दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी

दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी

दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शृकवार दिनाक  १७ जून २०२२ रोजी दुपारी १ वाजता आँनलाईन जाहीर होणार आहे. दहावीच्या परीक्षा संपल्यानंतर जवळपास ७४ दिवसांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे निकाल जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून निकालाची वाट पाहण्यारे लाखो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची अखेर प्रतिक्षा संपणार आहे.

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल आँनलाईन पाहता येणार आहे.निकालात सर्व विद्यार्थ्यांना विषय निहात संपादित केलेले एकुण गुण संकेतस्थळावर उपलब्ध होतील आणि त्यांची प्रिंटही विद्यार्थ्यांना घेता येईल त्या मुळे विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून प्रतिक्षा अखेर आज दुपारी १ वाजता संपणार आहे. परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन.