गर्भधारणेचा प्रयन्त करत असताना टाळावेत असे १० अन्नपदार्थ

गर्भधारणेचा प्रयन्त करत असताना टाळावेत असे १० अन्नपदार्थ

एकीकडे, अभ्यास आणि संशोधनाद्वारे असे लक्षात आले आहे की गर्भधारणेसाठी आवश्यक असलेले पोषण आणि आहार स्त्रिया योग्यरित्या घेत नाही. त्याच वेळी, अशी काही उदाहरणे आहेत जेव्हा गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करताना स्त्रियांना अन्नपदार्थांची माहिती नसते. यामुळे प्रजननक्षमतेवर परिणाम होतो किंवा गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते, परिणामी अयशस्वी होण्याची शक्यता असते.

गर्भधारणा होण्यासाठी कुठले अन्नपदार्थ टाळायला हवेत?

हे अतिशय महत्वाचे आहे की, चांगल्या आरोग्यासाठी योग्य पोषणमूल्य आणि आहाराचे वेळापत्रक नीट पाळले पाहिजे. तसेच गर्भधारणेसाठी कुठले अन्नपदार्थ दूर ठेवले पाहिजेत हे सुद्धा समजून घेतले पाहिजे.

इथे काही अन्नपदार्थांची यादी दिली आहे.

१. ट्रान्स फॅट असलेले अन्नपदार्थ

ट्रान्स फॅट असलेले अन्नपदार्थ

होय! जर तुम्हाला गर्भवती होण्याची इच्छा असेल तर सर्वात आधी केक्स, चिप्स, फास्ट फूड्स, आणि चॉकलेट्स आणि ह्यासारख्याच इतर सर्व गोष्टी दूर ठेवल्या पाहिजेत. संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की, ट्रान्स फॅट खाद्यपदार्थांमुळे महिलांमधील प्रजनन क्षमता कमी होते. ट्रान्स फॅट चा प्रजनन क्षमतेवर इतका परिणाम होतो की जर तुम्ही आहारात दररोज २% जास्त ट्रान्स फॅट घेतल्यास प्रजनन क्षमतेवर ७५% परिणाम होतो. ह्या पदार्थांमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी वाढते तसेच वजनही वाढते. त्यामुळे इन्सुलिन निर्मितीवर परिणाम होऊन शरीराच्या जैवरासायनिक क्रियांवर परिणाम होतो.

२. फिल्टर न केलेले पाणी

फिल्टर न केलेले पाणी

तुमच्या घरात स्वच्छ पाण्याचा थेट पुरवठा होत असेल. जरी तुम्हाला पाण्यामुळे काही प्रश्न उद्भवले नसतील तरीही पाण्यात अनेक अशी रसायने असतात, जे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी वापरली जातात तसेच काही जिवाणू सुद्धा ह्या पाण्यात असू शकतात. असे पाणी जास्त प्रमाणात प्यायल्यास तुमच्या शरीरातून जास्त प्रमाणात क्षारांचा ऱ्हास होण्याची शक्यता असते.

३. कर्बोदकांचे आणि साखरेचे जास्त प्रमाण असलेले खाद्यपदार्थ

कर्बोदकांचे आणि साखरेचे जास्त प्रमाण असलेले खाद्यपदार्थ

PCOSअसलेल्या महिला जर गर्भारपणासाठी प्रयत्न करीत असतील तर असे पदार्थ टाळणे अतिशय महत्वाचे आहे. साखर आणि कर्बोदके खूप प्रमाणात असलेले हे पदार्थ, प्रजननासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी आवश्यक असलेले अन्नपदार्थ शरीरातून काढून टाकतात. खूप जास्त साखर आणि कर्बोदके आहारात घेतल्यास इन्सुलिन पातळी कमी होते आणि त्याचा परिणाम महिलांच्या ओव्हरीवर होतो परिणामी त्यांची प्रजनन क्षमता कमी होते. PCOS असलेल्या महिलांना ह्याचा खूप त्रास होतो आणि अनियमित ओव्यूलेशन होते.

४. सोयाबीन असलेले अन्नपदार्थ

सोयाबीन असलेले अन्नपदार्थ

हे जरा वेगळा वाटलं ना? सोयाबीनचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत त्यात काहीच वाद नाही. पण खूप काळापासून असा विश्वास आहे की गर्भधारणेचा विचार करणाऱ्या महिलांनी सोयाबीन पासून दूर राहिले पाहिजे. सोयाबीन मध्ये असे काही रासायनिक पदार्थ आहेत जे इस्ट्रोजेन ह्या संप्रेरकासारखे कार्य करते. तथापि हे रासायनिक पदार्थ शुक्राणूंचा नाश करतात त्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते

५. सॉफ्ट ड्रिंक

सॉफ्ट ड्रिंक

फास्ट फूड सोबत असणारे त्याचे मित्रमंडळी जसे की सॉफ्ट ड्रिंक ना सुद्धा गुडबाय म्हटले पाहिजे. सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये फक्त सोडाच नव्हे तर कॉर्न सिरप पण असते ज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फ्रुक्टोस असते, तसेच विविध संरक्षक पदार्थ आणि विशिष्ठ चव देणारे पदार्थ सुद्धा त्यामध्ये असतात. ह्या सर्व पदार्थांमुळे शरीराकडून खूप जास्त प्रमाणात विषारी द्रव्ये निर्माण केली जातात.

६. काही कच्चे पदार्थ

काही कच्चे पदार्थ

फळं आणि भाज्या पोषणमूल्यं वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे काही फळे आणि भाज्या वर्ज्य केल्या पाहिजेत असे सांगितले तर तुमच्यापैकी काही जणींना आश्चर्य वाटेल.

उदा: मोड आलेली कडधान्ये जसे की मूग आणि इतर ज्यांच्यामध्ये जिवाणू असण्याची शक्यता असते आणि त्यामुळे ते भ्रूणासाठी हानिकारक असते. तसेच पाश्चरायझेशन न केलेले ज्यूस सुद्धा पिणे टाळावेत. शक्यतोवर ऑरगॅनिक फळे आणि भाज्या खाव्यात.

७. वाटाणा

वाटाणा

अजून एक आश्चर्य वाटावं असं नाव, हो ना? जरी फक्त काही डॉक्टर्स आणि आहारतज्ञांना ह्याची माहिती असली तरी, ह्या विषयावर संशोधन चालू आहे. शेकडो वर्षांपूर्वी ज्या महिला नेहमी वाटाणा खात असत त्यांना कमी मुले होत असत. सोयाबीन प्रमाणेच वाटाण्यांमध्ये सुद्धा काही रासायनिक पदार्थ आहेत ज्यांच्यामुळे शुक्राणूंना अडथळा आणतात. नैसर्गिक गर्भनिरोधक म्हणून ते काम करतात.

८. मासे

मासे

मासे निरोगी अन्न आहेत. पण आपल्याकडच्या पाण्यातील मासे निरोगी नाहीत. त्यामध्ये पाऱ्याचे प्रमाण खूप जास्त असते, जे आपल्या शरीरास हानिकारक आहे. काही विशिष्ट प्रकारचे जसे की साल्मन, कोळंबी अशा माशांचा आपल्या आहारात थोड्या प्रमाणात समावेश करा. त्यामुळे तुम्हाला पोषणमूल्ये मिळतील आणि हानिकारक परिणामांपासून तुम्ही दूर रहाल.

९. अंडी

अंडी

चांगल्याप्रकारे उकडलेली अंडी खाल्ल्यास काही हरकत नाही. परंतु कच्चे अंडे किंवा ते कमी शिजवलेलं असेल तर तुम्हाला साल्मोनेला ह्या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो आणि त्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. नेहमीच्या अंड्यामध्ये सुद्धा प्रतिजैविके असण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑरगॅनिक अंड्यांची निवड करा.

१०. चीझ

चीझ

काही काळजी करू नका, तुम्हाला ह्या चवदार पदार्थापासून पूर्णपणे दूर राहण्याची गरज नाही. फक्त पाश्चराइज न केलेल्या दुधापासून बनवलेल्या चीझ पासून दूर रहा. कारण त्यामध्ये जिवाणू असण्याची शक्यता असते. जर असे चीझ खायचे असेल तर खाण्याआधी चांगले शिजवून घ्या.

गरोदर राहणे हे प्रत्येक वेळी जितकं वाटतं तितके सोपे नाही. फक्त संभोगाच्या पलीकडेही त्यासाठी बरेच काही लागते. आपले शरीर नवीन जीवाला सामावून घेण्यासाठी पूर्णपणे सक्षम हवे. प्रजनन सुधारण्यासाठी कुठले अन्नपदार्थ खावेत किंवा टाळावेत हे जर आपल्याला माहित असेल तर गर्भधारणेची शक्यता वाढते.