गर्भधारणा: २०वा आठवडा

तुम्ही तुमच्या गर्भावस्थेच्या मध्यापर्यंत आला आहात. ह्या आठवड्यात तुम्हाला लक्षात येईल की तुमचं बाळ आता पोटात हालचाल करू लागले आहे आणि पाय सुद्धा मारू लागले आहे. तथापि तुमच्या गर्भाशयात पुरेशी जागा आहे जिथे तुमचे बाळ मस्त विहार करू शकते आणि तुम्ही ते अनमोल क्षण अनुभवू शकता. इथे काही सूचना आहेत तसेच गर्भावस्थेच्या २०व्या आठवड्यात तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा तुम्हाला इथे मिळतील.
गर्भारपणाच्या २०व्या आठवड्यातील तुमचे बाळ
आता तुमचे वजन ४ किलोंनी वाढलेले असेल आणि इथून पुढच्या येणाऱ्या आठवड्यांमध्ये तुमचे वजन दर दोन आठवडयांनी १ किलोने वाढणार आहे. जर तुमचा गर्भ मुलीचा असेल, तर तिचे गर्भाशय आतापर्यंत पूर्णपणे विकसित झालेले असेल, आणि तिच्या गर्भाशयात लाखो स्त्रीबीजे तयार होत आहेत. जर तुमचा गर्भ मुलाचा असेल तर त्याचे अंडकोश ओटीपोटातून खाली विकसित होण्यास सुरुवात होईल आणि ही प्रक्रिया २ आठवड्यात पूर्ण होईल. तुमच्या बाळाने जास्त प्रमाणात गिळण्यास सुरुवात केली आहे आणि त्यामुळे तुमच्या बाळाची पचनसंस्था परिपक्व होईल. याच वेळी बाळ मल तयार करते, बाळाचे मल म्हणजे एक काळा चिकट पदार्थ असतो आणि बाळ ते आतड्यामध्ये साठवून ठेवते. बाळाचे दुधाचे दात आता तयार असतात आणि कायमचे दात तयार होण्यास सुरुवात होते. बाळ गर्भजलात बराच काळ असल्याने ते वर्निक्स नावाच्या तेलकट पदार्थाने आच्छादित असते, त्यामुळे बाळाच्या त्वचेचे संरक्षण होते.
बाळाचा आकार केवढा असतो?
गर्भारपणाच्या २०व्या आठवड्यात तुमच्या बाळाचा आकार हा १६-१७ सेंमी इतका असतो आणि वजन साधारणपणे ३०० ग्रॅम्स असते. आतापर्यंत बाळाचा आकार डोक्यापासून कुल्ल्यांपर्यंत मोजला जात होता, कारण बाळाचे पाय छातीशी मुडपलेले असतात. परंतु २०व्या आठवड्यात बाळाचा आकार डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत मोजणे सोपे जाते.
शरीरात होणारे बदल
गर्भारपणाच्या २०व्या आठवड्यात नेहमीपेक्षा तुमच्या शरीरात जास्त बदल झालेले तुम्हाला आढळतील.
- सूज: शरीर पाणी धरून ठेवत असल्यामुळे तुमच्या पायांना सूज येईल.
- घोरणे: वाढलेल्या इस्ट्रोजेन च्या पातळीमुळे नाकाच्या आतील आवारणास सूज येते आणि तुम्ही घोरू लागता.
- अगदी लक्षात येण्याजोगा वाढलेला पोटाचा घेर:२० व्या आठवड्यात लोकांच्या लक्षात येईल की तुम्ही गरोदर आहात.
- केस आणि नखांची वेगाने होणारी वाढ: संप्रेकारांमुळे तुमच्या केसांची आणि नखांची वाढ जलद होते.
- योनीमार्गातील स्त्राव: योनिमार्गामध्ये जास्तीत जास्त स्त्राव निर्मिती होण्यास सुरुवात होईल कारण त्यामुळे योनीमार्गाच्या आजूबाजूच्या भागाचे हानिकारक जिवाणूंपासून संरक्षण होईल.
२०व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे
फक्त सोबत घेऊन येणारे आव्हानात्मक प्रश्न सोडले तर गर्भावस्थेच्या ह्या टप्प्यावर पोहचणे म्हणजे एक मोठी गोष्ट आहे. आता तुमच्या शरीरात होणाऱ्या बदलांसोबतच काही नवीन लक्षणांची अनुभूती तुम्हाला येईल.
- खूप जास्त ऊर्जा: तुमच्या शरीरातील संप्रेरकांमधील बदलांमुळे तुमची ऊर्जा खूप जास्त प्रमाणात वाढेल त्यामुळे तुम्हाला शारीरिक संबंधांची ईच्छा होईल.
- श्वासोच्छवासास त्रास: जसजशी गर्भाची वाढ होते, तसतसे गर्भाशयाचा दाब फुफुसांवर पडतो आणि त्यामुळे श्वास घेण्यास जास्त श्रम लागतात.
- हात व पायांमध्ये पेटके येणे: तुमच्या हातापायांची लवचिकता कमी होते.
- अपचन आणि जळजळ: पचनसंस्थेवर दाब पडल्याने अपचन आणि जळजळ होते आणि त्यामुळे रात्रीची झोप लागणे मुश्किल होते.
संप्रेरकांच्या बदलांमुळे अगदी कमी प्रमाणात डोकेदुखी होऊ शकते, परंतु जर तुम्हाला प्रचंड डोकेदुखी, पोटदुखी, मळमळ होत असेल किंवा धूसर दिसत असेल तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांना फोन करा कारण ते प्रीक्लॅम्पसिया किंवा उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते.
गर्भधारणेच्या २०व्या आठवड्यात पोटाचा आकार
२० व्या आठवड्यात तुमचे गर्भाशय तुमच्या बेंबीला समांतर असते आणि गर्भाशयाचा व्यास १८-२४ सेंमी इतका असतो. गर्भाशय बाहेरचे दिशेने प्रत्येक आठवड्यात १-२ सेंमी वाढते. ह्यामुळे तुमच्या सांध्यांवर आणि अस्थिबंधनांवर दाब येतो त्यामुळे तुमचे डॉक्टर तुम्हाला “रेलॅक्सिन ” हे संप्रेरक लिहून देऊ शकतात त्यामुळे ताण कमी होतो. जर तुम्हाला ओटीपोटाच्या भागात किंवा जांघ्यांमध्ये वेदना जाणवल्या तर तात्काळ तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा, कारण ते मोठ्या प्रश्नाचे लक्षण असू शकते.
गर्भधारणेच्या २०व्या आठवड्यातील सोनोग्राफी
गर्भावस्थेच्या मध्यावर सोनोग्राफी करण्याची ही योग्य वेळ आहे. ह्या स्कॅन मध्ये तुम्हाला हृदय, मेंदू, फुप्फुसे आणि मूत्रपिंडे ह्यांचे अविश्वसनीय असे तपशील मिळतील. तुम्हाला बोटे, अंगठे, नखे, केस, डोळे आणि नाक ह्यांचे तपशील मिळतील. ह्या स्कॅन मध्ये गर्भ मुलीचा आहे की मुलाचा हे सुद्धा कळते अर्थात भारतामध्ये हे जाणून घेणे कायद्याच्या विरुद्ध आहे. ह्या सोनोग्राफी मध्ये नाळेची स्थिती लक्षात येते, तसेच नाळ गर्भाशयाच्या मुखाशी अडथळा तर करत नाही ना हे लक्षात येते आणि जरी तसे असेल तर काळजीचे कारण नाही कारण बाळाची वाढ होताना नाळ पुन्हा आत खेचली जाते.
आहार कसा असावा?
- तुम्हाला काही गोष्टींची नोंद ठेवली पाहिजे त्यापैकी एक म्हणजे तुमचे गर्भाशय, नाळ, आणि गर्भ ह्यांची वेगाने वाढ होत असते. शरीराला लोहाची सर्वात जास्त गरज असते. रक्ताची निर्मिती करण्यासाठी लोहाची गरज असते आणि योग्य प्रमाणात ते घेणे खूप महत्वाचे असते. लोहाचे चांगले स्रोत म्हणजे लाल मांस, परंतु शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन्स, पालक, बीन्स हे पर्याय आहेत.
- तुमच्या बाळाची हाडे मजबूत होत आहेत आणि त्यामुळे तुम्ही योग्य प्रमाणात कॅल्शिअम घेत आहात ना ह्याची सुद्धा खात्री करून घेणे महत्वाचे आहे. दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, चीझ, दही आणि हिरव्या पालेभाज्या, पालक, बीन्स हे कॅल्शिअमने समृद्ध आहेत आणि कॅल्शिअमचे उत्तम स्रोत आहेत.
- गरज भासल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांना व्हिटॅमिन्स आणि खनिजद्रव्ये असलेल्या गोळ्या लिहून देण्यास सांगू शकता. अपचन आणि जळजळ होऊ नये म्हणून एका वेळीच खूप खाण्यापेक्षा तुम्ही थोड्या अंतराने थोडे थोडे खाणे योग्य ठरेल.
काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स
गर्भारपणाच्या २०व्या आठवड्यात काही गोष्टी कराव्यात आणि काही टाळाव्यात, त्या खालीलप्रमाणे
हे करा
- वेदना कमी व्हाव्यात म्हणून नियमितपणे श्रोणी (pelvis) पुढे आणि मागे करत रहा. जर वेदना खूप जास्त असतील तर पुढे झुकून श्रोणी काही सेकंदांसाठी धरून ठेवा, ही प्रक्रिया दिवसातून काही वेळ करत रहा.
- तुमच्या पावलांना सूज आलेली असेल तर सपाट टाचेचे बूट घाला. उंच टाचेचे बूट किंवा खूप घट्ट बूट घालणे टाळा.
- फिजिओथेरपिस्टला नियमित भेट द्या. ते तुम्हाला काही व्यायाम सुचवू शकतात त्यामुळे गर्भारपणात होणारी पाठदुखी, ओटीपोटाचे दुखणे, बरगड्या दुखणे कमी होईल.
हे करू नका
- कुठल्या परिस्थितीत जास्त वजन उचलू नका, पण जर तुम्हाला ते उचलावे लागले तर गुडघ्यात वाकून उचला.
- एकाच पायावर खूप वेळ उभे राहू नका. तुमच्या पाठीला आधार म्हणून पोटाच्या स्नायूंचा वापर करा आणि ताठ उभे राहा.
- खाली बसताना पाठीला उशीने आधार दिल्याशिवाय बसू नका.
कुठल्या गोष्टींची खरेदी कराल
आता तुम्ही बेबी कॅरियर ची खरेदी करू शकता, त्यामध्ये तुम्ही तुमच्या छोट्या बाळाला घेऊन फिरू शकता. तुमच्या बदलणाऱ्या शरीरासाठी स्टायलिश मॅटर्निटी कपड्यांची खरेदी करा.
तुमच्या बाळाची कशी काळजी घ्यावी हे शिकवणाऱ्या क्लास मध्ये नाव नोंदवा कारण चांगल्या क्लास मोठी प्रतीक्षा यादी असते.
योग्य काळजी घ्या आणि तयारी करून ठेवा म्हणजे, गर्भारपणाचा हा काळ बाळाच्या जन्माचा आनंद घेण्याबद्दल जास्त आणि त्याबरोबर येणाऱ्या वेदनांबद्दल कमी असतो, असे आपण म्हणू शकतो.
What's Your Reaction?






