गरोदरपणाची १० असामान्य चिन्हे आणि लक्षणे

गरोदरपणाची १० असामान्य चिन्हे आणि लक्षणे

जेव्हा तुम्ही बाळाचा निर्णय घेता तेव्हा गरोदरपणाची चिन्हे आणि लक्षणे ह्यांची वाट पहिली जातेचुकलेली पाळीमॉर्निंग सिकनेसस्तनांना सूज येणे ही गर्भधारणेची काही सामान्य लक्षणे आहेतपरंतु गर्भधारणा झाल्याची काही असामान्य लक्षणे देखील आहेतही लक्षणे तुम्ही गर्भवती असल्याचे दर्शवितातगर्भधारणेच्या ह्या असामान्य लक्षणांबद्दल अधिक जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असल्यास तुम्ही हा लेख वाचावा.

गर्भधारणेची १० असामान्य चिन्हे आणि लक्षणे

मानवी शरीर एक जटिल प्रणाली आहे आणि गर्भधारणा त्यात बरेच बदल घडवून आणतेअशा प्रकारेतुम्ही गर्भवती होताचतुमच्या शरीरात विशिष्ट लक्षणे दर्शविण्यास सुरुवात होतेकधीकधी गरोदर स्त्रिया गरोदरपणाची विचित्र चिन्हे दर्शवितातम्हणूनचजर आपणास यापैकी कुठलेही लक्षण आढळले तर तुमच्या उदरात बाळाची वाढ होत असल्याचे कदाचित ते लक्षण असू शकते.

निद्रानाश किंवा कमी झोप

जर तुम्हाला झोपयेणे कठीण झाले असेल किंवा रात्रीची मध्येच जाग येत असेल तर तुम्ही कदाचित तुम्ही गर्भवती असल्याचे ते लक्षण असू शकेलअशावेळी तुम्ही शांत आणि निश्चित राहणे गरजेचे आहेतसेच व्यायाम करा आणि चांगली झोप होण्यासाठी कॅफेनचे सेवन कमी करा.

नाक चोंदणे किंवा नाकातून रक्तस्त्राव

हे आश्चर्य वाटण्याजोगे आहे परंतुकाही गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या सुरुवातीस नाक चोंदणे किंवा नाकातून रक्तस्त्राव होण्याचा त्रास होतोहा त्रास शरीरात ओलावा नसल्यामुळे उद्भवू शकतोएकतर आपण नैसर्गिक उपायांचा वापर ओलावा प्रदान करण्यासाठी करू शकता किंवा त्याबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोलू शकता.

नाक चोंदणे किंवा नाकातून रक्तस्त्राव

गॅस होणे

जर तुम्हाला पोट फुगणे किंवा पोटात वायू होण्याचा त्रास होत असेल तर ते गर्भधारणेचे लक्षण असू शकतेहोयहे शक्य आहेगर्भधारणेमुळे तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि त्यामुळे पोटात गॅसेस होतातजर नेहमीपेक्षा जास्त त्रास होत असेल आणि हे आपण खाल्लेल्या गोष्टीमुळे नसेल तर आपण गर्भधारणा किट घ्यावी आणि स्वतःची चाचणी करून घ्यावीआपल्या पोटाला जास्त त्रास होऊ नये म्हणून वातयुक्त अन्नपदार्थांपासून दूर रहा.

योनीतून वाढलेला स्त्राव

गर्भधारणेदरम्यान योनीतून स्त्राव होणे सामान्य आहे आणि जर आपल्याला हे लक्षात आले की त्यामध्ये वाढ झालेली आहे तर ते तुम्ही गर्भवती असल्याचे सूचित करतेतथापिजर आपल्या योनीतून येणारा स्त्राव दुर्गंधीयुक्त असेल किंवा त्याचा रंग बदलला असेल तर आपल्या स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घेणे चांगले.

शौचास साफ न होणे

गर्भधारणेच्या संप्रेरकांमुळे अवयव मंद आणि सुस्त होताततरआतड्यांसंबंधी हालचालींमध्ये बदल देखील होतातहे गर्भधारणेचे असामान्य लक्षण आहेहळू काम करणाऱ्या आतड्यांमुळे शौचास साफ होत नाही आणि अशा प्रकारे बद्धकोष्ठता होतेआम्ही शिफारस करतो की आपण आपल्या आहारात भरपूर तंतुमय पदार्थांचा समावेश करा आणि आतड्यांच्या हालचाली सुरळीत ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.

शौचास साफ न होणे

तोंडात धातूची चव

काही गर्भवती महिलांना असे वाटते की त्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चघळत आहेतशरीरातील एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या वाढीमुळे असे होते आणि त्याला डायजेसिया म्हणतातह्यामुळे चवीची संवेदना बदलतेतुम्ही थोडे थोडे कोल्ड ड्रिंक घेऊन घेऊन किंवा साखर विरहीत च्युईंगम खाऊन ह्यावर उपाय करू शकताकाही वेळा मसालेदार अन्नपदार्थ सुद्धा खाऊन बघू शकता.

छातीत जळजळ

गरोदरपणातील संप्रेरके अन्ननलिका आणि पोट यांच्यातील झडपांवर परिणाम करतातत्यामुळे अन्ननलिकेत पोटातील आम्ल गळती होते आणि यामुळे छातीत जळजळ होतेतुम्ही थोड्या प्रमाणात आणि नियमित जेवण घेतल्यास ह्याची तीव्रता कमी होऊ शकतेजडमसालेदार आणि चरबीयुक्त पदार्थ आणि कॅफिनेटेड पेय तसेच सॉफ़्टड्रिन्क्स टाळा.

चुकीची मासिक पाळी

मासिक पाळीची तारीख नसली तरीही रक्तस्त्राव अनुभवणे हे गर्भधारणेचे आणखी एक लक्षण असू शकतेजेव्हा रोपण प्रक्रिया होते तेव्हा रक्तस्त्राव होतोरोपणप्रक्रियेमध्ये गर्भाशयाच्या अस्तरांशी गर्भाला स्वतःला जोडले जातेतथापिकाही वेळेला होणारा रक्तस्त्राव हे एक्टोपिक गर्भधारणाग्रीवाला सूज येणे किंवा गर्भधारणासंबंधित इतर गुंतागुंत यांचे लक्षण असू शकते.

स्तनांमध्ये बदल

जर तुमच्या स्तनांचा आकार वाढलेला असेल आणि तुमचे स्तन नाजूक आणि हळुवार झालेले असतील तर ते कदाचित चांगल्या बातमीचे लक्षण आहेस्तनाग्रांभोवतीचा गडद भाग काही गरोदर स्त्रियांच्या बाबतीत आणखी गडद होतोशरीर स्तनपानासाठी स्वतःला तयार करीत असल्याने असे घडते.

स्तनांमध्ये बदल

१०कामेच्छा बदल

गरोदरपणात आपल्या शरीरात विचित्र बदल होत असतात त्यामुळे कामेच्छेमध्ये सुद्धा बदल होतातगरोदरपणात काही स्त्रियांमध्ये लैंगिक संबंध ठेवण्याची तीव्र भावना दिसून येते तर काही स्त्रियांमध्ये त्यामध्ये लक्षणीय घट झालेली आढळून येतेपरंतु हे सामान्य आहे आणि त्याची चिंता करू नये.

मानवी शरीर खूप गुंतागुंतीचे आहे आणि जेव्हा त्यामध्ये कुठलाही बदल होतो तेव्हा लक्षणे सहज लक्षात येताततुम्ही गर्भवती होताचतुमचे शरीर सर्व प्रकारची लक्षणे दर्शविण्यास सुरुवात करते आणि ते संकेत म्हणून कार्य करतातगर्भधारणेची कोणतीही सामान्य किंवा असामान्य लक्षणे दिसतात गर्भधारणा चाचणी करून घ्याह्या गोड बातमीला पुष्टी देण्यासाठी डॉक्टरांची भेट घ्यातुम्हाला निरोगी गरोदरपण आणि प्रसूतीसाठी शुभेच्छा.

तुम्हाला खूप जास्त रक्तस्त्राव होत असेलकिंवा पाठीत दुखत असेल किंवा पेटके येत असतील किंवा इतर काही असामान्य लक्षणे तुम्ही अनुभवत असाल तर तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.