गर्भधारणेच्या सातव्या महिन्यातील आहार (२५-२८ आठवङे)

 0
गर्भधारणेच्या सातव्या महिन्यातील आहार (२५-२८ आठवङे)

गर्भारपणाची तिसरी तिमाही, म्हणजे तुमच्या गर्भारपणाच्या शेवटचा टप्पा. ज्या दिवसाची तुमची आतुरतेने वाट पाहत होतात त्याकडे तुम्ही हळू हळू जात आहात. तुम्ही आणि तुमचे बाळ खूप साऱ्या बदलांमधून जात आहात. तुमचा आकार वाढू लागतो, आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला डाएटवर जाण्याची इच्छा होऊ शकते. डाएट करण्यापेक्षा ह्या टप्प्यावर  तुमचा आहार कसा संतुलित राहील ह्याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि तुमच्या वजनावर लक्ष द्या. तुमच्या पोटात आता जास्त हालचाल जाणवू लागेल कारण तुमचे बाळ आता पोटातून बाहेर आल्यावरच्या आयुष्याची तयारी करत आहे. ह्या टप्प्यावर आहार तज्ञ जास्तीच्या ४५० कॅलरीजचा सल्ला देतात, जेणेकरून बाळाची पोषणमूल्यांची गरज भागेल. त्यामुळे तुम्हाला पडणारा मोठा प्रश्न म्हणजे पोषणमूल्ये मिळवून देणारा आणि त्याच वेळेला वजनही न वाढवणारा संतुलित आहार  कोणता?

त्यासाठी खूप पर्याय आहेत. जाणून घेण्यासाठी वाचा.

सातव्या महिन्याच्या आहारात कुठल्या अन्नपदार्थांचा समावेश कराल?

तिसऱ्या तिमाहीतील पोषक आहाराचे खूप घटक आहेत. तुमच्या अन्नाची योजना कंटाळवाणी नसावी तसेच त्यामध्ये सर्व पोषणमूल्यांचा समावेश असला पाहिजे. आणि त्यासाठी उपाय म्हणजे मध्यम प्रमाणात खा! खूप जास्त खाण्याचा हव्यास टाळा, विशेषकरून तुम्हाला ह्या काळात कडकडून भूक लागेल.  ७व्या महिन्यात कुठले अन्नपदार्थ खावेत ह्याविषयी अधिक जाणून घ्या.

१. लोह किंवा प्रथिनांनी समृद्ध आहार

ऍनिमिया, प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव आणि अकाली प्रसूती  टाळण्यासाठी लोहाचा जास्तीचा डोस आवश्यक आहे. तुम्हाला २७ मिलिग्रॅम लोहाची दररोज गरज असते. गडद हिरव्या भाज्या उदा: पालक, सुकामेवा म्हणजे  मनुके आणि ऍप्रिकॉट व तिळाच्या बिया, सोयाबीन्स इत्यादी, तसेच लाल मांस आणि पोल्ट्री हे लोह समृद्ध अन्नपदार्थ आहेत ज्यांचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता.  प्रथिने सुद्धा तुमच्या बाळाच्या निरोगी वाढीसाठी महत्वाचे आहेत. प्रथिनांनी समृद्ध अन्नपदार्थांमध्ये उ अंडी, मांस, मसूर, छोले इत्यादी अन्नपदार्थांचा समावेश होतो आणि दुग्धजन्य पदार्थांपासून तुम्हाला लागणारे ७५-१०० ग्रॅम्स प्रोटीन तुम्हाला दिवसाला मिळेल.

२. कॅल्शिअमने समृद्ध आहार

गर्भारपणाच्या तिसऱ्या तिमाहीत  कॅल्शिअम घेणे अतिशय महत्वाचे आहे. तुमच्या आहारातील कॅल्शिअम मुळे तुमच्या बाळाची हाडांची रचना बळकट होण्यास मदत होते.  तुम्ही दररोज तुमच्या आहारातून १००० ग्रॅम कॅल्शिअम घेतले पाहिजे. सगळे दुग्धजन्य पदार्थ उदा: दूध, चीझ, पनीर आणि योगर्ट हे कॅल्शिअम ने समृद्ध आहेत.

३. मॅग्नेशिअमने समृद्ध आहार

तुमच्या आहारातील कॅल्शिअम साठी तुम्हाला ते शरीरात शोषून घेण्यासाठी तितक्याच प्रमाणात मॅग्नेशिअमची गरज असते. मॅग्नेशिअम मुळे  पायाचे पेटके कमी होतात, स्नायू शिथिल होतात आणि त्यामुळे अकाली प्रसूतीस प्रतिबंध होतो. ब्लॅक बीन्स, ओट्स, जव, आर्टीचोक, बदाम आणि भोपळ्याच्या बिया हे मॅग्नेशिअमचे समृद्ध स्रोत आहेत.

४. डीएचए समृद्ध आहार

जर तुम्हाला तुमचे बाळ हुशार व्हावे असे वाटत असेल तर डी एच ए हे फॅटी ऍसिड गरजेचे आहे.

५. फॉलीक ऍसिड

फॉलिक ऍसिड्स हे मज्जातंतू नलिकेत काही व्यंग असतील तर ते कमी करण्यासाठी आणि निरोगी मज्जासंस्था विकसित होण्यासाठी मदत करते.  दररोज कमीत कमी ६०० मिलिग्रॅम – ८०० मिलिग्रॅम फॉलिक ऍसिड ने समृद्ध आहार घेतला पाहिजे. तुमच्या आहारात गडद हिरव्या पालेभाज्या, मोसंबी, ओटमील, संपूर्ण धान्य ब्रेड आणि सीरिअल्सचा समावेश करा जेणेकरून तुम्हाला त्याचा पुरेसा डोस मिळेल.

फॉलीक ऍसिड

६. तंतुमय पदार्थानी समृद्ध आहार

तंतुमय पदार्थ हे बद्धकोष्ठता प्रतिबंधित करतात आणि त्यामुळे पित्त कमी होण्यास मदत होते. तुमच्या पचनसंस्थेमधील पाणी हे तंतुमय पदार्थानी शोषले जाते, त्यामुळे भरपूर पाणी प्या. तिसऱ्या तिमाहीत बद्धकोष्ठता होणे हे खूप सामान्य आहे.

७. व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात घेतल्याने लोहाचे शोषण योग्य रित्या होते. लिंबूवर्गीय फळे जसे की लिंबे, मोसंबी, टरबूज, ब्रोकोली हे व्हिटॅमिन सी चे समृद्ध स्रोत आहेत.

गर्भारपणाच्या  ७ व्या महिन्यात टाळले पाहिजेत असे अन्नपदार्थ

गर्भारपणाच्या ह्या टप्प्यावर काय खाल्ले पाहिजे हे महत्वाचे आहेतच पण काय खाणे टाळले पाहिजे हे सुद्धा माहित असले पाहिजे.  जळजळ, हातापायांना सूज, थकवा आणि बद्धकोष्ठता हे सर्वसामान्यपणे आढळणारी लक्षणे आहेत. काही अन्नपदार्थांमुळे ह्या समस्या वाढतील  आणि त्यामुळे त्यांना तुमच्या आहारातून वर्ज्य करणे चांगले.

१. जास्त चरबीयुक्त आणि मसालेदार अन्नपदार्थ

ज्या अन्नपदार्थांमध्ये चरबी आणि मसाले असतील, विशेषकरून तळलेल्या पदार्थांमुळे जळजळ होईल आणि अस्वस्थता येईल.  ते पचनास कठीण असतात आणि त्यामुळे तुमच्या झोपेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

२. मिठ घालून पॅक केलेले अन्नपदार्थ घेणे टाळा

गर्भारपणाच्या ह्या टप्प्यावर तुमच्या आहारातील मिठाच्या प्रमाणावर लक्ष दिले पाहिजे. खूप जास्त मीठ घेतल्यास त्यामुळे सूज येणे आणि पोट फुगणे इत्यादी समस्या येऊ शकतात. लोणची, सॉस, कॅन केलेले पदार्थ आणि केचप खाणे टाळा. भरपूर प्रमाणात पाणी आणि द्रव पदार्थ घ्या त्यामुळे तुमच्या शरीरातील सोडिअमची पातळी नियमित होण्यास मदत होईल.

३. कॅफेन आणि शीतपेयांना नाही म्हणा

चहा आणि कॉफी घेणे टाळा. दिवसात फक्त एक कप कॉफी घ्या कारण त्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते ह्या पेयांमध्ये कृत्रिम साखर आणि गोडी वाढवणारे पदार्थ असतात आणि त्यामुळे शून्य पोषणमूल्ये मिळतात.

४. अल्कोहोल

गरोदरपणाच्या कुठल्याच टप्प्यावर अल्कोहोल घेता कामा नये, तुम्ही तुमच्या गरोदरपणात ते घेण्याचा विचार सुद्धा करू नका कारण त्यामुळे तुमच्या प्रसूतीच्या प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात.

५. जंक फूड

तुम्हाला के. एफ. सी. मधले तळलेले चिकन खावेसे वाटेल किंवा मॅक्डोनाल्डमधील बर्गर बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटेल,  परंतु तुम्ही मोह टाळला तर तुम्हाला त्याची मदत होईल. त्याच्या ऐवजी घरचा नाश्ता घ्या उदा: सँडविचेस, उपमा, ढोकळा इत्यादी.

जंक फूड

सात महिन्यांच्या गरोदर स्त्रीसाठी आहाराच्या काही टिप्स

  • सकाळची न्याहारी: तुमच्या सकाळच्या न्याहारीत  काही ताज्या फळांचा समावेश करा. लोहासाठी सिरिअल्स सुद्धा तुमच्या न्याहारीमध्ये असुद्या प्रथिनांसाठी उकडलेल्या शेंगा आणि बीन्स घ्या. अंडी, सुकामेवा आणि दूध दररोज घ्या. सकाळी भरपूर न्याहारी घ्या कारण तुमच्या शरीरास त्याच्या पचनासाठी दिवसभर वेळ आहे.
  • दुपारचे जेवण: तुमच्या दुपारच्या जेवणात शिजवलेल्या भाज्यांचे योग्य प्रमाण घ्या, तसेच सलाड, ब्रेड, पोळी, भात, इत्यादींचा त्यांच्या आहारात समावेश करा. गोड अन्नपदार्थांमुळे आरोग्यपूर्ण कॅलरीज मिळतात त्यामुळे ते खाण्यापेक्षा पिष्टमय पदार्थ घ्या.
  • रात्रीचे जेवण: रात्रीचे जेवण हलके घ्या त्यामुळे जळजळ आणि बद्धकोष्ठता टळेल.  सलाड आणि ताजी फळे खा त्यामुळे तुम्हाला रात्रीची झोप चांगली लागेल.

आरोग्यपूर्ण आणि पोषक आहाराचा फक्त तुम्हालाच नव्हे तर बाळाला सुद्धा त्याचा फायदा होतो.  आता तुमचे वजन वेगाने वाढत असल्याने कॅलरीज जाळण्यासाठी थोडा व्यायाम करा आणि वजन नियंत्रित ठेवा.  योग, पोहणे, चालणे हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी चांगले व्यायाम प्रकार आहेत आणि त्यामुळे नॉर्मल प्रसूतीसाठी तुम्ही निरोगी आणि मजबूत रहाल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow