेले मृत उवा, अंडी पुसून घ्या. एकदा आपले कार्य पूर्ण झाल्यावर शाम्पूसह स्वच्छ धुवा आणि पूर्ण उवा काढण्यासाठी आगामी दिवसात हे पुन्हा पुन्हा करा.

या सोप्या परंतु प्रभावी घरगुती उपचारांचा प्रयत्न करा आणि लवकरच आपल्या मुलाला उवांच्या जंतुसंसर्गांमुळे पीडा होणार नाही. सर्वोत्तम परिणामांसाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे उपाय करा. तथापि, यापैकी काही उपाय दररोज सुद्धा केले जाऊ शकतात.